Showing posts with label ललित लेख. Show all posts
Showing posts with label ललित लेख. Show all posts

Saturday, 27 June 2020

बाप आणि कावळा

vijay shendge images


इंदुरीकर महाराजांनी सम विषमचं विधान केलं. त्यांच्या विधानामुळे जणू काही जगबुडी येणार आहे अशा थाटात त्यांच्यावर खटला दाखल झाला. त्यांच्यावर खटला दाखल झाला म्हणून तृप्ती देसाईला आनंद झाला. आता या

Monday, 23 March 2020

कोरा चहा, कोरोना, मी, अंधश्रद्धा आणि बाळूमामा

सकाळी सकाळीच फोन वाजला. उठालोच. उठून बसावं लागणार होतंच. कारण मी कधीही माझा फोन उशाशी ठेवून झोपत नाही. तो माझ्या पायाकडे ठेवलेला असतो. त्यामुळे उठलो. अंगावरच पांघरूण दूर केलं. फोन घेतला. पाहिलं तर शेतावरच्या माझ्या वाटेकऱ्याचा फोन. एवढ्या सकाळी का फोन केला असेल याने असा प्रश्न पडला. मनात म्हटलं, "बहुदा अवकाळी पाऊस आला असेल आणि त्याने माझा नऊ एकर गहू आडवा केला असेल."

'मन चींती ते वैरी न चिंती' असं म्हणतात ते उगाच नाही. बरं अशा वेळी हे मन सुध्दा चांगला विचार मुळीच करत नाही. सगळ्या वाईट शक्यताच मनात येतात.

कदाचित त्याच्या गाईला वासरू झालं असेल असाही विचार मनात आला. पण पहिलीच शक्यता अधिक गृहीत धरून फोन घेतला.

तर

Sunday, 8 December 2019

दैनिक प्रभात रूपगंध : गळका रांजण

मी गेली वर्षभर दैनिक प्रभातच्या रूपगंध पुरवणीत लेखन करतो आहे. ललित लेखन असं त्या लेखनाचं साधारण स्वरूप. गळका रांजण हा अशाच लेखांपैकी एक लेख. माणसाचं आयुष्य हे देखील

Wednesday, 12 June 2019

तुम्ही जात मानता का?

या प्रश्नाचं उत्तर बहुतेकजण नाही असंच देतील. तरीही विचारल्यावर प्रत्येकजण आपली जात सांगतोच. मी माणूस आहे असं कोणीच म्हणत नाही. बाबासाहेबांशी नातं सांगणारे प्रकाश आंबेडकर असो, स्वतःला पुरोगामी मानणारे शरद पवार असो अथवा आम्ही पुरोगामी म्हणणारी काँग्रेस असो. प्रत्येकजण

Tuesday, 2 April 2019

धनुर्मास आणि झुंजूरक भोजन : एक संस्कार With Marathi Star Rahul Solapurkar

सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. ज्या महिन्यात तो धनु राशीत वास्तव्यास असतो त्या महिन्यास धनुर्मास म्हणतात. त्याला धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात रात्री मोठ्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. तो जठराग्नी शांत व्हावा म्हणून सकाळी लवकर भोजन करणे गरजेचे असते.  तळजाईवर संस्कार भारतीने धनुर्मास साजरा करायचे ठरवले होते. त्यानिमित्त वक्ते धनुर्मासाचे आणि

Sunday, 29 May 2016

चिमणा, चिमणी आणि कुबड्या खविस

गावाकडचं घर जुनं. माळवादाचं. वाडाच म्हणतात सगळे त्याला. दुपारची वेळ. रणरणतं ऊन. घरात मी एकटाच. घराच्या मागील बाजूस असलेली झरोकावजा खिडकी उघडी. दारही सताड उघडं. घराबाहेर निरव शांतता. किडा मुंग्या शोधत उन्हात आलेल्या आणि

