Wednesday 12 June 2019

तुम्ही जात मानता का?

या प्रश्नाचं उत्तर बहुतेकजण नाही असंच देतील. तरीही विचारल्यावर प्रत्येकजण आपली जात सांगतोच. मी माणूस आहे असं कोणीच म्हणत नाही. बाबासाहेबांशी नातं सांगणारे प्रकाश आंबेडकर असो, स्वतःला पुरोगामी मानणारे शरद पवार असो अथवा आम्ही पुरोगामी म्हणणारी काँग्रेस असो. प्रत्येकजण
विशिष्ट जातींच्या आधारावर राजकारण करत आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही. 

धर्म मानावा कि नाही? जात मानावी कि नाही? देव मानावा कि नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जात मानली अथवा न मानली, धर्म मानला अथवा न मानला आपल्या जगण्यात कोणताच फरक पडत नाही. त्यामुळेच धर्म, जात या गोष्टी मानायला हरकत नाही. केवळ त्या अवडंबर माजवलं जाऊ नये एवढंच. अशाच काहीशा भावना व्यक्त करणारा हा रविवार प्रभातच्या रूपगंध पुरवणीतील लेख - उतरंड

No comments:

Post a Comment