नेहरूंच्या नंतर इंदिरा आली…… नंतर काँग्रेस बघा राजीवची झाली.
राजीव नंतर सोनिया आली …. काँग्रेस राहुलच्या मालकीची झाली.
पवारांनी अजितला सत्तेत आणून बसवलं …. …
रडणाऱ्या सुप्रियाला केंद्रात नेऊन हसवलं.
बाळासाहेबांनी उद्धवला गादीवर बसवलं……….
स्वप्नात असणाऱ्या राजला जागं करून फसवलं.
उद्धव ठाकरेंनी सत्तेचा हातात घेतला गाडा………
आदित्यच्या कानात म्हणाले, " पुढे तुम्ही ओढा."
मुलायम सिंगांनी सत्तेवर अखिलेशला आणलं.
राबडी आपलं भविष्य लालूंनीही जाणलं.
मुख्यमंत्री होताच राबडी खुदकन हसली
' मै भी ' म्हणत तिच्या बाजूला मिसासुद्धा बसली.
आता सांगा
वाजपेयींना कुणी आणलं
वाजपेयींनी कुणाला आणलं.
वाजपेयींना कुणी आणलं
वाजपेयींनी कुणाला आणलं.
आडवाणींना कुणी आणलं
आडवानींनी कुणाला आणलं.
आडवानींनी कुणाला आणलं.
मोदींना कुणी आणलं
आणि
मोदी कुणाला आणतील.
भाजपात मोदी कुणाचे कोण आहेत ……
विनोद
तावडे कुणाचे कोण आहेत……
देवेंद्र फडणवीस कुणाचे कोण आहेत…….
एकनाथ खडसे
कुणाचे कोण आहेत………
शिवराज सिंह कुणाचे कोण आहेत.
आम्ही मात्र स्वतःला कट्टर कार्यकर्ते म्हणवणार…….
कधी साहेबांच्या तर कधी दादांच्या शब्दासाठी प्राण तळहातावर घेऊन जाणार……….
मरेपर्यंत निष्ठेने आपापल्या पक्षाचे झेंडे खांदयावर मिरवणार………
नेत्यांनी पाठीवर नुसती थाप मारली तरी आपल्या अंगातलं रक्त सळसळणार……
नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पक्ष सोडला………… युत्या तोडल्या…………. आघाड्या मोडल्या कि आपणही त्यांच्या मागे पळणार.
नेते पक्ष काढतात आणि
नेते नव्हे तर कार्यकर्ते पक्ष मोठा करतात
पण पक्ष मोठा झाला कि नेते पाय पसरतात.
कार्यकर्ते असतातच मागे पुढे
पण वेळ आली कि नेते त्यांनाही विसरतात.
पण वेळ आली कि नेते त्यांनाही विसरतात.
भाजपा सोडले तर इतर बहुतेक राजकीय पक्ष जनतेची नव्हे आपल्या भावी पिढ्यांची चिंता करतात. त्यांच्या पुढच्या पिढीसाठी हवीतशी राजकीय समीकरणं बदलतात. जिकडे सत्ता आणि जिथं फायदा तिथले होतात.
मतदारांनो जागे व्हा. भाजपाला मतदान करा असं मी मुळीच म्हणणार नाही. पण विचार करून मतदान करा.
- Indian Politics : मुंडेंनी जोडलं उद्धवरावांनी तोड...
- Indian Politics : आघाडीचं घोडं अजित पवारांचा तट्टू...
- Indian Politics : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उद्ध(...
- Indian Politics : शिवसेनेने माघार घेतली नाही तर ?
- Indian Politics : हे कसलं मिशन ?
- Indian Politics : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी...
- Indian Politics : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा
- Indian Politics : टोलचा झोल , आघाडी सरकार आणि अजित...
- Indian Politics : मोदींची क्रेझ संपली का ?
- BJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सु...
- Indian Politics : उद्धवा जमिनीवर ये
- Indian Politic and Nareandra Modi : मोदी नाटकी आहे...
- Indian Politics : मतदारांनो जागे रहा विधानसभा येते...