Wednesday, 25 May 2016

marathi Poem : येगं येगं सरू


मला आठवतय लहानपणी आम्ही सर्व नातवंड रात्री आजी भोवती गोळा व्हायचो. आजी एखादी गोष्ट सांगायची. आणि गोष्ट संपली कि , " चला झोपा बरं आता सगळे. " पण कसलं काय ! आमची खुसपूस चालूच असायची. मग आजी आणखी एक हत्यार बाहेर काढायची. म्हणायची ,

Sunday, 12 July 2015

पंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा

( या सगळ्यात वाघाच्या मिशा कुठे आहेत हे तुम्ही नक्की ओळखाल . )

काही वर्षापुर्वी मी ' त्याची मिशी……. त्याची डाय  ' हि हास्य कविता या सदरात मोडणारी कविता लिहिली होती. तेव्हा ती मी माझ्या ' रे घना ' या ब्लॉगवर प्रकाशित केली होती. याही

Sunday, 7 September 2014

Mother's Day : अशीही एक आई


जगातला सगळ्यात ' प्राईम सब्जेक्ट ' कोणता असेल तर आई. काय दुर्दैव आहे पहा ! मी स्वतःला मराठी म्हणवतो आणि लिहायला सुरवात केल्यानंतर आधी ' प्राईम सब्जेक्ट ' ला ' प्राधान्य विषय ' हा प्रती शब्द आठवत नव्हता. म्हणून आधी प्राईम सब्जेक्ट असा शब्दप्रयोग केला होता. आज ' मदर्स डे ' नाही पण आईविषयी लिहायला दिवस कशाला हवा !

Thursday, 17 July 2014

In love with her : तुम्ही ‘ तिला ‘ रब मानता ?

ती खरंच आपल्या स्वप्नांचं आभाळ असते. तिच्यासाठीच घेत असतो आपण प्रत्येक श्वास………ती जगण्याच्या प्रत्येक क्षणाची आस……….आपल्याला हवी असते तिची आपल्या भोवतालची दरवळ………तिचा सहवास. तिच्या सहवासात आपण अनुभवतो प्रत्येक क्षणाला उमलत जाणारं आपलं आयुष्य. ती म्हणजेच आनंदाचा प्रत्येक क्षण…..ती आयुष्यातला हर्ष.

Sunday, 29 June 2014

Love and Women : पुरुष स्त्रीचा दास का ?

खरंतर या जगात कुणीच कुणाचं दास नसतं. तरीही आपल्याला हव्या असलेल्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आपण आपल्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घालतो. आणि यालाही समाजात ' दास होणं ' असंच संबोधलं जातं. या अर्थानं स्त्रीला पुरुषाची दास मानलं जातं. पण खरंतर बऱ्याचदा पुरुषच स्त्रीचा दास असतो. पुरुष स्त्रीचा दास कशामुळे झाला त्याची ही कथा -

Tuesday, 1 April 2014

Women footwear : बाईची चप्पल

प्रसंगच तसा होता. तसं  पाहिलं तर सहज विसरून जावा असा पण माझ्या मनात त्या प्रसंगाने वादळ उठवळ. झालं काय -

बऱ्याच वेळा ऑफिसला जाताना माझ्यावर जीप, ट्रक यासारख्या खाजगी वाहनान ऑफिसला जाण्याची वेळ येते. काही चेहरे अधून- मधून दिसत असतात. तोंड देखले का असेना पण ओळखीचे वाटतात. कधी कधी चार - दोन शब्दांची देवाण घेवाण झालेली असते. कधी नजरानजर होताना ओठांच्या कोपऱ्यात हळुवार हसू फुलेल असत. डोळ्यांना डोळे भेटतात तेव्हा कधी कधी ओळखीचं आश्वासन दिसून येतं. अशाच एका मला माझ्या थांब्यावर भेटणाऱ्या " बाईचा " हा किस्सा. बाईचा किस्सा म्हणलं कि आता सगळेच जरा सावरून बसतील. ते सहाजिकच आहे. आणि सावरून बसायलाच हवं कारण किस्साही तसाच आहे.