राऊत साहेब, राम मंदिराच्या उभारणीचा पायाभरणीचा शुभारंभ ठरला. लगेच तुमच्यातला बेगडी, संधीसाधू हिंदू जागा झाला. आमच्या मनात हिंदुत्व अजून जागं आहे हे दाखवण्यासाठी तुमची टिमकी टिमटिमू लागली. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नसलं तरी उद्धव ठाकरे पायाभरणीच्या सोहळ्याला उपस्थित राहतील असे आपण जाहीर
करून टाकलं. लग्नातल्या पंगतींना पारधी उपस्थित असतात. त्यांना लग्नात, वधु-वरांना आशीर्वाद देण्यात काही स्वारस्य नसतं. पंगती कधी बसतात. आणि पंगती संपत आल्यानंतर आपलयाला कधी वाढतात यावर त्यांचे चित्त खिळून राहिलेले असते. तुमचं तसंच आहे. तुम्हाला राममंदिर उभारणीत काहीही रस नाही. तुमचं सगळं लक्ष सच्च्या हिंदुत्ववाद्यांच्या मतावर.
सत्तेसाठी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत पाट लावलात तेव्हाच तुमच्यातले हिंदुत्व उघडे पडले. बाळासाहेब होते तोवर शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर जनतेचा दृढ विश्वास होता. परंतु बाळासाहेब गेले आणि शिवसेना पोरकी झाली. बाळासाहेबांच्या पाठोपाठ हिंदुत्व सुद्धा पोरके झाले असते. परंतु भाजपच्या रूपात हिंदुत्वाचा आणखी एक पाठीराखा हिंदुत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. त्यामुळे हिंदुत्वाची पाठराखण करायला तुमची गरज नाही. खऱ्या हिंदुत्ववादी शिवसैनिकाने केव्हाच तुमचा हात सोडला आहे. आणि तो हिंदुत्वाची पाठराखण करण्यासाठी भाजपच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. तुम्ही मात्र सत्तेचे गजगे खेळत बसा. त्यासाठी हिंदुद्वेष्ट्या शरद पवारांची मुलाखत घ्या. त्यांचे गोडवे गा.
निमंत्रण कोणाला द्यायचे, कोणाला नाकारायचे याचे निर्णय केंद्रीय कमिटी घेणार नाही. राम मंदिर निर्माण न्यास यासंदर्भातील निर्णय घेणार आहे. त्यांनी तुम्हाला निमंत्रण दिले तर हिंदुत्ववाद्यांना दुःख वाटणार नाही. आणि त्यांनी निमंत्रण नाही दिलं तरी तुम्ही सोहळ्याला उपस्थित रहा. परंतु हिंदुत्वाचे युद्ध भाजप लढते आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक लढतो आहे. त्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका. अर्थात तुम्ही कितीही वल्गना केल्या तरी राममंदिर उभारणीचे श्रेय भाजपचे आहे याची जनतेला पूर्ण जाणीव आहे. सैनिकांसोबत जे बाजारबुणगे असतात ते कधी युद्ध लढत नाहीत. हे जनतेला माहित आहे.
आज भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आहे म्हणून हा दिवस उजाडतो आहे. तुम्ही ज्यांना मांडीवर घेतले आहे ना, त्यांनी या जन्मी तरी तुम्हाला हा दिवस दिसू दिला नसता. 'राममंदिर उभारले गेले तर मी आत्महत्या करीन.' असं कपिल सिब्बल म्हणाले होते. ते काय करतात तेवढंच बघायचं आहे. त्यांनी आत्महत्या करू नये. पण माणसापेक्षा दैव श्रेष्ठ हे लक्षात घ्यावं आणि यापुढे अशा नको त्या वल्गना करू नयेत. करता करविता तोच असतो हे लक्षात घ्यावं. तसं नसतं तर साहेब पंतप्रधान झाले नसते का?
No comments:
Post a Comment