Thursday 14 May 2020

उद्धव ठाकरे उघडे पडताहेत


cartoon by vijay shendge

परवा मला एक मेसेज आला. नाव आणि प्रोफाइल उघड करणे योग्य नाही. परंतु मी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात लिहितो म्हणून या गृहस्थांनी मला सात वर्षांपूर्वी ब्लॉक केले होते. दोन दिवसापूर्वी मला एक मेसेज आला. त्यात त्यांनीं
त्यांची खंत व्यक्त केली होती. मी चेक केले तर त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा पाठवली होती. अर्थात मी ती स्वीकारली देखील. असे हजारो असतील. कबूल करण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. असे मेसेज येतात तेव्हा लेखन सार्थकी लागल्याची जाणीव होते. 

मी भाजपचे समर्थन करतो. त्यांची हाती देश असणे हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने मला गरजेचे वाटते. कारण आधी वाजपेयी, नंतर अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, योगी आदित्यनाथ, असे कितीतरी निर्मोही नेते या पक्षाने दिले आहेत. यांच्या बरोबरीने नाव घ्यावे, आशेने पहावे असा एकही नेता मला दुसऱ्या कोणत्याही पक्षात दिसला नाही. जे एकदोन आहेत ते केवळ आपापल्या पक्षाचे मालक म्हणून वावरत आहेत. आणि आपल्या पक्षावरची मांड सैल होणार नाही यातच त्यांनी त्यांची कारकीर्द खर्ची घातली आहे.

मला शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे वा अन्य कोणत्याही नेत्यावर टिका करण्याचे काही कारण नाही. आणि भाजपची पाठराखण करतो म्हणून कोणी माझ्या घरात पाणी भरत नाही. त्यासाठी माझ्या मनगटात पुरेसे बळ आहे. कोणावर स्तुतीसुमने उधळून मला माझ्या पदरात काही लाभ पडून घ्यायचा नाही. या देशाचे ऐक्य टिकणे महत्वाचे. स्थानिक पक्षांना तर देशाच्या ऐक्यशी काहीही कर्तव्य नाही. स्थानिक पक्ष स्थापन करायचे. जमले तर राज्य पदरात पडून घ्यायचे आपली सरंजामशाही चालवायची. बस.

पुतण्याला सत्तेत आणायचे. पुतण्याचे वजन वाढते हे लक्षात आले कि मुलीला हात द्यायचा. पुतण्याने त्याच्या मुलाला राजकारणात आणायचा प्रयत्न केला आजोबांनी दुसऱ्याच नातवाला हाताशी धरायचं. कोणी काकांनी पक्ष आपल्या ताब्यात दिला नाही म्हणून स्वतंत्र पक्ष स्थापन करतो. कोणी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणता म्हणता स्वतःच मुख्यमंत्री होती. मुलाला कॅबिनेट मंत्री करतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी राजकारणात उतरलेली हि मंडळी जनतेचे हित कशाला विचारात घेतील. पण असा विचार जनता कधी करेल.


3 comments:

  1. अश्या नेत्याना त्यांची जागा जनतेने दाखवली पाहिजे त्यासाठी सुजान मतदारने मतदान केले पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी योग्य बोललात.

      Delete