सोशल मिडिया आणि अश्लीलता या विषयावर लिहावं तितकं थोडं आहे. आजतागायत मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ आणि भाग २ लिहिले आहेत. पहिल्या भागात चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं. तर भाग २ मधे शालेय वयातील मुलांना मोबाईलची गरज का नसते याविषयी लिहिलं होतं. या तिसऱ्या भागात शालेय वयातली आणि उच्च माध्यमिक शिक्षण ( ११,१२ वी ) घेणाऱ्या मुलांच्या मोबाईल वर नेमकं काय चालतं ? त्यांच्या मोबाईलवरच्या अश्लीलतेच स्वरूप कसं असतं ? आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी लिहिणार आहे.
बहुतेक मुलांचे मोबाईल हे स्मार्टफोन या सदरात मोडणारे असतात. या मोबाईलला लॉककोड असतो. आणि जवळजवळ सर्वच मुलं या लॉककोडचा पुरपूर फायदा घेतात. लॉककोड घरातल्यांना सांगितला जात नाही. घरच्यांना माहिती पडला तर वेळोवेळी बदलला जातो.
या स्मार्टफोनवर वोट्स अप, च्याटींग, विविध प्रकारच्या गेम खेळण्याच्या सुविधा असतात. वोट्स अपवर गुड मॉर्निंग पासुन गुड नाईट पर्यंत आणि हाय, ह्यालो अशा प्रकारचे शब्द दिवसभर फिरत असतात. कशासाठी दररोज गुड मॉर्निंग आणि गुड नाईट ? कशासाठी हाय ह्यालो ? निव्वळ गुड मॉर्निंग आणि गुड नाईट किंवा हाय ह्यालो करून मनं जोडली जातात ? मुळीच नाही. पण हे कळण्याची समज मुलांमधे नसते. आपले वोट्स अपवर, फेसबुकवर अधिकाधिक मित्रं असण्यात मुलांना धन्यता वाटते. त्यासाठी माहितीत नसलेल्यांना फ्रेन्डशिप रिक्वेस्ट पाठवली जाते. कुणाचीही फ्रेन्डशिप रिक्वेस्ट स्विकारली जाते. नको त्याला हाय ह्यालो केलं जातं.
निव्वळ गुड मॉर्निंग आणि गुड नाईट किंवा हाय ह्यालो पर्यंत ठिक आहे. पण लॉककोड असलेल्या या मोबाईलमधे आणखी कायकाय असतं आई - बाबांना मुळीच माहित नसतं. पण आपल्या मोबाईलमधे कायकाय असतं यावरूनच मुलांच्या मोबाईलमधे कायकाय असेल याचा आपणच अंदाज करावा.
दुचाकीवर मागे बसलेली मुलं तर मोबाईल ऑपरेट करताना सर्रास पहायला मिळतात. मग पुढं आई बाबा असले तरी मुलांना काही फरक पडत नाही. आई बाबा वाहन चालवत असताना आपणही रस्त्यावर लक्ष ठेवावं असं मुलांना वाटत नाही. आई बाबांचा मुलांनी ड्रायव्हर करून टाकलाय.
आठवी ते बारावीच्या वयातली कित्येक मुलं मोबाईलवर तासनतास गेम खेळताना आढळतात. या गेमच्या देवाण घेवाणीत आणि त्यावरील चर्चेत मुलांना खुप रस असतो. अभ्यासात मन कसं लागणार त्यांचं ? आणि मग त्याचा परिणाम शालेय यशावर होतो. आणि दहावी बारावीचा निकाल लागला कि वर्तमान पत्रात बातमी येते - ' निकालाचा टक्का वाढला. ' पण का ? कसा ? यावर कुणी विचार केलाय ? मुळीच नाही हा टक्का कसा वाढतो यावरही लवकरच लिहीन.
परवा घरातलं नेट बंद होतं. काही कामासाठी मी सायबर कॅफेत गेलो होतो. तिथं पंधरा वीस कॉम्प्युटर. पंधरा सोळा ठिकाणी बारा-तेरा या वयोगटाती मुलं. सगळेच गेम खेळत होते. दोन मुलं मात्र एकत्र बसुन सेक्सी फोटो आणि व्हीडीओ पहात होती. काय होणार या पिढीचं ?
अनेकदा या वोट्स अपवर अत्यंत अश्लील विनोद, फोटो , व्हीडीओ आढळून येतात. एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा मुलीच्या मैत्रीणींमधे आणि मुलाच्या मित्रांमधे होणारा अश्लील संवाद अनेक मोबाईलवर फिरत असतो. हा संवाद मी माझ्या मुलाच्या मोबाईलवरही पहिला आहे. पण मी माझ्या मुलांना मोबाईल घेऊन दिला तो ती बारावी झाल्यानंतर. म्हणजे वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी. थोडी बहुत समज आलेली असते या वयात. चांगलं वाईट कळू लागलेलं असतं. त्यामुळेच मुलं काही गोष्टींपासून दुर राहू शकतात. आठवी ते बारावी या दरम्यानच वय मात्रं अत्यंत धोकादायक असतं. चंचल असतं. मोहाला बळी पडतं. म्हणूनच माझ्या ' बारावी झाल्याशिवाय मुलांना मोबाईल देवूच नये ' या मताशी सगळेच रसिक नक्कीच सहमत होतील. त्या आधी मुलांनी मोबाईलची मागणीच करू नये असं पालकांना वाटत असेल तर मुलाचे पाय पाळण्यात दिसू लागतात तेव्हापासूनच आपण स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं.

No comments:
Post a Comment