Friday 18 January 2019

#मिशनमोदी : मजबूर सरकार मजबूत देश can Uddhaw Thakre explain how stable country is possible without stable government )

uddhaw thakre
उद्धव ठाकरे यांच्याविषयी लिहायचं नाही फारसं असं ठरवलं होतं. कारण नाही म्हटलं तरी यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पंचवीस वर्ष भाजप सोबत संसार केला आहे. पण
आता काही केल्या नांदायचं नाही असाच एकूण उद्धव ठाकरेंचा पावित्रा दिसतो. स्वतःचा अभ्यास नाही वाचन नाही कुठलं तत्वज्ञान नाही. पण समोरच्या व्यक्तीनं काही तात्विक विधान केलं कि त्या विधानाची मोडतोड करून उद्धव ठाकरे काहीतरी विधान करतात.

आता काय तर म्हणे देशात मजबूर सरकार नसलं तरी चालेल मला देश मजबूत हवा आहे. आता हे कसं सध्या होईल असं  कोणताही पत्रकार त्यांना विचारणार नाही. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र मजबूत करता येईना. पाच दिवस चाललेला संप मिटवता येईना. आणि हे भाषा करताहेत मजबूर सरकारची आणि मजबूत देशाची.

मी असं काहीतरी बोलून कार्यकर्त्यांच्या छातीत हवा भरू शकेल असा उद्धव ठाकरेंचा समज आहे. खरंतर २०१४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या अशा आडमुठ्या भूमिकेचाच त्यांना फटका बसला होता, काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असतानाही आणि महाराष्ट्रातल्या २८६ जागा लढवून शिवसेनेला अवघ्या ६३ जागा जिंकता आल्या. त्याचवेळी भाजपने जवळ जवळ शिवसेनेच्या दुप्पट म्हणजे १२२ जागा जिंकल्या. तरीही आमची शेपूट वरच. तरीही आम्ही मोठे भाऊ. कारण महाराष्ट्र म्हणजे आमची जहागीर.

बाळासाहेबांच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंचे सगळेच निर्णय चुकलेत. स्वतः राज ठाकरेंना शिवसेनेसोबत मनोमिलन व्हावं अशी इच्छा होती. पण त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी राज यांना दूर ठेवणेच पसंद केले. कारण एकाच खाईन तर मी एकटा खाईन. शिवाय बाळासाहेबांनी जसा सगळा रिमोट आपल्या हातात ठेवला तसा तो आपल्या हातात रहायला हवा हि उद्धव ठाकरेंची इच्छा. आणि आपल्यामागे तो रिमोट आदित्यच्या हाती देण्याचा मार्ग मोकळा असायला अशी भूमिका.

उद्धव ठाकरेंचा हा टोकाचा ताठरपणा कमी होईल अशी बुद्धी परमेशवर त्यांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

1 comment:

  1. Hello There. I discovered your weblog the usage of msn. That is a
    really neatly written article. I will make sure to bookmark it and return to learn more of your helpful information. Thank you for the post.
    I will definitely return.

    ReplyDelete