Friday, 5 September 2014

Ganesh Festival : सत्यनारायण घालू नये

आजकाल घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती विसर्जन करावयाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा घालण्याची प्रथा आहे. परंतु गणपती समोर सत्यनारायण घालू नये ? कारण -
पृथ्वीचा निर्माता कोण याविषयी अनेक कथा आहेत. कुणी ब्रम्हदेवाला सृष्टीचा निर्माता मानतं. ब्रम्हदेवाच्या पायाच्या अंगठ्यातून सृष्टीची निर्मिती झाली असे एक कथा सांगते. कुणी अर्धनारी नटेश्वराला सृष्टीचा निर्माता मानतं तर कोणी विष्णूला. खरं काय हे त्या एका निर्मात्यालाच माहित. 

पण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना ' ओमं नमोजी आद्या, प्रतिपाद्या…… ' अशी सुरवात केली आहे. कोणत्याही कार्याचा शुभारंभ गणेशाचे स्मरण करून केला जातो. त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी आद्य हि उपाधी गणपतीला दिल आहे आणि म्हणूनच गणपती हाच या विश्वाचा निर्माता आणि तारणहार आहे असे मानता येते. पार्वतीच्या अंगावरील मळापासून गणपतीचा जन्म झाला आणि शंकराने त्याचा शिरच्छेद केला आणि मग पुन्हा हत्तीचे शीर लावले हि कथा नंतरची. त्यामुळेच जो आद्य त्याच्यासमोर सत्यनारायणाची महापूजा कशाला असा प्रश्न पडतो.

या शिवाय सत्यनारायणाला तुळशीपत्र प्रिय म्हणूनच सत्यनारायण महापूजेत तुळशीपत्र प्राधान्याने येते. आपण सत्यानारायणाला तुळशीपत्र वाहतोच पण त्याच बरोबर तीर्थात, प्रसादातही तुळशीपत्राचे एखादे पान का असेना पण टाकले जाते.  सत्यनारायणाला तुळशीपत्रप्रिय असल्यामुळे हे सारे ठीक आहे. 

पण गणपतीला तुळशीपत्र वर्ज्य आहे. वर्ज्य म्हजे किती तर गणपतीला तुळशीपत्र वाहिलं तर इंद्राच्या व्रजाने एखाद्या पर्वतावर आघात करावा तेवढा त्रास गणपतीला होतो. त्यामुळेच गणपतीला तुळशीपत्र मुळीच वाहू नये. उलट एखाद्याकडून चुकून वाहिलं गेलं असल्यास ते त्वरित दूर करावं. 


मग सत्यनारायणाची पूजा घालायची नसेल तर काय करावं ? खरंतर गणपतीसमोर अशी पूजा का घालतात हे मलाही माहित नाही. पण आपल्या पुराणात सत्यनारायण पूजेचा उल्लेख नाही. पेशवेपुर्व काळात  सत्यनारायणाची पूजा अस्तित्वात नव्हती मग हि आली कुठून ? आणली कोणी  याचे स्पष्टीकरण जाणकारांनी केल्यास ती तमाम श्रद्धावंतांवर कृपाच होईल.

आता प्रश्न आला गणपतीसमोर पूजाच घालायची असेल तर कोणती घालावी ? गणपतीसमोर पूजाच घालायची असेल तर सिद्धिविनायकाची महापूजा घालावी. मात्र त्या पूजेत तुळशीपत्राचा वापर चुकुनही करू नये.
   

4 comments:

  1. सत्यनारायण हा देव नसून ती मानवाची कल्पना आहे. या संबंधात कै. महादेवशास्त्री जोशी यांनी लिहिले आहे. ते शोधून पहावे आणि त्याचा प्रचार करावा.
    मंगेश नाबर

    ReplyDelete
  2. मानब, ईश्वरावर खुप श्रद्धा आहे. पण हे असे चुकीचे पायंडे मोडायलाच हवेत. माझ्या लहानपणी असंच संतोषी मातेच्या व्रताचं पेव फुटलं होतं ते आताशा काहीसं शमलं आहे.

    ReplyDelete
  3. Kuthalyahi Pooja Ya Sarvajanic aani saktichya nasun vaiyaktic aani aadyatmik samadhanasathi karavayachya asun tya karanyane zaalach tar laabh hoto......baaki sagalya andhashraddha aani vevegali mat-matantare.....lokannich tayar kelelya.

    ReplyDelete
  4. संतोष सत्यनारायण घालू नये असे मला मुळीच म्हणायचे नाही. गणपतीला तुळशीपत्र वर्ज्य असल्यामुळे ती पुजा गणपतीसमोर घालू नये एवढेच. आता कोणी म्हणेल गणपतीला तुळशीपत्र वर्ज्य का असावे ? त्यावर मी एवढच म्हणेन कि जशी एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची अलर्जी असते त्यानुसार गणपतीला तुळशीपत्र वर्ज्य असावे. असो प्रतिक्रियेबद्दल आभार. असेच नियमित भेटत रहा आणि आपली मते कळवा.

    ReplyDelete