Wednesday 12 June 2019

मी असाच आहे

बबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा रस्ता दाखवतात. ते
तसे बरेच म्हणायचे. कारण आता त्यांच्या सुमार ओळी समोर येत नाही.

बबन धुमाळांचा आणि माझा परिचय झाला. या म्हणालो भेटायला. कुठला अनमान न करता आले. भेटले. आमची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यांचा 'हे बंध वेदनेचे ' हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. कोणतीही अपेक्षा न करता मी त्यांना माझ्यापरीने सर्वोतोपरी मदत केली. योग्य तोच रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केला. कुठल्याच फळाची अपेक्षा नव्हती माझी. तुम्ही चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं यावर विश्वास होता माझा.

मी त्यांच्या पुस्तकावर वर्तमानपत्रात लिहावं अशी त्यांची फार इच्छा होती. योग जुळून आले. मटाने त्यांच्या
पुस्तकावर लिहा असं मला सुचवलं. प्रभातला तर मी कॉलम लिहितोच. तिथेही वेगळं समीक्षण पाठवलं. कालच्या रविवारी दोन्ही वर्तमानपत्रात ते समीक्षण प्रकाशित झालं. मित्रांनो चांगल्याचं कौतुक करताना मी हाताचं राखत नाही. पण मित्र आहे म्हणून फुकाचं कौतुकही करत नाही. खरंच त्यांचा गझलसंग्रह छानच आहे.

No comments:

Post a Comment