Thursday, 13 November 2014

Indian Cricket : विराटचा फ्लाईंग किस

विराट आणि अनुष्का का वागताहेत असे ? कोण कुणाला मोहात पडतंय ? अनुष्काला नसेल भान पण विराटनं तरी भान राखायला हवं होतं. तळाचा फोटो पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि
विराटच्या कृती नंतरचे  अनुष्काचे हावभाव किती उत्कट होते. आणि सार्वजनिक ठिकाणी असं करू नये याचं भान दोघांनीही बाळगायला हवं होतं. त्यांचं प्रेम हि त्यांची खाजगी बाब असली तरी ते खाजगीतच व्यक्त करावं एवढा नियम दोघांनी पाळायला हवा. 

इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली कमालीचा अपयशी ठरला आणि तिथुनच विराट अनुष्काच्या मैत्रीची चर्चा सुरु झाली. जे प्रेम माणसाला अपयशाच्या मार्गावर नेतं त्याला प्रेम म्हणायचं का ? हि तर नुसती ओढ. हे तर नुसतं आकर्षण. कारण प्रेमात माणुस विचलित होत नाही. त्याला त्याच्या ध्येयाचा विसर पडत नाही. पण एखादया व्यक्तीचं आकर्षण वाटू लागतं तेव्हा डोक्यात ती एकच व्यक्ती घर करते. आणि म्हणुनच दुसरं काहीच सुचत नाही.

खरंतर अनुष्काच्या तुलनेत विराटची लोकप्रियता फार मोठी आहे. अनुष्का काही फार आघाडीची अभिनेत्री नाही. उलट आजकाल तिच्याकडे फारशी कामंच नाहीत. म्हणुनच ती इंग्लंड असो अथवा भारत विराटची पाठ सोडत नाही. हातात आलेला बकरा तिला गमवायचा नाही. त्यासाठी ती त्याच्या अशा प्रत्येक कृत्याला खतपाणीच घालत राहील. पण विराटनं पाय जमीनीवर ठेवायला हवेत ना ! 

आजवर अनेक खेळाडू झाले. अनेकांची प्रेम प्रकरणं होती. अगदी सचिन अंजलीचं सुद्धा प्रेम प्रकरणच होतं. पण त्यांनी असा थिल्लरपणा केला नाही. अंजली तर सचिनच्या फार थोड्या सामन्यांना उपस्थित राहिली आहे. दोघांचाही स्वतःच्या प्रेमावर आणि परस्परांवर विश्वास. तिथं कुणाला कुणाची भुरळ पडली नव्हती
आता. धोनीनही असा थिल्लरपणा कधी केला नाही.शतका नंतरचा सचिन विराट 

शतक साजरं केल्यानंतर आभाळाकड पहात परमेश्वराचे आभार मानणारा सचिन पहिला………… शतक साजरं केल्यानंतर मिशीला पीळ भरणारा शिखर पाहिला…………शतक साजरं केल्यानंतर ब्याट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन करणारा रैना पाहिला. पण शतक साजरं केल्यानंतर आपल्या प्रेयसीला फ्लाईंग कीस देणारा विराट पहिल्यांदाच पाहिला. लाज वाटली. हा फ्लाईंग किस केवळ अर्ध्या शतकासाठी नव्हता. तर कर्णधार म्हणुन मिळविलेल्या सलग तिसऱ्या विजयासाठी होता. त्या क्षणी या तिन्ही विजयात इतर खेळाडुंचा सहभाग आहे याचा त्याला विसर पडला होता. 

विराटनं अनुष्काला नुसता फ्लाईंग किसं नव्हता दिला. भारतानं एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेवर मिळवलेला विजय अनुष्काला अर्पण केला होता. त्यामुळेच बीसीसीआयनं विराटच्या या कृत्याची दखल घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करायला हवी. त्याचं कर्णधारपद काढुन घ्यायला हवं. त्याला घरी बसवायला हवं. तरच भविष्यात भारतीय खेळाडू शहाणपणानं वागतील. अन्यथा अशा अनुष्का खेळाडूंचं आणि भारतीय खेळाचं भविष्य अंधारात ढकलतील. हे नक्की.     

8 comments:

  1. जाउ द्या ना हो. या वयात नाही करणार तर कधी करणार. अन आजकाल सर्रास रस्त्यावर असेच दिते मग tvवर दिसले म्हणून काय झाले.

    ReplyDelete
  2. जलनेवाले तेरा मूह काला.

    ReplyDelete
  3. खरंतर अनुष्काच्या तुलनेत विराटची लोकप्रियता फार मोठी आहे. अनुष्का काही फार आघाडीची अभिनेत्री नाही. उलट आजकाल तिच्याकडे फारशी कामंच नाहीत. म्हणुनच ती इंग्लंड असो अथवा भारत विराटची पाठ सोडत नाही.
    >>>>
    तुम्ही तिच्यावर लम्पटपणाचा आरोप करता आहात.

    ReplyDelete
  4. मित्रा नावासह प्रतिक्रिया दिलीस तर अधिक बरे होईल. प्रतिक्रियेबद्दल आभार. या वयातून कोण जात नाही ! सगळेच जातात. ज्याच्यावर संस्कारच नाहीत त्यानं कसंही वागलं तरी चालतं. पण जो रोड मॉडेल आहे त्यानं असं वागून नाही चालत.

    ReplyDelete
  5. मित्रा नावासह प्रतिक्रिया दिलीस तर अधिक बरे होईल. प्रतिक्रियेबद्दल आभार. आदर्श नावाची काही चीज असते. पण आपणास आदर्श नको असतील तर हरकत नाही. माझा मात्र हाच मार्ग आहे.

    ReplyDelete
  6. मित्रा नावासह प्रतिक्रिया दिलीस तर अधिक बरे होईल. प्रतिक्रियेबद्दल आभार. खालच्या फोटोतली विराटच्या फ्लाईंग किसवर तिनं दिलेली प्रतिक्रिया पाही तर त्याला लंपटपणाच म्हणावा लागेल. ती विराटला भरीस घालते असंच म्हणावं लागेल.

    ReplyDelete
  7. या कृत्याची दखल घेऊन [Image]त्याच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

    ReplyDelete
  8. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. असो प्रतिक्रियेबद्दल आभार. पण इतरांच्या प्रतिक्रिया पाहिल्या का ? आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कारवाई करणं ज्यांच्या हाती आहे ते काहीच बोलत नाहीत. आणि आपण मात्र उगाच चर्चा करतो आहोत. पण कुणी तरी निषेध नोंदवायलाच हवा ना !

    ReplyDelete