Monday, 21 January 2019

#मिशनमोदी : घसरुद्दिन आणि अल्लाउद्दीन why amir, sharukh, slman and nasruddin feel unsafe ?

आम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हातातल्या वर्तमानपत्रावरचं लक्ष उडालं होतं. काही चुकलं का आपलं चार सहा दिवसात ? हा विचार आम्हाला पोखरू लागला होता. पण एवढ्यात तरी बायकोवरील प्रेमाच्या मापात पाप केल्याचे आम्हाला आठवेना. मग आमच्या प्रेमाच्या मेतकूटात माशी पडली कशी
या विवंचनेत आम्ही आकंठ बुडालो. ( नेहमी तुपातच माशी पडावी असा काही नियम नाही कधी कधी मेतकूटातही माशी पडू शकते. ) आता यातून मार्ग कसा काढावा या संभ्रमात आम्ही असतानाच भांड्याच्या खळखळाटाच्या पार्श्व संगीत लाभलेली आमच्या सौची भुणभुण आम्हाला ऐकू आली, " तुम्हाला ना आपल्या मुलांची काळजीच नाही. "

" सरळ सांगशील का काय झालं ते ? " आम्ही.

" काय झालं म्हणून काय विचारता. पेपर वाचता कि नुसता डोळ्यासमोर धरून बसता. ? " सौची तणतण.

" अगं एवढ्यात तर हाती घेतलाय पेपर. तूच सांग ना काय झालं असं तापायला ? “ आम्ही शांतच.

" अहो, त्या घसरुद्दिनला बघा त्याच्या मुलांची किती काळजी आहे." आम्हाला संदर्भ लागला.

" तुला त्या नसरुद्दिनच्या वक्तव्याबद्दल बोलायचं आहे का ? " सौने होकारातही मान डोलावली. त्यावर आम्ही म्हणालो , " अंग, मग घसरुद्दिन का म्हणतेस ? "

" मग काय आयुष्य गेलं या माणसाचं या देशात. लोकांनी डोक्यावर घेतलं. भरभरून प्रेम दिलं आणि तरीही हा असा नको त्या विषयावर घसरत असेल तर त्याला घसरुद्दिन म्हटलं तर बिघडलं कुठं ? " सौंच्या एका शब्दात दडलेला भावार्थ आमच्या चांगलाच लक्षात आला.

" अगं चालायचंच. कुणी असं कुणी तसं बोलणारच. मोठ्या माणसांच्या चिंताही मोठ्या असतात. आपल्या सारख्या सामान्य माणसासारखं थोडंच असतं त्यांचं. आता आपल्या मुंबईकरांचंच बघ ना. २००६ ला लोकलमध्ये किती मोठा बॉम्ब स्फोट झाला. शेकड्याने लोक मृत्युमुखी पडले. हजारात जखमी झाले. तरीही दुसऱ्या दिवशी लोकलला गर्दी होतीच.ना. त्यावेळी बॉलिवूड बंद पडलं का ? कुणी मुंबई सोडून गेलं का ? अगं चर्चेला काहीतरी विषय हवाच असतो ना. म्हणून बोलत असतात अशी मंडळी असंच काहीतरी. आता आपलंच बघ ना. तो तसे बोलला नसता तर आपण तरी कशाला असे बोलत बसलो असतो. तू मुक्याने किचनमध्ये वावरली असती आणि मी खाली मान घालून पेपर वाचला असता. "

" पण मी म्हणते नेहमी अल्लाउद्दीन खिलजीच्या पिल्लावळीलाच का भीती वाटत असते अशी."तिचा प्रश्न बिनतोड होता. पण किचनमध्ये चहा फसफसल्याचा आवाज झाला आणि आमच्या उत्तराची वाट न पहाता तिने तिकडे धाव घेतली.

No comments:

Post a comment