Monday, 15 September 2014

BJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सुत्र.

मी शिवसेनेचा विरोधक नाही आणि बीजेपीचा समर्थकही नाही. तसा विरोध माझा आघाडीलाही नाही. पण या देशावर ५० हून अधिक वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसन देशाला कुठं नेऊन ठेवलंय हे आपण सगळे पाहतो आहोतच. काँग्रेसनं या देशाला केवळ गरिबी, महागाई, भ्रष्टाचार, बेकारी आणि घराणेशाही एवढीच पंचसूत्री दिली. त्यामुळेच
देशापाठोपाठ महाराष्ट्राची सत्ता युतीच्या अर्थातच बीजेपीच्या हातात दयावी असं बहुतांश मतदारांना वाटतंय. पण आपल्याच भ्रमात असलेल्या शिवसेनेने मात्र वेगळाच खेळ चालवलाय. मी मे महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणुका पार पडल्याबरोबर लगेचच लिहिलेल्या  उद्धवा जमिनीवर ये 
या लेखात उद्धव ठाकरेंना कानपिचक्या दिल्या होत्या. पण जे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आणि मतदाराला कळतं ते या सत्तालोलुप माणसांना कसं कळणार.  

मुळातच लोकसभेत मिळालेलं यश हे मोदींमुळे मिळालं आहे हेच उद्धव ठाकरेंना मान्य नाही. किंवा मान्य असलं तरी ते त्याकडे हेतुपूर्वक डोळेझाक करताहेत. स्थानिक पक्ष देशाचं तर सोडा पण राज्याचंही कधी भलं करणार नाहीत. कारण त्यांचा हेतू आहे केवळ सत्ता मिळवणं आणि आपली ताकद दाखवणं एवढाच आहे. त्यामुळेच कशी का असेना सत्ता हवी. आणि त्या सत्तेत आपला वरचष्मा हवा हेच स्थानिक पक्षांचं धोरण. आणि म्हणूनच शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची आदळ आपट चालली आहे. 

मुळातच कोण मोठा आणि कोण छोटा असा विचार करत बसण्यापेक्षा मागच्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती टक्के यश मिळालंय यानुसार जागा वाटपाच सूत्र ठरवलं तर कोणताच प्रश्न निर्माण व्हायचं काहीच कारण नाही. 

उदा. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत - 

शिवसेनेने लढवलेल्या १६० जागांपैकी ४४ जागा म्हणजेच केवळ २७ % जागा जिंकल्या 
तर 
भाजपने ११६ जागांपैकी ४६ जागा म्हणजेच जवळ जवळ ३९  % जागा जिंकल्या. 
त्यानुसार 
२८८ च्या २७ % म्हणजेच ७७ जागा शिवसेनेला आणि २८८ च्या ४० % च्या ११५ जागा भाजपला मिळायला हव्यात. 
११५ + ७७ = १९२. 
म्हणजे अजूनही ९६ जागांचा प्रश्न उरतोच. त्यातील मित्रपक्षांना ज्या काही २० जागा द्यायच्या आहेत त्या सोडल्यास ७६ जागा उरतात. 
त्या आता शिवसेनेच्या ठरलेल्या सुत्र नुसार २००९ ला शिवसेना २८८ पैकी १६० जागा म्हणजेच ५५ % जागा लढली होती. त्यानुसार ७६ च्या ५५ % म्हणजे ४१ जागा. अशा रितीने शिवसेनेने ७७ + ४१ = ११८ जागा आणि भाजपाने ११४ + ३५ = १४९ जागा लढवायला हव्यात. 

अशा प्रकारे शिवसेना ११८ + भाजपा १४९ + इतर २० = २८७. टक्केवारीच्या आकडेवारीनुसार अजून एका जागेचा घोळ आहे ती एक जागा शिवसेनेने घ्यावी अथवा मित्रपक्षांना दयावी . 

पण मला खात्री आहे हि स्थानिक पक्षांची नेतेमंडळी मग ती शिवसेनाची असो अथवा राष्ट्रवादीची ते हे सुत्र मान्य करणार नाहीत.

बरं ठीक आहे. उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार जागावाटप झाले. आणि तरीही शिवसेनेच्ला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री कोण ? तिथंही उद्धव, राजच्या भाषेत म्हणणार ' मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. ' त्यामुळे मुख्यमंत्री मीच.' हे म्हणजे कसं झालं ' चीत भी मेरी आणि पट भी मेरी. ' ते आणखी एक म्हणतात ना , ' अपने गलीमे, ……. '

उद्धव ठाकरे एकवेळ खड्यात जातील पण माघार घेणार नाहीत असं दिसतंय. मागे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा हेच झालं. पण आज अगदी तसं होणार नाही. कारण शिवसेना भाजपा निवडणूक एकत्र लढवतील किंवा निवडणुकी नंतर एकत्र येतील. पण सत्ता मिळवतील. म्हणजेच काही झालं तरी युतीची सत्ता येणार हे निश्चित. पण युती तुटली आणि शिवसेनेच्या पदरात केवळ ४० ते ५० जागा पडल्या तर उद्धवला त्याची जागा कळेल. 

आणखी होतंय काय ? युतीमधल्या प्रत्येक घटक पक्षाला आपण मोठं व्हायचं असेल तर हीच वेळ आहे याची पूर्ण जाणीव आहे. कारण लोकसभेतल्या घवघवीत यशापाठोपाठ विधानसभेत ही तसंच यश मिळणार आहे याची प्रत्येकाला जाणीव आहे. त्यामुळेच याच वेळी आपण आपली भाकर भाजून घेतली नाही तर पुढे आपण कधीच मोठे होऊ शकणार नाही. त्यामुळेच प्रत्येकाने बाह्या सरसावलेल्या आहेत. सामंजस्य दाखवते आहे ती भाजपा. कारण त्यांना व्हिजन आहे. 

पण उद्धवजी असेच ताणत राहिले तर भाजपा स्वतंत्रपणे निवडणुका लढवायला समर्थ आहे. आणि भाजपानं तसा निर्णय घेतला तर मात्र उध्वजींच्या पायाखालची वाळू सरकू लागेल. 





10 comments:

  1. Abhyaspurn lekh...! shivsenenechya vaghane aapali khari jhep velich olakhali tar bare...!

    ReplyDelete
  2. समिधाजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आता विधानसभेचा निकाल लागेपर्यंत मी विविध राजकीय घडामोडींवर लिहित रहाणार आहे. प्रत्येक लेखावर आपलं मत मिले हि अपेक्षा.

    ReplyDelete
  3. एकदम रास्त लेख. बीजेपी माघार घेऊ नये हिच इच्छा.

    ReplyDelete
  4. तृप्ती मोदींच आणि शहांच राजकारण अजुन उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. या दोघांनी उत्तर प्रदेशात विरोधकांचा कसा पाचोळा केला याचं उद्धव ठाकरेंनी स्मरण करावं. खुप झालं.

    ReplyDelete
  5. अभिषेक मराठे16 September 2014 at 10:59

    याला म्हणतात बुडत्याचा पाय खोलात. राज गेले तेव्हा वाचले आता शहाणे झाले नाहीत तर महाराष्ट्र सोडाच पण मुंबई सुद्धा हाती राहायची नाही.

    ReplyDelete
  6. अभिषेक प्रतिक्रियेबद्दल आभार. बघू या काय होतंय.

    ReplyDelete
  7. vedya sarakha analysis aahe. Magchhya nivadnukit shivsene virudh and BJP chya bajune MNS hoti tramule shivsenechya 50% jaga padlya he lakshat gya aani upay suchava

    ReplyDelete
  8. मित्रा तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार. Indian Politics : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा हा लेख जरूर वाच. तुझ्या सर्व शंकांच निरसन होईल आणि मी अधिकाधिक परिपूर्ण लेख लिहिण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षात येईल.

