Wednesday, 19 November 2014

BJP, Congress : नेहरूंची जयंती काँग्रेसचं राजकारण

लोकसभा निवडणुका झाल्या. राजीव, सोनिया प्रचार करून थकले. ' प्रियांका मेरी बेटी जैसी है l ' हे मोदींसारख्या पित्यासमान जेष्ठ माणसाचं विधान प्रियांकानं पायदळी तुडवलं. विविध राज्यात पार पडलेल्या पोट निवडणुकात भाजपाच्या पदरी काहीसं अपयश पदरात पडलं. सगळ्याच विरोधकांना हायसं वाटलं. अगदी महाराष्ट्रातला भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनाही
नाकानं कांदे सोलू लागला. ' पोट निवडणुकांमधील पराभवातनं भाजपानं धडा घ्यावा.' असं सांगु लागला. पाठोपाठ महाराष्ट आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका झाल्या. हरियाणात भाजपा स्वबळावर सत्तेत आला. २००९ ला केवळ चार आमदार असताना आणि कोणाशीही युती नसताना २०१४ ला भाजपचे ४७ आमदार विजयी झाले. कॉंग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदही स्वतःकडे राखता आलं नाही. महाराष्ट्रात शिवसेनेने थोडी समंजसपणाची भुमिका घेतली असती तर महाराष्ट्रातही काँग्रेसला विरोधपक्ष म्हणुन मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेला जागा जिंकता आल्या नसत्या.


असो. यश अपयश येतंच असतं. पण हे अपयश कॉंग्रेसला पचवता आलं नाही. जो पक्ष सत्तेत नाही तो विरोधी पक्ष. विरोधी पक्षानं केवळ टीका करायची नसते. पण आमच्या देशातले विरोधी पक्ष असे वागतात कि पहावत नाही. भाजपा सत्तेत आल्यापासून प्रत्येक पावलाला काँग्रेस फक्त टिकाच करतय. 

मोदींनी ऑस्ट्रेलियात ड्रम वाजवला…………. राहुल गांधींचं तोंड सुरु झालं. 
काळ्या पैशाचा विषय आला…………. . काँग्रेसची टिका सुरु झाली. 
बजेट आलं…………काँग्रेसनं टिकाच केली. 
रेल्वे बजेट आलं………… काँग्रेसनं तोंड वाकडं झालं. 
अमेरिकेत मोदींचा उदो उदो झाला…………. इकडे काँग्रेसच्या अंगात आलं. 
मोदींनी महात्मा गांधींचं नाव घेतलं………… आणि काँग्रेसचं तोंड कडू झालं. 
मोदींनी इंदिरा गांधी आणि नेहरूंच नाव घेतलं………… आणि काँग्रेस वर आभाळ कोसळलं.

देशभर स्वच्छता अभियान राबवावं असं काँग्रेसला कधीच वाटलं नाही पण मोदींनी स्वच्छता अभियान राबवताच राहुल गांधी , ' मोदीजी एक तरफ सफाई करते है और दुसरी तरफ जहर फ़ैलते है l ' असं गरजले. वा रे विरोधी पक्ष आणि वा रे त्यांचं राजकारण. स्वतःच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीबद्दल ते काहीच बोलत नाहीत. पण मोदींच्या सहा महिन्याचा हिशोब त्यांना हवाय.

काँग्रेस नुसतंच विरोधाचं राजकारण करत नाहीये तर वीष पसरवतंय. काँग्रेसनं नुकतंच पंडित नेहरूंच्या १२५ व्या जयंतीच औचित्य साधलं ते नेहरूंच्या प्रेमापोटी नव्हे तर मोदींचा आणि भाजपाचा अपमान करण्यासाठी. देशाच्या प्रथम नागरिकाला………. देशाच्या पंतप्रधांना कार्यक्रमाचं साधं निमंत्रण देत नाही. काय म्हणायचं याला ? राजकारण ? आजवर किती वेळा काँग्रेसनं नेहरू जयंती साजरी केली ?………… किती वेळा महात्मा गांधींचं नावं घेतलं ? …………… किती वेळा इंदिरा गांधींचं स्मरण केलं ? वर्षातनं दोनदा राजघाटावर जाऊन फुलं वाहिली कि झालं काँग्रेसचं स्मरण. या सगळ्यातून काँग्रेस काय साधणार आहे ते येत्या दोन चार महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी नंतर स्पष्ट होईलच.

पण गेल्या आठ महिन्यात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मोदींवर आणि भाजपावर जेवढी अघोरी टिका केली तेवढा भाजपाचा फायदा झाला आणि विरोधी पक्षांच्या पदरी अपयश पडलं. याच्यातून शहाणपण घेऊन काँग्रेसनं आपली टिकेची धार कमी करायला हवी. आणि जिथं गरज असेल तिथं भाजपावर तुटून पडायला हवं. तसं न करता काँग्रेस अशीच बिनबुडाची टिका करत राहिली तर काँग्रेस स्वतः साठीच खाणून ठेवलेला खड्डा अधिकाधिक खोल करत जाईल. ते काँग्रेसच्या हिताचं तर नाहीच नाही. पण देशाच्या हिताचंही नाही. कारण भाजपा समोर ठामपणे उभा राहू शकेल असा काँग्रेस हाच देशातला समर्थ विरोधी पर्याय आहे.  
2 comments:

  1. Pn hey congress la sangnar kon ? Mi ek kalat nahi tuhi konachi baju mandat aahat?

    ReplyDelete
  2. हे काँग्रेसला कोणी सांगायची गरज नाही. एक न एक दिवस त्यांना शहाणपण येईलच. असो प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete