या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label Education. Show all posts
Showing posts with label Education. Show all posts
Saturday, 18 July 2020
Friday, 17 July 2020
Saturday, 20 June 2020
Wednesday, 17 June 2020
Monday, 15 June 2020
Sunday, 14 June 2020
Sunday, 22 June 2014
social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग 3
सोशल मिडिया आणि अश्लीलता या विषयावर लिहावं तितकं थोडं आहे. आजतागायत मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ आणि भाग २ लिहिले आहेत. पहिल्या भागात चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं. तर भाग २ मधे शालेय वयातील मुलांना मोबाईलची गरज का नसते याविषयी लिहिलं होतं. या तिसऱ्या भागात शालेय वयातली आणि उच्च माध्यमिक शिक्षण ( ११,१२ वी ) घेणाऱ्या मुलांच्या मोबाईल वर नेमकं काय चालतं ? त्यांच्या मोबाईलवरच्या अश्लीलतेच स्वरूप कसं असतं ? आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी लिहिणार आहे.
Wednesday, 11 June 2014
social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग २
चार सहा दिवसापूर्वी मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ हा लेख लिहिला होता. एवढ्या काळात जवळ जवळ चारशेहून अधिक रसिकांनी तो लेख वाचला. त्यातील उद्बोधक चित्रे मी फेसबुकवरही लोड केली होती. पण कुठेही मला ना एकही Like मिळाली ना प्रतिक्रिया. याचे दोन अर्थ निघतात…… एक तर माझे विचार रसिक वाचकांना पटले नाहीत किंवा आपल्याला आपल्या मुलांची, भावी पिढीची काळजी नसावी. Monday, 2 June 2014
SSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन ?
Result या शब्दाचा मराठी अनुवाद निकाल. पण निकाल या शब्दाला मराठीत किती छटा आहेत ? निकाल लागणे या वाक्य प्रयोगातून कोणताच चांगला अर्थ प्रतित होत नाही. त्यातून नैराश्य आणि नकारात्म्कताच प्रतीत होते. काय लागला का निकाल ? असं एखादयाला विचारलं तरी निकाल चांगला असेल तर ठिक. नाहीतर खजील व्हायलाच होतं. न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भात किंवा प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात तो शब्दप्रयोग ठिक आहे. त्यामुळेच शालेय शिक्षणाच्या Result च्या संदर्भात तरी ' आज दहावी बारावीचा निकाल ' असा वाक्यप्रयोग न करता ' आज दहावी बारावीचं मुल्यांकन' असा करावा.
Subscribe to:
Posts (Atom)








