Wednesday 13 February 2019

#मिशन_मोदी : देशाची अस्मिता विकू नका

narendra modi, rahul gandhi, ashutosh gupta, priyanka gandi,
आमच्या पत्रकारिता किती पोरकट आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पत्रकार आशुतोष गुप्ता. आशुतोष गुप्ता कोण हे अनेकांना माहित नसेल. हा एकेकाळचा हिंदी वृत्त वाहिन्यांचा संपादक. पुढे नौकरी सोडली आणि आम आदमी पार्टीत दाखल झाला. एकेकाळी
मलाही केजरीवाल यांच्याविषयी प्रचंड अभिमान आणि आदर होता. आण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाची सिद्धी चढून ते राजकारणात आले. मला फार आनंद झाला. परंतु पुढे त्यांनी ज्या रितीने द्वेषाचं राजकारण केलं आणि आता तर चक्क लबाड लांडग्यांच्या कळपात सामील झाले ते पाहिल्यावर माझ्या आशा संपल्या. त्यांची धाव कुंपणाच्या पलीकडे जाणार नाही हे लक्षात आलं.

तर आम आदमी पार्टीत दाखल झाल्यानंतर या गृहस्थांनी लोकसभेची निवडणूक लढवली. भाजपच्या हर्षवर्धन यांच्याकडून पराभूत झाले. परंतु काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्यापेक्षा अधिक मते मिळवली. अलीकडे ट्विटरवर नियमित असतात. मी माझे अकाउंट ऑपरेट करताना मला त्यांची पोस्ट दिसते आणि त्या पोस्टवर कॉमेंट करून मी त्यांना त्यांची चूक म्हणा दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. मोदींवर अथवा भाजप कोणी टिका करू नये असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण पटेल अशी टिका करावी एवढेच माझे म्हणणे. 

आता परवाच्या रॅलीत राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ,' चौकीदार चोर है ' हि घोषणा हजार वेळा वदवून घेतली. यात कोणत्याही पत्रकाराला वाईट वाटत नाही. पण मनमोहनसिंग यांना ' देहाती औरत ' म्हटलं कि गळा काढावासा वाटतो.बीजेपीच्या एखाद्या दुय्यम नेत्याकडून एखादा उणापुरा शब्द गेला तर मीडियाची ती हेडलाईन होते. मग राहुल गांधी मोदींना चोर म्हणतो तेव्हा मीडियाला टाळ्या वाजविण्यात आनंद वाटतो का ?

असो. मी आशुतोष विषयी लिहीत होतो. हा सुशिक्षित. एक उच्च प्रतिभेचा पत्रकार. पण त्यांच्या ट्विट पाहतो तेव्हा आमची पत्रकारिता किती खालच्या दर्जाची असेल याची जाणीव होते. त्यांच्या आणेल ट्विटवर मी कॉमेंट देत असतो. अथवा माझे मत मांडून रिट्विट करीत असतो. अशीच फोटो त्यांची एक पोरकट ट्विट. मी त्यांना उत्तर दिलं  आहेच. परंतु हि ट्विट करताना , ' हत्ती हे एका राजकीय पक्षाच चिन्ह आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल हि देशाची अस्मिता आहे. ' हि बाब आशुतोष गुप्ता यांच्यासारख्या पत्रकाराने लक्षात घेऊ नये यापेक्षा दुर्दैव ते काय ? मोदींचा द्वेष जरूर करा. परंतु त्यासाठी देशाची अस्मिता विकू नका एवढेच.

No comments:

Post a Comment