आज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे असाच अट्टाहास सुरु असतो. काँग्रेनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे सांगितले जाते. पण खरंच काँग्रेस कोणाची ? काँग्रेसला काही ध्येय धोरण उरली आहेत का ?. यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे..
१८८५ मध्ये Allan Octavian Hume या ब्रिटिश ICS अधिकाऱ्याने इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली लाखो स्वातंत्र्य सैनिक एकत्र आले. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि काँग्रेसमधून काही मंडळी राजमुकुट धारण करायला पुढे सरसावली. महात्मा गांधीजींच्या जवळचे म्हणून नेहरूंच्या डोक्यावर मुकुट चढला. थोडे थिडके नव्हे नेहरू जवळ जवळ सलग १७ वर्षे या देशाचे पंतप्रधान होते.
नेहरूंचा स्वर्गवास झाल्यानंतर गुजरालीलाल नंदा पंतप्रधान पदी विराजमान झाले. त्यांना १३ दिवसांच्या दोन टर्म मिळाल्या. मध्ये लाल बहादूर शाश्त्री पतंप्रधान झाले. पण २ वर्षात त्यांचा स्वर्गवास झाला. आणि त्यांतर इंदिरा गांधी यांनी सत्तेची सूत्रे हातात घेतल्या. त्या सलग ११ वर्षे सत्तेत होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात देशात काँग्रेसचं मोठं प्राबल्य होतं. राष्ट्रीय स्वयंसंघ संघ १९२५ ला अस्तित्वात आला . त्यातून १९५१ ला जनसंघ या नावाने आजच्या भाजपची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणीबाणी नंतर याच जनसंघाने जनता पार्टी नाव धारण करीत काँग्रेसच्या हातातून सत्ता हस्तगत केली. तरीही या देशात काँग्रेसेतर पंतप्रधान सत्तेत यायला स्वातंत्र्यानंतर ३० वर्ष जावी लागली. मोरारजीभाई देसाई हे या देशाचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले. पण अंतर्गत कलहाने मोरजीभाईंना अवघ्या सव्वादोन वर्षात पाय उत्तर व्हावे लागले. जनता पार्टीचे तुकडे होऊन त्यातून जनता दल (एस ) हा पक्ष अस्तित्वात आला. चरणसिंग हे जनतादलाचे प्रमुख. मोराजींना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून खाली खेचून चरणसिंग पंतप्रधानपदी आरूढ झाले. त्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी यांचा पाठिंबा घेतला. अवघ्या पाच महिन्यात इंदिरा गांधी यांनी चरणसिंग यांचा पाठिंबा काढून घेतला. निवडणूक लागल्या आणि इंदिरा गांधी पुन्हा बहुमताने सत्तेत आल्या.
इथे पक्षांतर्गत लाथाळ्यांची बीजं रोवली गेली. परंतु जनता दलातून बाहेर पडल्यानंतर उरली ती भारतीय जनता पार्टी. जनता दलाच्या राजकारणाचा खेळ खंडोबा करून इंदिरा गांधी सत्तेत आल्या. निवडणुका जाहीर झाल्या. १९८४ ला इंदिरा गांधी यांची हत्या झाली. भाजप सत्तेत येईल असे वाटत असताना इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ झालेल्या काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. सत्तेची स्वप्नं पाहणाऱ्या भाजपचे देशात केवळ २ खासदार निवडून आले. पुढे प्रत्येक राजकीय पक्षातून काही विजयी उमेदवार घेऊन नेते फुटत राहिले. स्वतःचे वेगळे पक्ष स्थापन करीत राहिले. तेलगूदेसम अस्तिवात आली. डिएमके स्वातंत्र्याच्या आधीपासून अतित्वात होती. तिच्यातून पुढे एएमडीके उदयाला आली. काँग्रेसमधून फुटून महाराष्ट्रात पुलोद अस्तित्वात आली. पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाली आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अस्तित्वात आली. तृणमूल काँग्रेस सुद्धा अशीच काँग्रेसमधून फुटून अस्तित्वात आलेली पार्टी आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतून निर्माण झालेली मनसे हे तर अगदी अलीकडंच उदाहरण. महाराष्ट्रातील शिवसेना असो , झारखंड मुक्ती मोर्चा असो, असे प्रांतवादाची प्रबळ किनार असलेले पक्ष राज्याराज्यातून अस्तित्वात आले. त्या त्या राज्यातील राजकारणात त्यांनी अत्यंत उत्तम बस्तान बसवले. दिल्लीतील सत्तेतला हादरे दिले. आणि साहजिकच अनेकांनी प्रादेशिकतेचे, जातीयवादाचे, आरक्षणाचे, भाषावादाचे, कधी शेतकऱ्यांच्या अगतिकतेचे भांडवल करून स्वतंत्र पक्ष स्थापन केले. वैयक्तिक हेव्यादाव्यांमुळेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तर किती तुकडे झाले याची गणतीच नाही.
