Wednesday, 2 September 2015

हार्दिक पटेलचं खरं स्वरूप

Reality of Hardik patel , खालील comment मध्ये असलेली लिंक नक्की ओपन करून पहा. तुम्हाला नक्की धक्का बसेल. हार्दिक पटेलचे असे काही फोटो हाती लागले आहेत कि शेळ्यांच्या ( भोळाभाबडा समाज ) कळपात शिरलेला हा शेळीच कातडं पांघरलेला लांडगा तर नव्हे ना अशी शंका यावी. मुळात मिडिया या फोटोवर काही बोलणार नाही. आणि मिडीयाने हा विषय चर्चेला घेतला तरी
' हे फोटो माझे नाहीत, हे सत्ताधारी पक्षाचं कारस्थान आहे. हे आमच्या आंदोलनाचा गळा घोटण्यासाठी रचलेलं कारस्थान आहे. ' असे नेहमीचे संवाद ऐकायला मिळतीलच. पण तरीही हे फोटो पाहिल्यानंतर हा माणूस दिसतो तितका साधा नाही. हा स्वयंभू नाही याच्या पाठीशी नक्कीच कोणीतरी आहे याची खात्री पटते. कारण कलेक्टर असलेल्या केजरीवालांना सुद्धा मोठं होण्यासाठी आण्णांच्या आंदोलनाचा आधार घ्यावा लागला होता. अन्यथा चार वर्षापुर्वी केजरीवालांना कुत्रं ओळखत नव्हतं पण त्यांनी लोकपाल विधेयकाचा मंत्र जपत आणि आण्णा हजारेंना पायाखाली घेत महिन्याभरात नाव कमावलं. खरंतर मिडियानं ते नाव मोठं केलं. त्यांनीही संधीचा फायदा घेत स्वतःचा पक्ष स्थापन केला. आण्णा हजारेंच्या विरोधाला झुगारून राजकारणात उडी घेतली.

दिल्ली विधानसभेला पहिल्यांदाच समोर जाताना चार सहा नव्हे अठ्ठावीस जागा जिंकल्या. ' देखो कैसा घोडेबाजार होता है और बीजेपी सरकार बनती है ' असं म्हणत कॉंग्रेसला सोबत घेत सरकार बनवलं. पाठोपाठ लोकसभेच्या निवडणूक आल्या. केजरीवालांना वाटलं कॉंग्रेसवर खापर फोडत राजीनामा दिलं तर आपल्या लोकसभेला देशभर समर्थन मिळेल. पण त्यांची हि खेळी चुकली. लोकसभेला दारूण पराभव स्विकारावा लागला. दिल्लीत एकही जागा राखता आली नाही.

वर्षभरात पुन्हा दिल्लीच्या निवडणुका झाल्या. ' पाणी माफ , बिजली माफ ' असं म्हणणाऱ्या केजरीवालांना भरघोस यश मिळालं. दिल्लीकरांची मात्र घोर निराशा झाली. केजरीवाल आता केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडताहेत. मोदी मला काम करू देत नाहीत असं सांगताहेत. ज्यांना ज्यांना चोर म्हणाले त्यांच्याच गोटात सामील होताहेत. हे सगळं आठवण्याच कारण हार्दिक पटेल.


कोण हा हार्दिक पटेल ? सहा महिन्यापूर्वी कोण ओळखत होतं याला ? पण मागच्या महिन्याभरात मिडीयान याला मोठा केला. त्याच्या रॅलीचे कधीही प्रत्यक्ष चित्रण न करता लाखाची रॅली, दोन लाखाची रॅली , पाच लाखाची रॅली....... परवा तर मी पंचवीस लाखाचा आकडा ऐकला. एका २५ वर्षाच्या तरुणाच्या मागे २५ लाखांचा समुदाय उभा राहील यावर विश्वास बसतो तुमचा ? आणि त्या समाजातले जुने जाणते नेते हे असं घडू देतील अशी खात्री वाटते ? मागे कुणाचीही पुण्याई नसताना हे शक्य होईल ?

पण मिडीयाला हे सारे प्रश्न पडत नाहीत. तो कुठून आला ? त्याच्या पाठीशी कोण आहे ?  याचा शोध न घेता तो कसा स्वयंभू आहे हे सांगण्यातच मिडीयाला अधिक रस आहे. पण वास्तवाच्या मुळाशी जाणार कुणीतरी असतच. हळू हळू हार्दिक पटेलच खरं स्वरूप जनतेसमोर येऊ लागलंय. वर्षाभरापुर्वी हा केजरीवालच्या गाडीत साईडला बसायचा.

लोकही असे कि अभ्यास न करता आरक्षणाच्या जिवावर पुढे जाण्याचं स्वप्नं पहाणारे. स्वस्त ,फुकट ,मोफत मिळत असेल त्याच्या मागे जाणारे. पण आपलं भलं कशात आहे याची जाणीव नसणारे. सहाजिकच हार्दिक पटेलनं आरक्षणाची हाक घालताच समाज मेंढरासारखा त्याच्या मागे धावला. किती दुर्दैव आहे आमचं स्वातंत्र्याला ६७ वर्षे होऊन गेली तरी आम्ही विकासाविषयी नव्हे तर आरक्षणाविषयी बोलतो आहोत. त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या जातीला हाताशी धरून स्वतःचं राजकीय हित साधतो आहे. आणि समाज परस्परांचे पाय ओढत आपापसात भांडतो आहे.

बरं आम्हाला आरक्षण सुद्धा कसं दिलं जातं. तर शैक्षणिक आणि सरकारी नौकरयांपुरत. म्हणजे राजकारणात तुम्हाला आरक्षण नाही. कारण तो लगाम त्यांना त्यांच्याच हातात हवा आहे. यासंदर्भात मागे मी ' मराठा आरक्षण गरज कि .......' हा लेख लिहिला होता. तेव्हा ,' का रे मा XXXX. तुला राजकीय आरक्षण हवंय का ? ' असं म्हणत दोनचार मित्रांनी मला शिव्यांची चांगलीच लाखोली वाहीली होती. अशा पामरांना मी नेहमी माफ करत असतो. पण माझा आरक्षणालाच विरोध आहे. कारण जो पर्यंत आम्ही आरक्षणाची, शासकीय सवलत्यांची अपेक्षा करणार तो पर्यंत असं कोणीतरी केजरीवाल ,असा कोणीतरी हार्दिक पटेल पुढे येणार आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आमच्या देशाला विकासापासून दुर ठेवणार.                                   

6 comments:

 1. http://www.kohraam.com/trending-topics/hardik-patel-sexy-video-goes-viral/
  हार्दिक पटेल के सेक्सी वीडियो का खुलासा वीडियो हुआ वायरल | Kohram News
  केवल 22 साल की उम्र में गुजरात सरकार की नींद उड़ा देने वाले हार्दिक पटेल को दो महीने पहले तक कोई नहीं जानता था, लेकिन आज देश की गली गली और सोशल मीडिया पर उनकी
  kohraam.com

  ReplyDelete
  Replies
  1. आभार मित्रा. असल्या लोकांचे मुखवटे फाडायलाच हवेत.

   Delete
 2. मी हार्दिक पटेल किंवा पाटीदार आंदोलनाच्या बाजूने नाही आणि आरक्षणाच्या तर नाहीच नाही.

  तरीही , आक्षेप नक्की कशाला आहे ते समझले नाही म्हणून हा reply.

  आपण मानून चालू की, त्या video मधली व्यक्ती हार्दिक आहे (खरं,खोटं त्यालाच माहित); पण त्याने काय फरक पडतो?
  वैयक्तिक आयुष्यात तो काय करतो याचा आणि त्याने केलेल्या मागणीचा (मागणी योग्य असो वा अयोग्य) काय संबंध?

  तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो नसेलही दिसतो तितका साधा, असतील काही शक्ती ज्या पडद्यामागून त्याच्या साठी काम करत असतील ; पण ते सांगण्यासाठी हा video पुरावा कसा ठरतो समझत नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. मुळात हार्दिक पटेल हा गृहस्थ अल्पबुद्धी आहे हे वास्तव आहे. आपण आरक्षण का मागतो आहोत हेही त्याला माहित नाही आणि आरक्षण कोणत्या निष्कर्षावर मिळते याचाही त्याचा अभ्यास नाही.

   आपण म्हणता यामुळे की फरक पडतो , त्यामुळे काय फरक पडतो. आपले नेतृत्व आदर्श असावे असे नाही वाटत आपल्याला. आदर्श म्हणजे त्याने अगदीच निरंकारी असावे असे नाही म्हणायचे मला. पण ज्याला आपण संस्कार म्हणतो ते तरी त्याने सांभाळायला हवेतच ना. आणि आपण असल्या नेतृत्वाला स्विकारु शक्य असाल तर माझी काहीच हरकत नाही.

   पडद्यामागून त्याच्यासाठी काही शक्तींनी कान करायलाही माझी काहीच हरकत नाही. पण याचे साध्य काय याचा विचार आपण करायला हवा. पण माझे सर्व राजकीय लेख वाचून पहावेत. अशा रितीने अस्तित्वात येणारे नेते केवळ त्यांचा स्वार्थ साधतात आणि देशाचे राजकारण अस्थिर करतात आणि ते मुळीच देशाच्या हिताचे नाही एवढेच माझे म्हणे.

   Delete
 3. तुला राजकीय आरक्षण पाहिजे का सगळ्यांनाच आरक्षण नको काहीतरी एक सांग

  ReplyDelete
  Replies
  1. मित्रा तु कोण आहेस मला माहित नाही. स्वतः चे नाव सांगण्याचेही धाडस तुझ्यात नाही. कदाचित अत्यंत अवार्च भाषेत प्रतिक्रीय देणारे सुद्धा तुम्हीच असाल. ते तुम्ही नसाल तर आनंद आहे आणि असलात तर उघडपणे बोलण्याचे धाडस दाखवा. असे भेकडासारखे वागू नका. आरक्षण द्यायचे असेल तर राजकीय आरक्षणासह आरक्षण द्यावे. अन्यथा आर्थिक दुर्बल घटकांव्यतिरिक्त अन्य कोणलाही आरक्षण नको. .अगदी मलासुद्धा या मताचा मी आहे. आणि माझ्या लेखातले ' किती दुर्दैव आहे आमचं स्वातंत्र्याला ६७ वर्षे होऊन गेली तरी आम्ही विकासाविषयी नव्हे तर आरक्षणाविषयी बोलतो आहोत.' हे माझं वाक्य माझं मत व्यक्त करायला पुरेसे आहे.

   Delete