Wednesday, 16 January 2019

#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट ? ( narendra modi, rahul gandhi )

काही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरांना भेटी  देण्याचा. सोमनाथ येथील मंदिरातील भेट पुस्तिकेत नोंद करताना राहुल गांधी यांची नॉन हिंदू

अशी नोंद करण्यात आली होती. त्यावर रणदीप सुरजेवाला यांनी तर राहुल गांधी अहिंदू नसून जानवेधारी हिंदू आहेत असे स्पष्टीकरण दिले होते. मीडियाने राहुल गांधी यांना खांद्यावर घेऊन फिरायचे ठरवलेच आहे. लगेच त्यांनी राहुल गांधी यांनी सॉफ़्ट हिंदुत्वाचा स्वीकार करून मोदींनवर मात केली आहे असा प्रचार सुरु केला.

खरे तर हिंदू मंदिरात कोणत्याही धर्मियांना प्रवेश करण्यास आणि देव दर्शन करण्यास मोकळीक आहे. अर्थात त्यातही काही रूढी परंपरा आहेत आणि त्या पाळण्यात फार काही गैर आहे असे मला वाटत तरी वाटत नाही. पण हिंदू देवतेचे दर्शन घेतले म्हणून राहुल गांधी हिंदू कसे होतात ? मुळात ज्याच्या आजोबाचे नाव फिरोज गांधी ( कि खान ? ). कोणी म्हणतात कि फिरोझ गांधी हे पारशी होते. पण पण पारशी म्हणजे हिंदूच का ? खरे तर ते इराणीयन. तिथे मुस्लिम आक्रमकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते हिंदुस्थानात आले. थोडावेळ पारसी म्हणजे हिंदूच मानू या. पण इतर धर्मात जर मुलाने जातीबाहेर लग्न केले तरी पुढील पिढ्यांना त्याच्या वडिलांची जात मिळते. परंतु पारशी समाजात तसे नाही. तिथे समाजाबाहेर विवाह करण्याऱ्या मुलाला समाजाचे सर्व रितीरिवाज नाकारले जातात. ( आता उद्या एखादा पारसी तरुण त्याविरोधात मिडियाकडे गेला तर मीडिया त्याची बाजू उचलून धरलेलं आणि अन्याय झाला अन्याय झाला म्हणत पार्शी समाजाच्या रितीरिवाजावर टीकेची झोड उठवेल )

त्यामुळेच पारसी हिंदू मानले तरी परधर्मात लग्न करणारे फिरोज गांधी पारसी उरत नाहीत. मग पुढे राजीव गांधी यांनी इटालियन ख्रिश्चन सोनिया गांधी यांच्याशी लग्न केले. त्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या संततीला फार तर कन्व्हर्टेड ख्रिश्चन मानता येईल. पण जानवेधारी हिंदू कसे मानायचे ?

असो. ते मुस्लिम कि हिंदू यामुळे फारसा फरक पडत नाही. जात धर्म या गोष्टी दुय्यम आहे. अब्दुल कलाम होतेच ना मुस्लिम. प्रश्न जाती धर्माचा नाही. प्रश्न आहे देशावरील निष्ठेचा. आणि गांधी कुटुंबाच्या अथवा राहुल गांधीच्या मनात देशप्रेम आहे असे मला तरी दिसत नाही. सत्ता हवी. मग त्यासाठी कधी मुस्लिमांना सोबत घ्यायचं, ख्रिश्चनांना हाक मारायची. आणि ज्यांची आपल्या धर्मावर जातीवर आणि देशावर निष्ठा नाही असे हिंदू आपल्या पाठीशी उभे राहतील या आशेने मध्येच हिंदुत्वाची पताका खांद्यावर घ्यायची. हे म्हणजे गळ्यातली तुळशीची माळ लपवून मटणावर ताव मारण्याचा प्रकार आहे.

त्यामुळेच हवे तसे रंग बदलणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवायचा कि मुस्लिम टोपी नाकारणाऱ्या मोदींवर हे ठरवायची वेळ आली आहे.No comments:

Post a comment