खरंतर एका ब्रिटिश माणसाने काँग्रेसची स्थापना केली. स्वातंत्र्य मिळवूंन मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा ज्ञात अज्ञात अनेकांनी योगदान दिलं. पण ज्यांना स्वातंत्र्य कशाला म्हणतात ते राहुल गांधी देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य निळवून दिल्याचे सांगतात. परंतु Allan Octavian Hume यांच्यानंतर नेहरूंनी काँग्रेसमध्ये आणली ती घराणेशाही. आपल्या हयातीत इंदिरा गांधी यांना स्वतःची नियमबाह्य सचिव नेमलं. पुढे राज्यसभेवर घेतलं. एकूणच काय काँग्रेस आणि देश गांधी घराण्याच्या पंजातून बाहेर गेलेला या गांधी घराण्यांना कधीच शान झाले नाही. अनेकांच्या अपेक्षा, बुद्धिमत्ता, कुवत दाबून टाकण्यात आली. आणि त्यातूनच अनेक महत्वाकांक्षी नेते आपापले गट काँग्रेसमधून बाहेर पडू लागले.
काँग्रेस पक्षाला पक्षफुटीला आळा घालण्याची गरज वाटू लागली. त्यातून पक्षांतर्गत बंदीचे कायदे अस्तितवात आले. पण कायदा तिथे पळवाट. प्रयत्न करूनही पक्षफुटीला पायबंद घालणे शक्य झाले नाही. मोठे पक्ष फुटत राहिले. नवं नाव धारण करून नव्हे पक्ष अस्तित्वात येत राहिले. त्यांची नवी चिन्ह आली. नवे झेंडे आले. राष्ट्रवादी, तृणमूल अशी मूळ काँग्रेसने विभिन्न नावे धारण केली.
आज काँग्रेस नव्हे कोणत्याही पक्षाला स्वतःची तत्व वगैरे उरलेली नाहीत. जी काही तत्वे उरली आहेत ती भाजपकडे. म्हणून त्या पक्षात मोदी पंतप्रधान होऊ शकतात. लालकृष्ण आडवाणी शांत राहतात. माध्यमांनी आणि विरोधकांनी त्यांना भीष्माचार्य म्हटले असले तरी. पक्षहित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वतःची महत्वकांक्षा कधी वयांत केली नाही. अवघे २ खासदार असलेल्या गोव्यातले पर्रीकर या देशाचे संरक्षण मंत्री होऊ शकतात. काँग्रेस नव्हे तर अन्य कोणत्याही पक्षात हे घडू शकत नाही. तिथे विचार होतो तो ताकदीचा. गुणवत्तेचा नाही. त्यामुळेच यापुढे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशी दवंडी पिटवणे काँग्रेसने थांबवावे. भारत आणि जपान यांची तुलना केली तर आपण पन्नास वर्ष मागे आहोत. आणि आपल्या या पिछाडीला केवळ काँग्रेस आणि काँग्रेची घराणेशाही जबाबदार आहे.
Good post.Ne'er knew this, thank you for letting me know.
ReplyDelete