Friday 4 September 2015

मोदी विरोधकांनो ..........

कसं होणार आमच्या देशाचं कुणास ठाऊक ? कोणीही येतो आणि आपापल्या जातीला काखोटीला मारून राजकारण करू पहातो. देशाचं हित या विषयावर मात्र कोणीच बोलत नाही. आमची मानसिकताही अशी आहे कि
आम्हाला आरक्षण हवं , सवलती हव्यात , शासकीय मदत हवी , सबसिड्या हव्यात पण कर भरायला नकोत. स्वतःहून कोणतीही जबाबदारी घ्यायला नको. सरकारच्या नावानं बोंब ठोकली कि आमची पितर स्वर्गात पोहचतात. ज्याला नाकाचा शेंबूडसुद्धा पुसता येत नाही ते दीड दमडीचं पोरगं सरकारनं ' येव कराव...... नि तेव कराव ' असं सांगणार. अरे बाबा पण तु काय करतोस तुझ्या देशासाठी ? देशासाठी जाऊ दे तुझ्या घरासाठी तरी हवं ते करतोस का ?

मोदी प्रदेश दौर्यावर जाऊन काय करतात ? असा प्रश्न प्रत्येकजण विचारतो. परंतु त्यासंदर्भात शशांक गिडकर या मित्राची पोस्ट वाचली. आपणही ती नक्की वाचावी. म्हणजे मोदी परदेशात जाऊन काय करतात तसेच विचारसरणी आणि आदर कशाशी खातात हे आपल्याला कळेल.

आम्हाला अभ्यास करायला नको पण आरक्षणाच्या जिवावर लायकी नसतानाही मोठं पद हवं. आम्हाला काम करायला नको पण मोबदला मात्र भरपूर मिळायला हवा. आपल्या समोर अनेक अडचणी आहेत. पण त्या मोदींनी आणलेल्या नाहीत. हे सार यापूर्वीच्या सत्ताधीशांनी पेरून ठेवलं आहे. त्यातुन बाहेर पडण्यासाठी नियोजनबद्ध काम करायला हवं. मोदींवर थोडा विश्वास दाखवायला हवा. आणि स्वबुद्धीने विचार करायला हवा.      
पन्नास वर्षापुर्वी बाळासाहेब ठाकरे कुणाला माहित नव्हते. त्यांनी मुंबईकरांचं बोट धरलं आणि महाराष्ट्रभर पाय पसरले. आणि आता वारसा हक्कानं पुढे आलेले उद्धव ठाकरे दिल्लीचं राजकारण डळमळीत करण्याची भाषा करतात.

शरद पवारांना कॉंग्रेसमध्ये राहून पंतप्रधान पद मिळत नाही म्हणुन ते स्वतंत्र चूल मांडतात.

ममता बनर्जी बंगलादेशी घुसखोरांना हाताशी धरून भारताचे लचके तोडतात.

मुलायम आहे , लालू आहे , नितीशकुमार आहे. भरीस भर म्हणुन लोकपाल विधायकाचं नाव घेत आणि आण्णा हजारेंना पायाखाली घेत केजरीवाल मोठे झाले. दिल्लीची सत्ता एकहाती हाती घेतली. आता काय तर म्हणे केंद्र सरकार मला काम करू देत नाही.

चार वर्षापूर्वी मी एकटाच ' धुतला तांदूळ  ' म्हणणारे आणि मोदी , सोनिया , मुलायम, लालू या साऱ्यांना देशद्रोही मानणारे केजरीवाल आता मोदींच्या विरोधात इतरांच्या तंबूत शिरतात. यांना देशाची काळजी आहे याचा एकतरी पुरावा यांनी द्यावा. 

या सगळ्यात एकच माणूस भेटला विकासाचं स्वप्नं दाखवणारा, त्यासाठी अहोरात्र झटणारा. पण त्याला सगळे आडवे. विरोधक पण आणि मतदार पण. सगळेजण फक्त प्रश्न विचारणार. कुठे आहे विकास ? कुठे गेले अच्छे दिन ? काय केलं मोदींनी वर्षभरात ? अरे बाबांनो इथं आपल्याला आपलं घर बांधायचं म्हटलं तरी वर्ष लागतं आणि मोदींकडून कॉंग्रेसनं गेली साठ वर्ष खिळखिळा केलेला सत्तेचा गाडा वर्षभरात रुळावर आणावा अशी अपेक्षा आपण कशी करतो .





     

6 comments:

  1. विजयजी कामात असल्यामुळे लेख वाचला नाही
    आज वेळ मिळाला खुप छान लेखन मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. चांगली पोस्ट आपल्या नजरेतुन सुटणार नाही याची मला जाणीव आहे.

      Delete
  2. Replies
    1. अभिप्रायाबद्दल आभार संदीपजी.

      Delete
  3. भाजपाने आण्विक करारावर किती दिवस संसद बंद पाडली हे पण सांगा

    ReplyDelete
    Replies
    1. संसद बंद पाडणे योग्य नाहीच. आण्विक करार हि बाब तरी मोठी होती. पण कॉंग्रेसने नेहमी किरकोळ गोष्टीसाठी संसद बंद पाडली. पण वागणुकीचे आपण समर्थन करू इच्छित साल तर माझी काहीच हरकत नाही.

      Delete