- Indian Politics : काँग्रेस वयात कधी येणार ?
अशा अनेक लेखांसाठी ' रिमझिम पाऊस ' हा ब्लॉग नियमित आणि नक्की वाचा. सूचना दया ………. प्रतिक्रिया कळवा.
मी शिवसेनेचाच आहे. परंतु उद्धव स्वार्थ फार जवळून पहातो आहे. जो कोणी साहेबांचा शब्द झ्व्लात नाही त्याला शिवसेनेत किंमत नाही. आपण खूप छान लिहिले आहे.
ReplyDeleteमित्रा प्रतिक्रियेबद्दल मनापासून. आमची लोकशाहीच अशी आहे. नको असलं तरी ती बदलणं आपल्या हातात नाही. आपण फक्त चांगला पर्याय शोधू शकतो. ती वेळ आता आलेली आहे.
ReplyDeleteया उ(द्ध)वा सगळ्यानाच झाल्यात, लोकांना समजायला हवं. बरं झालं युती तुटली, आघाडी तुटली नाहीतर पुढची पाच वर्षं अशीच गेली असती रुसण्यात.
ReplyDeleteनरेंद्रजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. लोक शहाणे झाले आहेत स्थानिक पक्षांचं स्वार्थी राजकारण त्यांना कळु लागलंय त्यामुळेच या वेळी अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागतील अशी अपेक्षा आहे.
ReplyDeleteसर खूपच सुरेख लिहिलंय. तुमचे Indian Politics : मुंडेंनी जोडलं उद्धवरावांनी तोडलं या लेख बरोबरच इतर अनेक लेख वाचले. खूप छान.
ReplyDeleteप्राची प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. रसिकांना निव्वळ प्रेम कविता किंवा ललित लेखन नव्हे तर माझं राजकीय लेखनही आवडतं हे पाहून लिहिण्याची उमेद वाढली.
ReplyDeleteहि घराणेशाही मोडून काढणं खूप गरजेचं आहे पण हे करणार कसं ?
ReplyDeleteबदलेल नक्की बदलेल. बदल हि काळाची गरज आहे. पण आपले प्रयत्न मात्र नक्की हवेत.
ReplyDeleteखुपच मस्त.
ReplyDeleteकेशव प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.तुमच्या नियमित प्रतिक्रिया मिळतात. काही चुकत असल्यास नक्की सांगावे.
ReplyDeletesoooooo good.
ReplyDeleteमित्रा रसिक वाचकांनी शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार
Pankaja Munde Gopinath Mundenchya kon Aahet?
ReplyDeletePoonam Mahajan Pramod Mahajananchya kon aahet?
मित्रा मी जी उदाहरणं दिली आहेत ती फक्त पक्ष प्रमुखांची आहेत. तू म्हणतो आहेस त्याप्रमाणे पहायचं झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ढिगानं उदाहरणं सापडतील. गांधी घराणं, पवार घराणं, लालू प्रसाद, मुलायमसिंग आणि ठाकरे घराणं आपापला पक्ष हि आपली खाजगी मालमत्ता समजतात. खालच्या पायरीवर कुणीही असेल पण त्यांच्या पायरीवर फक्त ते आणि तेच असतील. म्हणुनच पर्वा वानरयाच्या सभेत व्यासपीठावरून जनतेसमोर केवळ ते दोघे पितापुत्र वाकले. इतरही त्यांच्या बरोबर वाकले असते तर जणु काही उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख या स्थानाला धक्का बसला असता.
ReplyDeleteअसले फाल्तु लेख तुमच्या कडेच ठेवा.....
ReplyDeleteरोशनजी लेखात फालतु काय आहे ते कळले तर खूप बरे होईलंइ माझ्या लेखनात सुधारणा करू शकेल.
ReplyDeleteखरच खुप मस्त लेख लिहिला आहे...एक विनंती आहे...ठाकरे सेनेच्या मागे असलेल्या जनते पर्यन्त हा लेख पोचवा..कृपया सर्व पेपर मधे छापून टाका...
ReplyDeleteनमो नमाय
जय श्रीराम