आम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हातातल्या वर्तमानपत्रावरचं लक्ष उडालं होतं. काही चुकलं का आपलं चार सहा दिवसात ? हा विचार आम्हाला पोखरू लागला होता. पण एवढ्यात तरी बायकोवरील प्रेमाच्या मापात पाप केल्याचे आम्हाला आठवेना. मग आमच्या प्रेमाच्या मेतकूटात माशी पडली कशी
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label face book. Show all posts
Showing posts with label face book. Show all posts
Monday, 21 January 2019
Friday, 11 September 2015
नाना तुम्ही चुकताय ?
facebook घ्या अथवा अन्य कोणतेही सामाजिक माध्यम घ्या. प्रत्येकजण विरोधी नेत्यांच्या खांद्याला खांदा लाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी बोलतो आहे. प्रत्येकाला वाटतं मीच शेतकऱ्याचा तारणहार. पण बाजारात भाजी घ्यायला गेलं दहाची गड्डी आठला कशी मिळेल आणि आठची गड्डी पाचला कशी मिळेल हेच पहाणार. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मात्र पदर मोड करून शेतकऱ्यांची मदत करताना एक वेगळाच आदर्श निर्माण केला. समाजातील विविध थरातून दोघांवर कौतुकाचा वर्षाव झाला. पण खरंच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा उपक्रम स्तुत्य आहे ?
Friday, 7 November 2014
facebook : फेसबुकवरची अश्लीलता
आधी मी ऑर्कुटवर होतो. आता अनेक
वर्षापासून फेसबुकवर आहे. अनेकांचे प्रोफाईल पाहिले. त्यात चांगली माणसं
जशी भेटली तशीच नको तशीही भेटली. अनेकदा शोध न घेताही खुप घाणेरडे ज्याला
अश्लिल म्हणता येतील असे फोटो डोळ्यासमोर आले. तेव्हा भीती वाटते हे सारं
आपल्या मुलांच्या नजरेलाही येत असेल. काय परिणाम होत असतील याचे ?
Sunday, 22 June 2014
social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग 3
सोशल मिडिया आणि अश्लीलता या विषयावर लिहावं तितकं थोडं आहे. आजतागायत मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ आणि भाग २ लिहिले आहेत. पहिल्या भागात चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं. तर भाग २ मधे शालेय वयातील मुलांना मोबाईलची गरज का नसते याविषयी लिहिलं होतं. या तिसऱ्या भागात शालेय वयातली आणि उच्च माध्यमिक शिक्षण ( ११,१२ वी ) घेणाऱ्या मुलांच्या मोबाईल वर नेमकं काय चालतं ? त्यांच्या मोबाईलवरच्या अश्लीलतेच स्वरूप कसं असतं ? आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी लिहिणार आहे.
Wednesday, 11 June 2014
social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग २
चार सहा दिवसापूर्वी मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ हा लेख लिहिला होता. एवढ्या काळात जवळ जवळ चारशेहून अधिक रसिकांनी तो लेख वाचला. त्यातील उद्बोधक चित्रे मी फेसबुकवरही लोड केली होती. पण कुठेही मला ना एकही Like मिळाली ना प्रतिक्रिया. याचे दोन अर्थ निघतात…… एक तर माझे विचार रसिक वाचकांना पटले नाहीत किंवा आपल्याला आपल्या मुलांची, भावी पिढीची काळजी नसावी. Thursday, 27 February 2014
Subscribe to:
Posts (Atom)



