Wednesday, 12 June 2019

अभिराज : एक अभिजात संगीतकार

कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर तिला छावाकार शिवाजी सावंत यांच्याविषयी काहीही माहित नव्हतं.

संगीतकार म्हटलं कि
अजय-अतुल, सुधीर फडके अशी नेहमीचीच नावं समोर येतात. 'दूरच्या रानात, केळीच्या बनात', ' लिंबूनीच लिंबू' हि गाणी माहित असतात. पण त्या गीतांचा संगीतकार कोण हे नाही सांगता येणार. प्रत्येक गाण्याचा संगीतकार कोण हे माहिती असायलाच हवं असा आग्रह नाही माझा. पण जे गाणं आपल्या ओठावर रेंगाळत त्याचा संगीतकार माहित असावा ना. हि दोन्ही गाणी हर्षित अभिराज याची. गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या माझी  मुलगी हि माझी सर्वाधिक आवडणारी गझल. या गझलेला त्यानंच संगीत दिलं आहे. गायला सुद्धा त्यानेच. माझी मुलगी याच नावानं सुमित कॅसेटने त्याची सीडी संगीत विश्वास आणली आहे.   

२००८ साली संभाजी मालिकेचा लेखक प्रताप गंगावणेचा ' खंडोबाचा महिमा '  हा सिनेमा आला होता. त्याचा प्रीमियम शो होता प्रभातला. तेव्हा त्या सिनेमाचा संगीतकार हर्षित अभिराजचा आणि माझा परिचय झाला होता. त्यानंतर एक अवघ्या दोनवेळा भेट झाली आमची. पण गेली दहा वर्ष अजिबात संपर्क नव्हता. फेसबुकवर व्हायचा संपर्क पण लाईक कॉमेंट पुरता. पण गेल्या दोन तीन महिन्यात आमचे फोन सुरु झाले. भेटायचं ठरलं. कधी त्याच रेकॉर्डिंग कधी माझी कामं. योग्य जुळून येईना. पण काळ भेटलोच आम्ही. त्याच्या ऑफिसवर. तेही माझ्या घरापासून अवघ्या दोन एक किलोमीटर अंतरावर होतं म्हणून. धनकवडीत. पवार हॉस्पिटलच्या गल्लीत.

खूप साधा माणूस. दहा-बारा सिनेमे केले. पंधरा-वीस अल्बम केले. अनेक मोठमोठ्या गायकांसोबत काम केलं. पण मोठेपणाची रेषा उमटू दिली नाही चेहऱ्यावर. त्याच धोरण एकच, 'फसायचं नाही. फसवायचं नाही. दिवसाढवळ्या कुणाला चांदण्याची स्वप्नं दाखवायची नाहीत.' मधली दहा वर्ष विसरून आम्ही अत्यंत जिव्हाळ्याने भेटलो. या त्याच्या ऑफिसवर तो मुलांचे संगीत गायनाचे क्लास सुद्धा घेतो. पण पैसा कमवावा हा हेतू नाही त्यात. चांगले कलावंत घडले तर अधिक आनंद वाटेल म्हणाला.

तासभर बसलो. गप्पा मारल्या. माझी काही ग्रामीण गीतं ऐकली. सुरेख आहे म्हणाला. संधी मिळाली तर पहिल्यांदा तुला कॉल करणार असं आश्वासन दिलं. अर्थात ते महत्वाचं नाही. आमच्या मैत्रीत अंतर पडू नये. तसंही मागील दहा वर्षात त्याने नाही टाळलं मला. माझाही टाळण्याचा हेतू नव्हता. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारीमुळे मीच वेळ नाही देऊ शकलो. पण आता आमच्या भेटी होत राहतील.

No comments:

Post a Comment