शेवटी शिवसेनेने माघार घेतली. पण माघार घेताना आपला १५० प्ल्सचा फोर्मुला सोडला नाही. " तुम्हाला जागा कमी पडत असतील तर आमच्या जागा घ्या पण युती टिकवा." असं राजू शेट्टी मोठं मन करून जाहीरपणे सांगत होते. त्याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी आपल्यापरीने घेतला. आणि
युती वाचवण्यासाठी ……… छे ! छे ! युती वाचवण्यासाठी नव्हे शिवसेना वाचवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी एक नवा फोर्मुला इतर पक्षांसमोर ठेवला.
आपण युतीत राहिलो नाही तर आपला पक्ष संपेल अशी भीती राजू शेट्टींना वाटत असावी असा अर्थ या पेच प्रसंगामुळे उध्वस्त झालेल्या उद्धव ठाकरेंनी काढला. आणि, " देखो, हम भी कितने दिलवाले है. " असं म्हणत खरंच छोट्या घटकपक्षांच्या जागा कमी करत एक नवा फोर्मुला महायुतीसमोर ठेवला. त्या नव्या फोर्मुल्यानुसार -
शिवसेना १५१
भाजपा १३०
आणि
मित्रपक्षांना ७ जागा देण्यात आल्या.
काय मोठं मन आहे नाही उद्धव ठाकरेंचं ! हे म्हणजे देवासमोर दान ठेवता ठेवता दानपेटीतलेच पैसे काढून घेतल्यासारख झालं. ज्या माणसाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं त्याची दानत केवढी मोठ्ठी आहे पाहिलंत ना ! यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायला हवी कि जो माणूस आपल्या मित्रपक्षांच्या टाळूवरच लोणी खातो तो जनतेच्या टाळूवरच लोणी खाल्ल्याशिवाय राहील का ?
सत्ता मिळण्याची हि एकमेव संधी समोर आहे याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळेच सत्तेआधी मुख्यमंत्रीपद पदरात पडून घेण्याचा डाव ते खेळताहेत. पाच वर्षात जेवढं लुटता येईल तेवढं लुटायचं मग सत्ता गेली तरी हरकत नाही. काँग्रेसच्या राजनीतीला कंटाळून पंधरा वर्षांनी मतदार सत्ता पुन्हा आपल्या झोळीत घालतीलच. तेव्हा आदित्यला पुढं करायचं.
आज उद्धव ठाकरे युती तोडून एकट्याच्या जीवावर निवडणुका लढण्याचा जुगार खेळू शकतात. कारण बाळासाहेबांची पुण्याई पणाला लावण्याचे दिवस अजून संपले नाहीत. आज युती तोडली तर आपण बाळासाहेबांच्या नावाने मते मागू शकतो आणि मतदारांची सहानभूती आपल्याला मिळू शकते याची त्यांना पुर्ण जाणीव आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी एवढ ताणून धरलंय.
पण मतदार शहाणा झालाय. स्थानिक अथवा प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांची अवस्था , " धोबी का कुत्ता , न घर का , न घटका. " अशी करतात हे मतदारांना कळून चुकलंय त्यामुळेच लोकसभेला तीस वर्षानंतर पहिल्यांदाच एकाच राष्ट्रीय पक्षाला पूर्ण बहुमत देण्याचा विवेक मतदारांनी दाखवला. आणि राज्यातही केवळ शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांच्या सारख्या स्थानिक पक्षांमूळे राज्यातील राजकारण अस्थिर होतंय असं मतदारांना वाटू लागलं तर सपा आणि बसपाची जशी ससेहोलपट झाली तशीच ससेहोलपट शिवसेना आणि राष्ट्रवादीची होईल हे निश्चित. त्यामुळेच युतीच राजकारण करायचं असेल तर मित्रपक्षांचा योग्य सन्मान ठेऊन करावं हे शिवसेनेला कळायला हवं. मी
Indian Politics : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?
या लेखात म्हटल्याप्रमाणे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं. अगदी जास्त जागा लढवून भाजपापेक्षा कमी आमदार निवडून आले तरी मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडायला हवी. त्यासाठी त्यांची हि मारामारी चालली आहे. हे म्हणजे स्वयंवरात हरल्यानंतरही द्रौपदीनं आपल्याच गळ्यात माल घालावी असा अट्टहास कौरवांनी करावा तसं झालं.
उद्धव ठाकरे म्हणतात, " आम्ही घेणारे नाहीत देणारे आहोत. त्यामुळेच आम्ही देतोय तेवढ्या ११९ जागा घ्या. यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका !' का हो ? या २८८ जागा काय कोणी शिवसेनेला नावावर करून दिल्या आहेत. तिकडे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या जागा जास्त आणि इकडे भाजपा राष्ट्रीय पक्ष असूनही भाजपाला जागा कमी. असं का ? काही नाही. केवळ दादागिरी.
पण एका पक्षाच्या प्रमुखांनी अशी अडेलतट्टू भूमिका घेऊन चालत नाही. सामंजस्य दाखवायला हवं. सगळ्यांना सोबत घेऊन जायला हवं. सत्ता महत्वाची, जनतेचं कल्याण महत्वाचं एवढंच लक्षात घ्यायला हवं.
या माणसाला राजकारणापासून दूर ठेवण्याची सद्बुध्दी परमेश्वर मराठी माणसाला कधी देणार कुणास ठाऊक ?
ReplyDeleteसर उद्धव खूपच उद्धट आहे … लोकसभेला पण जे १८ खासदार लागले ते पण मोदी लाटेमुळे त्या मध्ये उद्धव चे काही पण श्रेय नहिये. एक साधे उद्हारण देतो शिर्धी मतदारसंघ मध्ये वाघचौरे सोडून गेल्यावर त्यांनी अचानक उमेदवार बदलून पण लोखंडे जिंकून आला … त्यावरूनच समजते तिथे मोदी लाट किती होति।
ReplyDeleteआणि १००% भाजपा चा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार आहे त्यामध्ये काहीच वाद नाहीये । आम्ही १८ ऑक्टोबर ची वाट पह्तोय… जय महाराष्ट्र
सुजीतजी आज खूप दिवसांनी आपण माझ्या ब्लॉगला भेट दिलीत. प्रतिक्रियेबद्दल आभार. माझा वाद भाजपा आणि शिवसेना असा नसून स्थानिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असा आहे. स्थानिक पक्षांनी देशाचं राजकारण खिळखीळं देशाला २५ वर्ष मागं नेलं आहे. म्हणूनच आता मतदारांनी विचार करून मतदान करावं हि माझी प्रामाणिक इच्छा आहे.
ReplyDeleteलोकसभेला परमेश्वरानं सद्बुद्धी दिली होती तशीच यावेळीही दिली होती.
ReplyDeletesahebanchya wirudha lihilat tar tumcha ghr shodun tumhala mari.
ReplyDeleteमित्रा मला मारायची भाषा करून काय उपयोग. तू शिवसेनेचा असशील. आणि परंतू मीही शिवसेनेचाच आहे हे तुला माहिती आहे का ? आणि मारण्याची भाषा करताना कमीत कमी नाव तरी सांगायचं. अशी निनावी प्रतिक्रिया कशाला दयायची.
ReplyDeleteजाऊ दे युती तुटण्याआधी युतीची सत्ता यावी असं तुला वाटत असेल. परंतु निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे हे तुला जाणीव आहे का ?