    ReplyDelete
  9. 1. भाजपचे पक्के दुवे - मोदी लाट
    भाजपचे कच्चे दुवे - भाजपाला जनाधार असा महाराष्ट्रात नाही कारण जनाधार असलेला स्थानिक नेता नाही (गोपिनाथ मुंडेचा अपवाद वगळता. बाकी गडकरी वगैरे पदाचे नेते आहेत). ऱाहीला प्रष्न मतांचा, भाजपचा असा पारंपारीक मतदार आहे जो मध्यम वर्गियांचे नेत्रुत्व करणारा आणि तितकासा नाही. तळागाळातील मतदार आणि भाजपचे तितकेसे जुळळे नाही. त्यामुळे मोदी लाटेवर ही निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नाही आणि हाही पर्याय कितपत आणि किती काळ चालेल याचा नेम नाही.
    2. सेनेचे पक्के दुवे- कार्यकर्त्यांचा पक्ष, पाऱंपारीक मतदार. तळागाळातील कार्यकर्ते आणि त्यांचे जाळे.
    सेनेचे कच्चे दुवे- नेत्यांचा अभाव. एकहाती चालणारा पक्ष.
    यातून आसे दिसून येते कि आजकाल आधुनिक माध्यमांमधू विश्लेषण करणारे बहुतांश मध्यम वर्गिय आहेत आणि अर्थातच त्यांचा कल भाजपकडे आहे. गेल्या तीन लोकसभेचा आढावा घेतला तर असे लक्षात ये ईल कि सेनेचे खासदार (15,12,11 आणि आता 18) गेल्यावेळी तीन जागा मनसेमुळे गेल्या, म्हणजे सेनेच्यी 14/15 खासदार येण्याची क्षमता आहे. त्यामुळे मोदी लाटेमुळे सेनेचे सारे खासदार झाले म्हणणे चुकीचे आहे. फायदा झाला पण मोदी लाटेमुळे सेनेचे खासदार आले म्हणुन सेनेला भाजपपेक्षा महाराष्ट्रात कमकुवत समजणे हे चुकिचे आहे.
    राहीला प्रश्न भाजपचा, मोदी लाट हिच काय ती जमेची बाजू पण तीही कितपत विधानसभेस जमेची ठरते ही वेळंच ठरवेल.
    त्यामुळे आपला दरवेळेचा फ़ोर्मुला सोडून सत्तेत आस्लेला व लाटेत सिट मागणारा भाजप बरोबर कि सत्ता नसतानाही साथ देणारा मित्रपक्ष बरोबर हे जनताच येणाऱ्या निवडणुकित ठरवेल.
    बहुत काय सांगणे आपण सूज्ञ आहात..!

    ReplyDelete
  10. आपलं विश्लेषण काहीसं बरोबर आहे. शिवसेनेपेक्षा भाजपाचा जनाधार कमी आहे हे मला मान्य आहे. परंतु लोकसभेला शिवसेनेचे अधिक खासदार येतात म्हणून शिवसेनेची ताकद जास्त असे मानता येत नाही. लोकसभेच्या वेळी शिवसेनेला मतदान होतं ते केंद्रातल्या राजकारणासाठी. शिवसेनेविषयी लोकांना अधिक अस्था असती तर विधानसभेलाही शिवसेनेच्या विजयाची टक्केवारी जास्तच राहिली असती. पण तसे आजतागायत कधीच झाले नाही. त्यामुळे आज भाजपा मोदी लाटेवर आरूढ असताना शिवसेनेने भाजपाच म्हणण मान्य करणं यात दोन्ही पक्षांचं हित आहे . म्हणूनच शिवसेनेने आपला अट्टहास सोडवा असं माझं प्रामाणिक मत आहे .

    ReplyDelete