Friday, 18 September 2015

विघ्नहर्ता गणपती आणि विघ्नकर्ती माणसं

 उस्तव येतात. वातावरणात एक चैतन्य निर्माण करून जातात. मी कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या विरोधात नाही. पण हिंदूंच्या कोणत्याही उस्तवात वातावरणात जेवढं चैतन्य निर्माण होतं तेवढी चैतन्य निर्मिती इतर धर्मियांच्या उस्तवात होत असेल असे मला वाटत नाही. कारण

मी मशिदीत गेलो आहे, चर्चमध्ये गेलो आहे, शिरकुर्मा खाल्ला आहे , ख्रिसमस मध्ये सहभागी झालो आहे. लग्न सोहळ्याचा आनंद काय असतो ते आपल्या अनेकांना चांगलं ठाऊक आहे पण तोच आनंद मला निकाह अथवा बाबत्सा मध्ये मिळत नाही. खरं म्हणजे मला भिन्न धर्मिय उसत्वातला फरक अधोरेखित करायचा नाही. तर सर्वत्र चैतन्य निर्माण करणाऱ्या या उसत्वात विघ्न आणू पहाणाऱ्या विघ्न संतोषी माणसांविषयी लिहायचं आहे.

गेली अनेक वर्ष आमच्या सोसायटीतला गणेशोस्तव अत्यंत खेळीमेळीत साजरा होतो. घरागणिक वर्गणी गोळा होते. अर्थात ऐच्छिक. कुणी पाचशे हजारही , देतं कुणी पाच पन्नास रुपयात सुद्धा बोळवण करत. दहा वीस रुपये देणारे महाभाग असतात आणि आम्ही वर्गणी देणार नाही आणि आम्ही खालीही येणार नाही असं ठणकावत आम्हाला कस्पटासमान लेखणारी मंडळी सुद्धा असतात. पण सारे मान अपमान गिळून आम्ही उस्त्वाचा आनंद लुटत असतो.

दहा दिवस अगदी धमाल असते. सकाळी संध्याकाळी आरती असते , छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत विविध स्पर्धा असतात. हार जीत असते, रुसवे फुगवे असतात, पारितोषिक वितरण असत. अखेरच्या दिवशी स्नेहभोजन असत. अगदी साग्रसंगीत विसर्जन मिरवून असते. थोडासा गुलाल असतो. मुलं आणि मोठेसुद्धा आपापल्या परीने नाचतात. फुगड्या हे आमच्या विसर्जन मिरवणुकीच वैशिष्टय. मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक पती पत्नीला फुगडी खेळण्याचा आग्रह होतो. लाजत - गाजत , आढे - वेढे घेत सगळेच फुगडी खेळतात.

पण या आनंदात विरजण टाकण्यात काही मंडळींना फार धन्यता वाटत असते. स्पिकरचा आवाज कमी करा, रात्री दहानंतर स्पीकर बंद करा, एकानं तर चक्क पोलीस स्टेशनला जाऊन रितसर तक्रार केली होती. अशा मंडळींना कोणता असुरी आनंद मिळतो कुणास ठाऊक. पण ते कधीच उसत्वात सहभागी होत नाहीत आणि आम्हालाही उसत्वाचा आनंद घेऊ देत नाहीत. विशेष म्हणजे हि विघ्नकर्ता मंडळी हिंदूच असतात बरं का ?

जी परिस्थिती आमच्या सोसायटीत. तीच आमच्या देशात. आमच्या बैल गाडा शर्यतीवर बंदी आणली जाते, रात्री दहा नंतर कोणत्याही स्वरुपाची वाड्या वाजविण्यावर बंदी आणली जाते, अगदी गणपती मिरवणुकीतल्या ढोल-ताशा पथकांना सुद्धा रात्री दहा नंतर वाद्य वाजविण्यास बंदी घातली. एक का अनेक. बरं या उसत्वांच्या विरोधी न्यायालयात धाव घेणारी , जनहित याचिका दाखल करणारी मंडळी बऱ्याच हिंदुंच असतात. म्हणजे,     ' जसे स्त्रीच स्त्रीची वैरीण ' असे म्हटले जाते त्यानुसार ' हिंदूच हिंदूंच्या विरोधात उभा रहातो. कशासाठी ?

यातले कुणी प्राणी मित्र असतात , कुणी स्वतःला पर्यावरणाचे रक्षक मानत असतात , तर कुणी स्वतःला  मानवतेचे रक्षक समजतात. पण यातल्या कुणाकडेही चार प्राणी नसतात , यातल्या कुणीही कधीही कुठे चार झाडे लावलेली नसतात.

गणेशोउस्तवाच्या विरोधात शड्डू ठोकणारे अनेकजण आम्हाला आवाजाचा त्रास, ध्वनीप्रदूषण होते, आमच्या घरात हार्ट पेशंट आहे अशी करणे देत  असतात. मान्य आहे मला आवाज मर्यादेत असावा. पण कार्यकर्त्यांच्या , तरुणांच्या उसत्वाला मुरड नाही घालावीशी वाटत. एखादया दुसऱ्या व्यक्तीसाठी सगळ्यांच्या आनंदात आणि उसत्वात विरजण घालण्याऐवजी त्या एखादया व्यक्तीने आपल्या सोयीचा पर्याय निवडणे अधिक योग्य नव्हे काय ?

गणेश मंडळांनी रस्ते अडवू नयेत, मिरवणुकीत वाहतुकीला अडथळा होऊ नये याची काळजी नक्की घ्यायला हवी. पण इतर मुद्दे मात्र नक्कीच गौण आहेत.    


                     

4 comments:

  1. हिंदूंच्या विरोधात बोलताना काही मंडळींना भलतच बळ येतं पण तीच मंडळी मुस्लिमांच्या विरोधात बोलताना शेपूट घालतात.

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा असतात काही मंडळी अशी. त्यांना आपण काही नाही करू शकत.

      Delete
  2. Kahi lokanna San aani ustwanche wawde ka astr kunas thauk.

    ReplyDelete