प्रचाराची धामधूम सुरु होती.
गावाकडेही जा – ये चालूच होती. या सगळ्या कालावधीत
कधी वेळच मिळाला नाही. ब्लॉग लिहिणं मात्र जोरात चालु होतं. त्यामुळेच एक दोन राजकीय वात्रटिका लिहिण्याशिवाय कविता लिहिण झालं नाही.
पण
त्यातूनही काही विचार चोरपावलांनी मनात प्रवेश करायचे. त्या विचारंना
फार वेळ मनात थारा द्यायला सवड नसायची. गेली तीनएक वर्षभर शेतकऱ्याची फरफट फार
जवळून पाहतो आहे.
या वर्षी कमी झालेला पाऊस शेकऱ्यांच्या मुळावर आला आहे. ओढे कधीच
आटलेत. विहिरी सुद्धा खोल श्वास घेवू लागल्यात. गावोगावच्या जत्रा जवळ
आल्यात.
पण शेतकऱ्यांची परवड चालूच आहे. कांद्यानं शेतकऱ्याचा जीव नकोसा करून
टाकलाय. मजुरी बरी पण शेती नको. अशी अवस्था झालीय. रणरणत्या उन्हात
सावलीचाच काय तो आधार. पण रिकाम्या पोटाला आणि खिशाला सावलीचा काय उपयोग.
येणारे सण - सुद, जत्रा - बीत्रा कशा साजऱ्या करणार ? शेतकऱ्याला खाऊ कि गिळू
असं करणारं हे एक पृथ्वीच्या आसा एवढ प्रश्नचिन्ह ?
सण-सुद, यात्रा-बीत्रा कशा
साजऱ्या करायच्या ? चिंध्या झालेली कापडं घालून कसं जायचं जत्रेला ?
आलेल्या पै पाहुण्यांना काय खाऊ पिऊ घालायचं ? आपण आपलं जगतो आपल्या खोपटात
कसंही मीठ भाकरी खाऊन. पण पाहुण्यांना कशी दाखवायची आपल्या आयुष्याची
लक्तरं ? जाऊं दे यंदा जत्रा साजरी करूच नये. म्हंजी नवी कापडं घ्यायला नको
आणि पै पाहुण्यांना बोलवायला नको.
अशी शेतकऱ्याच्या मनोगताची मनोमन जुळणी करताना वाटलं……जर प्रत्येक शेतकऱ्यानं असं विचार केला तर यंदा गावोगावच्या जत्रा कशा भरतील ? आणि मग
यंदा जत्रा का भरली नाही हे गावदेवीला कुठल्या शब्दात सांगता येईल असं
विचार करताना सुचलेली हि चारोळी -
मारुती काम्बळेच काय झाल? नगरमध्ये काय झाल? जात फक्त सत्तेसाठी पाहिजे का?
ReplyDeleteमित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. मुळात मी जात, धर्म, पंथ मानत नाही. आपण सगळे माणुस आहोत. एवढंच माझं मत. वर्ष उलटुन गेलं तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडले नाहीत. कधी कधी या अनिष्ट प्रवृत्तींच नशीब जोरावर असतं. पण दलित मारेकऱ्यांचा शोध घ्यायचा नाही असं कोणतंही सरकार सांगत नाही.
ReplyDelete