Monday, 31 August 2015

जगणं म्हणजे ..... तुझी ओढ

तिला, आपलं रोखून पाहणं फारसं आवडत नसलं तरी आपल्याला मात्र  तिचं असं रोखून पाहणं हव असत. जेव्हा तिचे डोळे आपल्या मनात खोल उतरतात तेव्हा कोणत्याही क्षणी आपल्याला तिचे डोळे खूप खूप हवे असतात. भले मग तिनं रोखून पाहिलं तरी ती डोळा भेट आपल्याला हवी असते.
कारण
तिच्या डोळ्यात प्रेम असतं……… आपुलकी असते……….. जिव्हाळा असतो……… माया असते………….ममता असते………..श्रद्धा असते……….आणि या साऱ्याहून महत्वाचं म्हणजे तिच्या डोळ्यात आपल्या जगण्याची उमेद  असते. तिच्या डोळ्यात असतं आपलं आभाळ.

डोळे खोल ……….डोळे गहिरे…….. डोळे हळुवार…………..डोळे खट्याळ…………डोळे लाडिक………. डोळे मिस्कील………डोळे ओढाळ.

‘जुलमी डोळे’ तिचेही असतात. पण तिच्या डोळ्यांच्या जुल्मिपणाला एक फार फार वेगळी अर्थछटा असते. तिच्या डोळ्यांनी केलेला जुलूमही आपल्याला हवा हवासा असतो. म्हणूनच - ” डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका ” असं म्हणण्याचा अधिकार फक्त तिला…… आपल्याला नाही.


3 comments:

  1. वांग्याचा काय संबंध या कवितेशी?
    :-)
    छान कविता..!!

    ReplyDelete
    Replies
    1. ' बाहेर जायचं आहे.' असा बायकोचा तगादा सुरु होता. मला ड्रायव्हरची भुमिका करायची होती. ती आवरून तयार होती. आणि माझी पोस्ट पूर्ण करण्याची धावपळ चालली होती. त्या गडबडीत ' पोस्ट ' वर क्लिक करून मोकळा झालो असतो. तुमची प्रतिक्रिया नसती तर मी माझी पोस्ट पुन्हा वाचूनही पाहिली नसती. पण तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर द्याच म्हणून पुन्हा पोस्ट पाहिली. आणि खूप चुका दिसल्या, सगळ्या दृस्त केल्यात. पण याचे श्रेय तुम्हाला. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete