खरंतर विकास या बाबींवर मला काही लेख लिहायचे आहेत. कारण आपल्या देशात प्रत्येक पत्रकार, प्रत्येक मिडिया, प्रत्येक विचारवंत केवळ कोण काय बोलतो आहे यावरच चर्चा करतो आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे कि आपली जनता स्वतःच्या बुद्धीने विचार करीत नाही.
ती जे काही करते ते ऐकीव गोष्टींच्या आधारे करते. जे काही करते त्यात त्यांचा स्वार्थ साधला जाणार आहे कि नाही ते पाहून करते.२०१४ ची निवडणूकसुद्धा याला अपवाद नव्हती. मिडियानेच हवा तयार केली. गुजरातचा विकास दाखवला. मतदाराने जे ऐकले, पाहिले त्यानुसार त्यांना मोदींना विजयी केले. कारण मोदींच्या विजयात त्याच्या अच्छे दिनचा स्वार्थ दडलेला होता. मोदींनी जे सांगितलं नव्हतं त्या प्रत्येकाच्या खिशात येणाऱ्या १५ लाखाची अपेक्षा होती. मी सगळीच नाही म्हणत या देशातला गरीब, शेतकरी कधीही स्वतःच्या बुद्धीने विचार करून मतदान करीत नाही.
मीडिया तर काय स्वतःला किंगमेकर समजू लागली आहे. ती वाटते आमी हवे तसे छत्र रंगवू हवे त्याला हवे तेव्हा खुर्चीवर बसवू आणि हवे तेव्हा खुर्चीवरून खाली खेचू. मोदींनी चार वर्षांपूर्वी दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्नं आजही सगळ्यांना आठवते. परंतु आपल्या मोदींच्या कार्यकाळात अत्यंत वेगाने होत असलेला विकास कोणाचं दिसत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. १०० % भ्रष्टाचार मुक्त देश नाही देऊ शकले मोदी पण मोदींनी दिलेलं भ्रष्टाचारमुक्त सरकार कुणालाच दिसत नाही. आम्हाला दिसत ते आरक्षण, कर्जमाफी, नौकरी. बस्स ! मी काय करतो देशासाठी हा प्रश्न क्ती मंडळी स्वतःला विचारतात ?
असो मुख्य मुद्दा बाजूलाच राहिला. या देशातली ३० % जनता विचार न करता मतदान करते. २० % टक्के जनता जातपात पाहून मतदान करते. २० टक्के जनता पैसे घेऊन मतदान करते. हि ७० % राफेलसारख्या प्रकरणांना, कर्जमाफीच्या घोषणांना बळी पडते आणि मतदान करते. तिला विकास नाही झाला तरी चालते. अथवा विकास करायचा असेल तर करा पण मला तोशिष देऊ नका अशी तिची भूमिका असते.
हि जण समोर ठेवूनच बिन बुडाच्या बातम्या पेरल्या जातात. मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करायला जागा नाही म्हणून. मोदींनी अंबानींच्या खिशात ३० कोटी घातल्याचे सांगितले जाते. आणि कहर म्हणजे आता सईद सुजा. काय तर म्हणे मतदान यंत्रे हॅक केली होती. ते स्व. गोपीनाथ मुंडे यांना माहित होते. आणि म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. माझ्या परवाच्या घसरुद्दिन आणि अल्लाउद्दीन या लेखावर काही मित्रांनी नाराजी व्यक्त केली. परंतु अशी विधाने करायला नेहमी अमीर, सलमान, नसरुद्दीन, सईद अशीच मंडळी कशी पुढे येतात ? रॉय, सिंग, शर्मा का नाही सापडत ? ईव्हीएम हॅक करणे शक्य नाही. कारण त्यात bluetooth नाही. JPS आहे पण त्याने डाटा ट्रान्सफर होत नाही. अनेक तज्ञांनी EVM हॅकिंगची शक्यता नाकारली आहे. तरीही हि सर्व मंडळी मीडियाला हाताशी धरून अशा खोट्या बातम्या पेरतातच.. कारण त्यांची भिस्त आहे या देशातल्या ७० टक्के मतदारांवर.
२०१४ मध्ये भाजपला जी मते मिळाली त्यातील ८० टक्के मते हि १८ ते ५० वर्ष या वयोगटातील मतदारांची होती. आणि याहीवेळी हीच मते भाजपाला विजयी करतील.
No comments:
Post a Comment