Sunday 3 August 2014

Friendship Day : तीन मुर्खांची मैत्री

friendship

( माझ्याकडे अनेक कविता असूनही गेल्या अनेक दिवसात मी कविता पोस्ट केली नाही. पण आज मैत्रीदिनाच्या निमित्ताने खूप दिवसांनी कविता पोस्ट करण्याचा योग आला. आजच स्फुरलेली आणि लिहिलेली कविता तुम्हाला नक्कीच आवडेल.) 

आज खरंतर लिहिणारच नव्हतो. पण आज मैत्रीदिन. त्यामुळेच सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मैत्रीदिना - विषयी लिहिण्याचा निर्णय घेतला. कारण माझा या जगात कशावर विश्वास असेल तो परमेश्वरावर, प्रेमावर आणि मैत्रीवर. परमेश्वराची आराधना करावी लागते……….प्रेम हृदयातून यावं लागतं…….आणि मैत्री विश्वासाची हवी असते. 

पण या तिन्ही पैकी एकही गोष्ट आपल्या पदरात पडत नाही तेव्हा आयुष्य वाटेवरचा दगड होतं. अनेकजण आपल्याशी ठेचाळतात आपल्याला शिव्या देत मागे टाकून पुढे निघून जातात.


कालच थ्री इडीयट्स पहिला. म्हणजे आज पहिल्यांदाच पहिला असं नव्हे. आधीही अनेकवेळा पाहिलाय. पण सात आंधळ्यांना प्रत्येकला हत्ती वेगवेगळा दिसावा तसा कोणताही सिनेमा मला प्रत्येकवेळी वेगवेगळा दिसतो. कारण मी प्रत्येकवेळी सिनेमातल्या वेगवेगळ्या पैलूशी समरस होतो.

आजवर वाटत होतं ' थ्री इडीयट्स ' हा सिनेमा शैक्षणिक धोरणावर टीका करणारा आहे. पण आज पहिल्यांदाच त्यातला मैत्रीचा पैलू मला जाणवला आणि सिनेमा संपेपर्यंत तो प्रभाव टिकून राहिला. आजच्या ‘ फ्रेन्डशिप डे ‘ च्या दिवशी मैत्रीचं महत्व अधोरेखित करून गेला.

राजू, फरहान आणि रणछोड दास हे तिघे मित्र. नशेत तिघे प्रिन्सिपलच्या ( व्हायरस ) घरी जातात. प्रिया हि प्रिन्सिपलची मुलगी. रणछोड दास तिच्या प्रेमात पडलेला. तो त्याचं प्रेम तिच्याजवळ व्यक्त करतो. राजू आणि फरहान व्हायरसच्या दरवाजावर मुतून आपला राग व्यक्त करतात. पळून जाताना नशेत बरळतात. पकडले जातात. दुसऱ्यादिवशी प्रिन्सिपल राजूला केबिनमध्ये बोलावतात. त्याला कॉलेजमधून बडतर्फ केल्याचं पत्र त्यालाच टाईप करायला सांगतात.

राजू गयावया करतो. प्रिन्सिपल म्हणतात, ” ठीक आहे. तुझ्या जागी रणछोडचं नाव लिही.” आणि राजू मागे सरकतो. खिडकीतून उडी टाकून आत्महत्या करू पहातो.

मग त्याला वाचण्यासाठी रणछोडनं केलेली धडपड, रणछोडला शोधून काढण्यासाठी राजूनं आणि फरहाननं केलेला आटापिटा, रणछोडच्या जिवाभावाच्या प्रियाला भर मांडवातून पळवून नेणं, राजू पास व्हायला हवा म्हणून प्रिन्सिपलच्या कस्टडीतून प्रश्नपत्रिका चोरणारा रणछोड आणि फरहान……….बस्स सगळीकडे फक्त मैत्रीच मैत्री. आहे आपल्या कुणाच्या नशिबी अशी मैत्री. आयुष्यात सारं काही विकत घेता येतं…….विकत घेता येत नाही ते प्रेम आणि मैत्री.

तो सिनेमा होता असं कुणी म्हणू नये. कारण आपल्यालाही सिनेमासारखच आयुष्य हवं असतं. सिनेमातल्यासारखीच हिरोईन आपल्यालाही हवी असते………… आपल्यालाही अन्यायाचा प्रतिकार करण्याची इच्छा असते………..आपल्यालाही कोणत्याही कठीण प्रसंगी सोबत करणारा मित्र हवा असतो. ते सारं आपल्या वाट्याला येत नाही म्हणून आपण सिनेमाशी एकरूप होतो.

म्हणूनच आजच्या स्वतःच्या उन्नतीसाठी एकमेकांचे पाय ओढू पहाणाऱ्या जगात अशा निष्पाप……निरागस मैत्रीला मनापासून सलाम.
Friendship

6 comments:

  1. "Remember that Bengali households still are known for their amazing food culture and this fact is known world-wide :)

    tanSEN was bengali my dear friend, so were a lot of other people! want to see the entire list as it stands today? so was subash chandra bose and sri aurobindo :)

    and i can name a million others and i am proud to say our greateness can be exerted beyond our national borders.
    we are the fifth largest speakers!

    we bengalis have won pretty much every award in the world stage you name it we have it and we are damn proud of what we have :)

    its the only country in the world which took rebellion because it couldn’t speak its mother tongue and it won! and won so hard that the UN had to adopt that day as the international language day, which celebrates languages from all over the world.

    did you know that the FAMOUS SEARS TOWER is architectured by another bengali?"

    KAMONASISH AAYUSH MAZUMDAR
    (MBA, IMT Ghaziabad)
    Bengaluru, Karnataka

    ReplyDelete
  2. how your comment is related with my post.

    ReplyDelete
  3. Khup Surekh.

    ReplyDelete
  4. Mr. Kamonasish at least this comment you should put in Bengali.

    ReplyDelete
  5. mazato aawdta cinema aahe. pan tumcha lekhhi khup aawdla.

    ReplyDelete
  6. पियुष प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. तो सिनेमा तुम्हालाच काय मलाही खूप आवडतो. आपली आवड जुळतेय हे एक छान झालं.

    ReplyDelete