Wednesday, 29 April 2015

जय हो IGP

नगर शहराच्या बाहेर अत्यंत एकांतात डोंगराच्या खबदाडीत एक हॉटेल होतं. साई रिसोर्ट. त्या हॉटेलच्या पार्किंग झोनमध्ये एकामागुन एक तीस चाळीस कार लागल्या. कारमधून उतरलेला शंभरच्या आसपास माणसांचा घोळका हॉटेलच्या लॉनवर जमा झाला. त्यातला एक तरुण पुढं आला आणि त्यानं ' जय हो IGP ' अशी घोषणा दिली. आणि माझ्या डोळ्यासमोर इसीस ( ISIS ) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया उभ्या राहिल्या. मला प्रश्न पडला IGP हे कशाचं संक्षिप्त रूप ?

माती विकता येत नाही

तुम्ही म्हणाल," काय हे सारखे राजकारणाविषयी आणि शेतकऱ्यांविषयी लिहिताहेत ? यांच्या पोतडीतल्या प्रेम कविता संपल्या काय ? "
कोणत्याही कवीच्या पोतडीतल्या कविता कधीच संपत नाहीत.
पण होतं काय ठेच लागल्यावर जसं आपल्या तोंडून केवळ आई हाच उद्गार बाहेर पडतो तसाच कवीचा जो अनुभव असेल तशाच कविता मनातल्या कागदावर उमटतात.

Wednesday, 22 April 2015

बबनराव पाचपुते : दुसरा नारायण राणे

 राजकीय कारकीर्द उभी रहायला अनेक वर्ष जावी लागतात. पण ती संपायला फारसा वेळ लागत नाही. छगन भुजबळ, नारायण राणे आणि बबनराव पाचपुते हि माणसं महाराष्ट्रातील माणसाला माहित नाही हे शक्य नाही. अत्यंत संधीसाधू . छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत उडी मारली. आपल्याला शिवसेनेत मिळावं तेवढा महत्व मिळत नाही हे पहातच नारायण राणेंनी काँग्रेसची वाट धरली. बबनराव तर या दोघांपेक्षा थोर.

Sunday, 19 April 2015

ब्लॉगर्ससाठी स्पर्धा

मित्रहो आज जवळ जवळ दोन हजारहून अधिक मराठी ब्लॉगर्स ब्लॉग लिहिताहेतय़ ब्लॉगर्सना एकत्रित बांधून ठेवणाऱ्या अनेक ब्लॉग डिरेक्टरी आहेत. अनेकजण खूप दर्जेदार लिहितात. पण या लिखाणाची दखल मराठी साहित्य विश्वानं, मराठी साहित्य परिषदेन कधीच घेतली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने आपली दखल घेणं तर फार दूरची गोष्ट.

यात

मराठी ब्लॉगर्स साठी स्पर्धा

मित्रहो आज जवळ जवळ दोन हजारहून अधिक मराठी ब्लॉगर्स ब्लॉग लिहिताहेतय़ ब्लॉगर्सना एकत्रित बांधून ठेवणाऱ्या अनेक ब्लॉग डिरेक्टरी आहेत. अनेकजण खूप दर्जेदार लिहितात. पण या लिखाणाची दखल मराठी साहित्य विश्वानं, मराठी साहित्य परिषदेन कधीच घेतली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने आपली दखल घेणं तर फार दूरची गोष्ट.

यात

मला भेटलेला नाच्या

नटरंग सिनेमा कुणाला आठवत नाही. पोटापाण्यासाठी आणि कलेच्या नादात तमाशाचा फड उभारणाऱ्या गुणाची हि कहाणी. कलेच्या नादात नाच्या होणाऱ्या गुणाची कहाणी. सुडापोटी बलात्कार सोसणाऱ्या नाच्याची कहाणी. मलाही एक नाच्या भेटला. पण नाच्याच. त्यात नटरंग मधला गुणा नव्हता. त्या नाच्याची हि वास्तविकता.

Friday, 17 April 2015

हरलं कोण ? राणे कि शिवसेना ?

( तळाचं व्यंगचित्र नक्की पहा . )

नुकतीच तासगावची आणि वांद्र्याची पोट निवडणुक पार पडली. एखाद्या नेत्याच्या मृत्युनं रिकाम्या झालेल्या जागेवर त्या नेत्याच्या पत्नीला अथवा मुलांना उभं करायचं हा आता ट्रेंड झालाय. इतर राजकीय पक्षांनीही त्या उमेदवाराच्या विरोधात उमेद्वार न देत आपल्याला दिवंगत नेत्याविषयी किती सहानभूती आहे याचं प्रदर्शन करायचं. पण

Wednesday, 15 April 2015

गांधी सरले बाबा उरले


महात्मा गांधी. कधीही विसर न पडावा असं स्वातंत्र्य लढ्यातल एक नाव. साऱ्या जगाला अहिंसेचं शहाणपण शिकवणारं एक वादळ. स्वातंत्र्य मिळालं आणि सगळ्या सरकारी कचेऱ्यात

Tuesday, 14 April 2015

मुली पळून का जातात ?

परवा गावाहुन आलो. आणि आल्या आल्या बायकोने बातमी दिली, ' आहो, आमक्या आमक्याची आमकी पळून गेली ना. ' मुलगी जवळची. परिचीताची. सुस्वरूप. घरदार सुशिक्षित……. सुसंस्कृत.

' मुलगा काय करतो ? ' माझा प्रश्न.

' काही नाही हो. कुठेतरी मोबाईल दुरुस्तीची टपरी आहे. मुलगा काळा कुळकुळीत आहे. शिवाय

Tuesday, 7 April 2015

ओवेसी, उद्धव आणि शिवसैनिक

खुप घाईत हा लेख लिहितो आहे. तेवढ्या घाईतच दोन्ही कार्टून तयार केली आहेत. गेला आठवडाभर ओवेसी नको ती विधानं करतो आहे. उद्धव ठाकरेंना, शिवसेनेला आणि हिंदुत्वाला उघड आव्हान देतो आहे. पण उद्धव ठाकरे मुग गिळून गप्प आहेत. इतकच काय शिवसेनेचा एफएम - रेडीओ मिरची

Monday, 6 April 2015

शिणल्यावरती मात्र सख्या रे .........

परवा असाच विचार करत बसलो होतो. आयुष्य जुनं कधी होतं ? तिचा सहवास अथवा त्याचा स्पर्श नकोसा का वाटू लागतो ? सेक्स हि एकच भावना माणसाला जोडून ठेवते का ? सेक्समधलं नाविन्य संपलं कि आपल्या