Thursday, 27 February 2014

Indian Politics and Arvind Kejriwal : केजरीवालांचा झाडू ( cartoon )

एक funny cartoon.

केजरीवालांची आम आदमी पार्टी सत्तेत आली. केजरीवाल आम आदमीचा मुखवटा पांघरून वावरत राहिले. काँग्रेस नेहमीच केजरीवालांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नांत राहिली. सकाळी न्यूज पहात होतो. केजरीवालांची छबी टिव्हीवर झळकत होती.
आमचे चिरंजीव म्हणाले, 
" केजरीवाल पार विटला असेल ना राजकारणाला. त्याला वाटलं असेल या राजकारणात नसतो पडलो तर बरं झालं असतं."

आमचे चिरंजीव बारावीत. सायन्सला. त्यानं केजरीवालांचा असा एकेरी केलेला उल्लेख मला खटकला. मी त्याविषयी विचारल्यावर म्हणाला, " त्यांच्याविषयी रिस्पेक्ट नाही असं नाही हो बाबा. पण या राजकारण्यांनी किती गोची केलीय त्यांची."

आज होतंय काय ? केजरीवालांना वाटतंय तरुण पिढी पूर्णतः माझ्या पाठीशी आहे. तिकडे राहुल गांधीही तरुण पिढीवर मोहिनी मंत्र टाकायचा काम करताहेत. पण नरेंद्र मोदींच्या कुठल्याही प्रयत्नाशिवाय तरुण पिढी सर्वस्वी त्यांच्या पाठीशी उभी आहे हे वास्तव आहे. face book , twitter यासारख्या सोशल मिडीयावर चक्कर टाकली ही गोष्ट लगेच लक्षात येते. काही मोजकी तरुण मंडळी केजरीवालांच्या पाठीशी असलेलीसुद्धा दिसतात. पण राहुल गांधींच्या पाठीशी मात्र कुणीच असल्याचं दिसत नाही. या सोशल मिडीयावर राहुल गांधींचा वावर दिसतो तो केवळ हेटाळनीसाठी.

राहुल गांधी सर्वात अधिक दिसतात ते ५०० कोटी रुपये खर्च करून टीव्हीवर झळकणाऱ्या जाहिरातीतून.
तरुणांनीच नव्हे तर समस्त भारतीयांनी नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहून भाजपला सत्तेत आणावं अशी माझी विनंती नाही तर ती काळाची गरज आहे.

2 comments:

  1. This is true......People are hate congress.... likes BJP Becouse congress will sale aur country to other, one day....

    ReplyDelete
    Replies
    1. सुरेशजी, प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.

      Delete