Friday 7 August 2015

खरे आतंकवादी कोण ?

याकुबला फाशी झाली. देश ढवळून निघाला. किया प्रतिक्रियांना ऊत आला. सलमान पासुन अनेकांनी याकुबच्या फाशीला फाटे फोडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा सुप्रीम कोर्ट. दावे प्रतीदावे. पण
अखेरीस याकुबला फाशी झालीच. खरे तर सरकारने त्याचे प्रेत विमानाने नेऊन त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची काहीच गरज नव्हती. कारागृहाच्या बाहेर त्याच्या उपस्थित नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत देऊन मोकळे व्हायला हवे होते. पण काही शासकीय प्रघात असतात. आणि आमच्या संस्कृतीतली सहिष्णू वृत्तीही त्याला कारणीभुत होती.  त्यामुळे शासनाने विमानाने त्याचे प्रेत पोहचते केले असेल.

पण फाशीपुर्वीच्या आठ दहा दिवसात जे काही नाट्य घडले त्यामुळे. अनेक मुस्लिमांना या देशाविषयी किती प्रेम आहे ते कळाले. ओवेसीचे ठीक आहे. आम्हीं त्याला हिंदु राष्ट्रप्रेमी मानतच नाही. पण सलमान सारख्या माणसाने याकुबवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करावा हे त्याच्या चाहत्यांचे दुर्दैव नव्हे काय ? सलमान तर सलमान पण महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा, नसरुद्दिन शहा या मंडळींनी याकुबच्या फाशीच्या विरोधात बोलताना थोडा विचार करायला हवा होता. किंवा हि मंडळी याकुबच्या फाशीच्या विरोधात बोलतात म्हणजे आमच्या घटनेनं आम्हाला दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा हि मंडळी गरजेपेक्षा अधिक फायदा घेत आहेत असे म्हणावे लागेल.    

ओवेसी हिंदू दहशतवाद्यांना फाशी दया म्हणतो. त्याने कोण हिंदू दहशतवादी ते सांगावे. त्यांनी कोणकोणत्या राष्ट्रात जाऊन दहशतवाद माजवला ते सांगावे.

अनेक मुस्लिम आमदारांनी, खासदारांनी,नगरसेवकांनी याकुबच्या माफीसाठी राष्ट्रपतींना अर्ज केला. याकुबला झालेली फाशी कॉंग्रेसला सुद्धा फारशी रुचली नाही. डावे तर याकुबच्या फाशीच्या विरोधातच होते.  

डॉ. कलामांच्या अंतयात्रेस होती त्यापेक्षा कितीतरी अधिक गर्दी याकुबच्या अंतयात्रेला होती. या सगळ्या गोष्टी बहुतांश मुस्लिम ( मी सर्व म्हणत नाही ) हिंदु राष्ट्राच्या विरोधात आहे हेच दाखवुन देतो.

खरे तर याकुबच्या फाशीच्या विरोधात गळा काढणाऱ्या तमाम मंडळींना देशद्रोही ठरवून त्यांना अटक करायला हवी होती. पण नको त्या गोष्टींवरून सरकारला कोंडीत पकडु पहाणाऱ्या विरोधकांना आयते कोलीत मिळाले असते म्हणुन सरकार शांत बसले असावे.

१९९३ साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपीला दोषी ठरवून फाशी शिक्षा जाहीर करायला कॉंग्रेसला १४ वर्ष लागले हे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु २००७ पासुन २०१४ म्हणजे ७ वर्षात याकुबच्या फाशीच्या
शिक्षेची अंमलबजावणी न करणारी काँग्रेस आतंकवादाला पाठी घालते आहे असेच म्हणावे लागते. आज भाजपा सत्तेवर आणि मोदी पंतप्रधान आहेत म्हणुन अन्यथा आणखी किती वर्ष आम्ही याकुबचा भार सहन करीत राहिलो असतो कुणास ठाऊक ?

आज टायगर मेनन आणि अन्य मंडळी धमक्या देत आहेत. पण आता त्यांच्या धमक्यांना घाबरणारे सरकार सत्तेवर नाही याची त्यांनी जाणीव ठेवावी.    

    



      

4 comments:

  1. कांग्रेस तर देशद्रोही आहेच
    स्वातंत्र्याच्या आगोदरची कांग्रेस वेगळी होती
    त्यमध्ये सुभाषचंद्र बोस
    आणि भरपुर क्रांतिकारक होते
    आत्ताची कांग्रेस इटली च्या सोनिया ची गुलाम कांग्रेस आहे
    त्याना देशासी काही देणघेणं नाही फक्त व्होटबैन्क पॉलिटिक्स
    करून सत्ता हातात पाहिजे
    आणि याकुब चे समर्थन करणारे सारेच खरे देशद्रोही
    मग ते कुणीही असो
    बाकी लिखाण नेहमीप्रमाणे छान झाले प्रतिक्रिया उशिरा देतोय
    माफ करा

    ReplyDelete
    Replies
    1. रमेशजी, आपली प्रतिक्रिया उशीरा मिळाली याचे दु: ख नाही. पण खुप महिन्यानंतर मिळाली याची खंत मात्र नक्कीच आहे. असो. आपल्या प्रत्येक कृतीतून आपण प्रखर हिंदू अभिमानी आहात हे दिसते. पण आपण मुस्लिम द्वेष्टे नसणार असाही विश्वास आहे.

      Delete
  2. अगदी मनातलं लिहीलं आहे तुम्ही! खरं तर ह्या फाशी ला हिंदू-मुस्लिम असा धर्माचा रंगच देता कामा नये. ९३ साली झालेल्या बॉंब स्फोटात शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा हा याकूब........त्यला काय दया माया दाखविण्याची गरज! आणि फाशी आधी च्या रात्री तर टी व्ही वर अगदी ऊत आला होता..... सुबह साढे तीन बजे उसे उठाया जाएगा, चार बजे मनपसंद नाश्ता दिया जाएगा, फिर धार्मिक किताब दी जाएगी....काय गरज हे सांगायची! त्या दिवशी, एका मुस्लीमाचीच किती मानसन्मानाने व प्रेमाने अंत्यायात्रा निघाली व दुसरा याकूब आपल्या मौतीने मेला....!!

    ReplyDelete
    Replies
    1. मी तुमच्या लिखाणाची आणि प्रतिक्रियांची वाट पहात असतो. पण आपण बर्याच दिवसात नाही लिहिलेले दिसले नाही. परंतु प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार.
      वार्तांकन हि आता रेसिपी झाली आहे. काय आणि कसा मालमसाला टाकला व कधी फोडणी तर बातमी रंगतदार होईल हेच अधिक महत्वाचे मानले जाते. तास च्यानल चालवायचा आहे म्हणून रेतीसुद्धा भरडली जाते आहे. हि माध्यम एखादी गोष्ट जनतेसमोर जशीच्या तशी न मांडता रंगवुन मांडतात. लोकांनाही या गोष्टीचा उबग आला आहे. पण हे या माध्यमांना कुठे कळतय.

      Delete