Thursday, 14 February 2019

#मिशन_मोदी : कोण म्हणतो भाजपमध्ये घराणेशाही आहे काय ?

narendra modi, rahul gandhi, manmohan sing,
२०१४ ला भाजप आणि मोदींना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या मिडियाने आता मात्र मोदींना केवळ पाण्यात पहायचे ठरवले आहे. काही झालं तरी मोदींच्या आणि भाजपच्या कोणत्याही कृतीत नकारात्मकता कशी शोधायची याचं या पत्रकारांना खास ट्रेनिंग देण्यात आलं असं दिसतं. आणि
या असल्या पत्रकारितेला आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो आहोत. वास्तविक हि पत्रकारिता आमच्या देशाला आणि लोकशाहीला विनाशाकडे घेऊन निघाली आहे. परंतु सजग झालेली जनता मिडीयातील बातम्यांना मुळीच बळी पडणार नाही.

आता गंमत पहा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पार्टी अशा सर्वच राजकीय पक्षात घराणेशाही बोकाळली आहे म्हणून भाजप सुद्धा कशी घराणेशाही आहे हे जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी संपूर्ण मिडिया जिवाचा आटापिटा करते आहे. इतर राजकीय पक्षांप्रमाणेच भाजप मध्येही कशी घराणेशाही बोकाळली आहे यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या पाठोपाठ राजकारणात आलेल्या आणि स्थिरस्थावर झालेल्या पंकजा मुंडे, प्रीतम खडे यांचं उदाहरण दिलं जातं. रावसाहेब दानवे यांचे आमदार चिरंजीव संतोष दानवे यांच्याकडे बोट दाखवत भाजपला घराणेशाहीचं लेबल चिटकवलं जातं. पण हि घराणेशाही नव्हे इलेक्टोरिअल मेरिट आहे हे का पत्रकारांना कळत नाही का ? नेहरू - इंदिरा - राजीव - सोनिया आणि आता राहुल याला म्हणतात घराणेशाही. शरद पवार - अजित पवार - पार्थ पवार याला म्हणतात घराणेशाही. बाळासाहेब - उद्धव आणि मागोमाग आदित्य याला म्हणतात घराणेशाही. देवेगौडा यांच्या पाठोपाठ कुमारस्वामी त्यांच्या पक्ष अध्यक्ष होतो आणि मुख्यमंत्री होतो याला म्हणतात घराणेशाही. एनटी रामाराव यांच्या पाठोपाठ त्यांचा जावई चंद्रबाबू पक्षाचा सर्वेसर्व्हा होतो याला म्हणतात घराणेशाही. लालू - राबडी - तेजस्वी - मिसा यांच्या पलिकडे पक्षाची सूत्रं  न जाणे म्हणजे घराणेशाही. या सर्व पक्षांचे अध्यक्ष त्या घराण्यापलीकडे अन्य कोणी होणार नाही.

परंतु भाजप मध्ये तशी परिस्थिती नाही. आजवर होऊन गेलेल्या केवळ कोणाही अध्यक्षाचा वंशज म्हणून कोणी भाजपच्या अध्यक्षपदावरारूढ झाल्याचे उदाहरण नाही. असे असें जर मिडिया भाजपवर घराणेशाहीचा आरोप करणार असेल तर मिडीयाने आणि पत्रकारितेने स्वतःची फेरतपासणी घ्यावी. आत्मपरीक्षण करावं. 

No comments:

Post a Comment