संजय राऊत, शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. तुम्ही ती कपटीपणा करून बळकावली आहे. २०१४ पासून तुम्ही जे काही गुण उधळता आहात, त्यामुळे तुमच्या मागे फारसे शिवसैनिक सुद्धा उरलेले नाहीत. २०१९ ला विधानसभेला शिवसेनेची मतांची टक्केवारी ३ टक्क्यांनी घरसली आहे. एक दिवस असा येईल कि
तुमचा, 'आधे इधर आओ और आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पीछे आओ' असं म्हणणारा शोले मधला असरानी होईल. तुमच्या मागे कोणीही उरलेलं नसेल. पण सत्तेचा वात आलेल्या माणसाला आत्मपरीक्षण करण्याचं भान असतंच कुठे?
तुम्ही मस्तीत आहात. बोलता आहात. बोला. परंतु जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल तेव्हा, जनता तुमचा माज नक्की उतरवेल. तुम्ही ज्या जागेवर आहात ना तेवढी सत्ता आणि तेवढं पद हातात असल्यानंतर तुमच्यापेक्षाही अधिक बेछूट बोलणारे आणि वागणारे पायलीला पन्नास आहेत. अनंत करमुसेला मारहाण झाली त्यावर तुम्ही एक शब्द बोल्ला नाहीत. साधूंची हत्या झाली तेव्हा तुम्ही मूग गिळून बसलात. वांद्रयाला दोन तासात हजारोंचा जमाव कसा जमा झाला हे तुम्हाला सांगता येत नाही. आजवर कोणत्याही पत्रकाराला कधी अटक झाली नाही. परंतु ABP माझाच्या राहुल कुलकर्णी यांना अटक करून आपल्या सरकारने तेही करून दाखवलं.
आपण छत्रपतींच नाव घेऊन राजकारण करता. परंतु सत्तेत आल्यापासून जनतेत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करता आहात. संजय राऊत कोण हे चीनच्या जिनपिंग यांना माहित सुद्धा नसेल पण तुम्ही त्यांचा मुका घेण्याचा प्रयत्न करणार, अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांना तर तुम्ही काळे का गोरे हेही माहित नसेल पण तुम्ही त्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न करणार. आपली उंची किती आपण बोलतो किती? आपण आजतागायत निवडून आलेला नाहीत. वर्षानुवर्षे मागल्या दाराने राज्यसभेवर जात राहिलात आणि खासदार म्हणून मिरवत राहिलात आणि तुमच्यासारख्या माणसाने मोदींच्या विरोधात बोलावे?
तुम्हाला बोलण्याची फार हौस आहे ना, मग रुग्णांना बेड उपलब्ध का होत नाहीत? त्यावर बोला. खाजगी दवाखाने अव्वाच्या सव्वा बिले का आकारात आहेत? त्याविषयी बोला. पोलिसांवर, डॉक्टरांवर, नर्सेसवर हल्ले कसे झाले? किती गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले? त्यावर बोला. तुम्हाला सोनू सूदचा राग आला. कारण काय तर संजय निरूपण यांनी त्याच्या कामाची दखल घेतली. मिडीयाने बातम्या दिल्या. म्हणून तुम्ही त्याच्यावर आगपाखड केलीत. मातोश्रीवर त्याला तुम्हीच बोलावून घेतले असेल. परंतु बातम्या मात्र 'सोनू सूद मातोश्रीच्या भेटीला.' अशाच झळकल्या. तुम्ही काहीही म्हणा, नायक म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या तुमच्यासारख्या ढोंगी नेत्यापेक्षा, सिनेमात खलनायक म्हणून काम करणारा परंतु प्रत्यक्षातला नायक असणारा सोनू सूद लाख पटीने चांगला.
काय बोलायच ह्या सरकार बद्दल मतदानातून त्याना जागा दाखवावी बाकी काय् बोलाव.
ReplyDeleteहोय यांना जनताच जागा दाखवेल. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Delete