Tuesday 24 March 2015

मी कुणाचा दास नाही

( हि मराठी कविता एका खूप उद्विग्न मनस्थितीत लिहिली आहे. ज्वालामुखीतून उफाळणारा लाव्हा बाहेर पडावा, तशी एका वास्तव प्रसंगी हि कविता आकाराला आली आहे. म्हणुनच ......
ते विषाच्या घागरी
मी अमृताचा गडवा
किंवा
पेरतो मी सदगुणांना
भोवतीने भोवताली ............
या सारख्या ओळी वाचून. हा काय स्वतःला
फार सदगुणी समजतो काय ? असा सूर कुणीही काढू नये. माझी मनस्थिती समजावून घ्यावी.  दुर्गुण माझ्यातही आहेत. पण मी माझ्या स्वार्थासाठी कुणालाही टाचेखाली चिरडू इच्छित नाही एवढ मात्र खरं. )
तर...................
प्रत्येकालाच असं वाटत कि मी दुसऱ्यावर फार उपकार करतो आहे. पण खरंच तसं काही नसतं. कुणी कुणावर उपकार नाही करत. त्या नियतीनं आपल्याला काही चांगली कर्म करण्यासाठी या भूतलावर पाठवलंय. पण आपण मात्र आपल्या प्रत्येक कर्माला स्वार्थाच्या दोरखंडांनी जाम जखडून टाकलंय. आपल्या स्वार्थासाठी आपण अनेकांना आपल्या टाचेखाली चिरडू पाहतो. आणि वरून पुन्हा, " तू माझ्या टाचेखाली आहेस म्हणून शाबूत आहेस असा आव आणतो." स्वतःचं हित साधताना खरंतर आपण आपल्याही नकळत दुसऱ्याचा रक्त पित असतो. फक्त ते कुणाला दिसत नाही.
' ज्यानं चोच दिली तोच दाणाही देतो.'  हेच जर खरं असेल तर मग आपण का उगाच स्वतःची टिमकी वाजवतो.
तळहाता एवढ्या रानात चिमुटभर पेरलं कि जे उगवता तेच पोटाला लागतं. तो घास कोण कुणाला देतो. ती काळी आई तिच्या कुशीतून पिकावते आणि आपल्या मुखात घालते. आभाळातून मेघ बरसतो आणि प्रत्येक सजीवाला पाणी मिळतं. आयुष्य चालतंय ते त्या दोन घासावर आणि घोटभर पाण्यावर. त्यावर का कुणी आपला हक्क सांगावा ? या विचारातूनच -
ओंजालीचे रान माझे
चिमटीचा पेर होता
घेतलेला घास माझा
फक्त माझा शेर होता
या ओळींनी जन्म घेतला.  पण माणसं मात्र नेहमीच दुसऱ्यावर खूप उपकार करत असल्याचा आव आणतात. आणि इतरांना स्वतःचे अगदी गुलाम समजतात.
म्हणूनच -
' मी कुणाचा दास नाही
ना कुणाचा बडवा.'
अशा ओळी माझ्या हातून कागदावर उतरल्या. कारण आजकाल जो हुजरेगिरी करेल.........जो दुसऱ्याची तळी उचलून धरेल.......जो दुसऱ्याच लांगुलचालन करेल.......... जो दुसऱ्याची थुंकी झेलण्याची तयारी ठेवेल तोच मोठा होईल असा काळ आलाय.
पण हे खरं नाही मित्रांनो, हे खरं असतं तर शिवरायांच्या चरणी तुकोबारायांनीच नसता का माथा टेकला ?
तेव्हा अंगात गुर्मी नसावी दुसऱ्याच्या गुर्मीला शह देण्याची ताकद नक्की असावी. अंगात नम्रता असावी पण विनाकारण कुणासमोर वाकण्याची तयारी नसावी. आपण आपल्या मस्तीत जगावं पण आपल्या मस्तीचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असो. कविता कशी वाटली ते नक्की कळवा. 




       

8 comments:

  1. शिवाजी शिंदे.25 March 2015 at 14:18

    मी कुणाचा दास नाही
    ना कुणाचा बडवा.' ग्रेट लाईन्स.

    ReplyDelete
    Replies
    1. शिवाजीराव अभिप्रायाबद्दल आभार. आपण पहिल्यांदाच भेटता आहात. आता नियमित भेटत चला.

      Delete
  2. विजय सर या लेखातून तुमच्या मनाची श्रीमंति दिसून येते , सामजिक भान ....अप्रतिम सर

    ReplyDelete
    Replies
    1. चिंतामणीजी, मनस्वी अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete
  3. ओंजालीचे रान माझे
    चिमटीचा पेर होता
    घेतलेला घास माझा
    फक्त माझा शेर होता

    अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. आभार चिंतामणीजी.

      Delete
  4. खूपच छान विजय सर ....

    ReplyDelete