आकाशात गच्च काळे ढग भरून आलेले……….संधीप्रकाश लोप पावलेला. भिरभिरणारा वारा………….निवांत एकांत. पण ती....……तो मात्र अजूनही नजरेच्या पल्याड. आभाळ मात्र जड झालेलं………कुठल्याही क्षणी बरसेल असं. पण पाऊसही तसाच त्याच्यासारखाच हव्या त्या क्षणाला न येणारा………….हूर हूर लावणारा. या क्षणापर्यंत यायलाच हवा होता तो. पण तो तर दूरवरही कुठे दिसेना.
मग तिला वाटतं आता त्यानंच पाऊस होवून यावं. कारण त्याचं प्रेमही असतं पावसासारखं. कधी सर होऊन येणारं......….कधी रिमझिम बरसणारं....…….कधी धार होवून कोसळणारं…………तिला नखशिखांत चिंब करणारं.......………हवं हवसं असणारं.
बस्स ! आत्ता तिला पाऊस हवा असतो. त्या पावसात चिंब होताना तिला त्याच्या प्रेमातच भिजत असल्याचा अनुभव घ्यायचा असतो. अगदी तो सोबत नसतानाही.
पण इतक्यात तिला प्रेमातला आणि पावसातला फरक जाणवतो. आणि मग ती मनातल्या मनात त्याला आर्जवू लागतो. म्हणतो,
“ नको, नको ! तू पाऊस नको प्रेमच होवून ये.”
हा प्रेमातला आणि पावसातला फरक स्पष्ट करतना ती म्हणतो –
तू पाऊस नको प्रेमच होवून ये.”
ReplyDeleteThanks. Go on reading. You response is inspiration for me. So pl keep responding.
ReplyDelete