Wednesday 13 February 2019

#मिशन_मोदी : प्रियांकाचं कर्तृत्व काय ?

maymrathi blogspot com ,  narendra modi, priyanka gadhi, rahul gandhi,
प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचे सरचिटणीस पद सांभाळले म्हणून देशात फार मोठी उलथा पालथ होणार अशा अविर्भावात सर्व पत्रकार आणि मीडिया वावरते आहे. मी माझ्या पोस्टमध्ये जनतेविषयी फार नाही बोलत. कारण आमच्या ३० % जनतेला स्वतःच मत नाही. बातम्या पाहून, पेपर वाचून आणि विरोधक जे काही बोलतात त्यावरून या
३० % जनतेचे मत तयार होते. हि ३० % जनता हिच विरोधकांची गंगाजळी. या तीस टक्केमध्ये, गरीब आणि शेतकरी वर्ग येतो. काही दशकापूर्वी नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत हे प्रमाण ५० टक्क्याहून अधिक होते. आणि म्हणून काँग्रेस वर्षानुवर्षे सत्तेत होती. 

आता मात्र त्या ५० टक्क्यातली बरीचशी जनता शहरात आली. स्थिरस्थावर झाली. शिकली सवरली. शहाणी झाली. दारिद्र्य रेषेच्या वर आली. आणि त्यामुळे काँग्रेसच्या एकहाती सत्ताकारणाला ओहोटी लागली. त्यात भरीस भर म्हणून जनतादलाची फाटाफूट होऊन एका ठाम विचारसरणीचा भाजप आकार घेऊ लागला आणि काँग्रेसला दिवसेंदिवस उतरती कळा येत गेली. राहुल गांधी, प्रियांका गांधी हे काँग्रेसला कधीही उर्जितावस्था प्राप्त करून देऊ शकणार नाहीत. खरंतर काँग्रेसमध्ये अनेक बुद्धिमान नेते आहेत. ते काँग्रेसला या दुरावस्थेतून बाहेर काढू शकतात. परंतु देशभरात त्यांच्यात जी एक वाक्यता असायला हवी ती नाही. आणि गांधी घराणं काँग्रेसला त्यांच्या जबड्यातून बाहेर पडू देणार नाही. 

' प्रियांका गांधी खूप जोरात काम करीत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सपा -बसपा नव्हे तर भाजपला सुद्धा हादरा बसला आहे.' हि सगळी विधाने पत्रकारांची, मीडियाची. लोकभावनेचा विचार कोणी केला आहे ? काही वृत्त वाहिन्या प्रत्यक्ष जनतेचा मतांचा अंदाज घेतात. पण त्यातही चार या पक्षाचे आणि चार त्या पक्षाचे अशी पेरणी केलेली असते. खरंतर नेहरूंपासून प्रियांका पर्यंत सर्वांचे कर्तृत्व काय ? तर ते काँग्रेस नावाच्या वटवृक्षाच्या सावलीत बसलेले आहेत. परंतु शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, अटलजी, नरेंद्र मोदी या सर्व मंडळींनी स्वकर्तुत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली. परंतु, राहुल- प्रियांका असो , उद्धव-आदित्य असो, अथवा अजित-पार्थ असो यांचं कर्तृत्व काय ? 

त्यामुळेच प्रियांका आल्याने काँग्रेसला काहीही फायदा होईल अशी सुतराम शक्यता नाही. यदाकदाचित यश मिळाले तर त्याच श्रेय त्यांना न्नकीच दिलं जाईल. पण अपयश आले तर पुढे काय ? हे एक फार मोठं चिन्ह काँग्रेस समोर 'आ ' वासून उभं असेल. आणि ते आमच्या लोकशाहीला मारक आहे.

No comments:

Post a Comment