Tuesday 5 February 2019

बेकरीला मोदी जबाबदार आहेत का ?

सध्या शेतकरी, बेकारी  विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना  केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं कि आपण सहज सत्ता मिळवू शकतो असा विरोधकांना ठाम विश्वास आहे. नोटबंदीमुळे उद्योग बुडाले आणि त्यामुळे बेकारी वाढली असा विरोधकांचा दावा आहे. तीनवेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले माननीय विजय दर्डा हे लोकमत वृत्तसमूहाचे सर्वेसर्व्हा आहेत. गरीब सवर्णांना सरकारने आरक्षण दिले तेव्हा, ' आरक्षण वाढले पण नौकऱ्या आहेत कुठे ? ' या मथळ्याखाली लेख लिहिला होता. त्यासंदर्भात मी त्यांना मेल केली होती. त्यातल्या मजकुरावरून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. त्यांना मी जे लिहिले ते असे -


माननीय साहेब,

आपला लेख योग्य कि अयोग्य हे ठरविण्याचा मला मुळीच अधिकार नाही. आपण माझ्या तुलनेत जेष्ठ आणि अत्यंत अनुभवी आहात. तरीही आपण रोजगार घटण्याचे नेमके कारण दिलेले नाही. सरकारने गाजर दाखवले होते असे आपले विधान आहे. आजवर इतर राजकीय पक्षांनी तरी गाजर दाखविण्या पलीकडे काय केले आहे ? इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा देऊन वर्षानुवर्षे सत्ता भोगली. संपली का गरिबी ? जनतेचे कल्याण झाले नाही पण पुढाऱ्यांनी स्वतःच्या सात पिढ्यांचे कल्याण करून ठेवले. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ अशा अनेकांना कमीत कमी त्यांच्या मागे असणाऱ्या पिढ्यांची तरी विवंचना नाही. मोदींनी पाच वर्षात त्यांच्या कुटुंबियांना कोणतेही लाभ मिळवून दिल्याचे ऐकिवात नाही हि बाब अन्य कोणत्याही पक्षाच्या तुलनेत नक्कीच समाधानकारक आणि आशादायी आहे.

अटोमेशन , यांत्रिकरण हि नोकऱ्या कमी झाल्याचे कारण आपण सांगितले आहे. ते खरेच. पण आमच्या आधीच्या दोन पिढ्यांनी लोकसंख्या वाढीस लावलेला हातभार हे वाढत्या बेकारीचे आणखी एक प्रमुख कारण आहे. त्याचवेळी मागील दहा पंधरा वर्षात आधीच्या सत्ताधाऱ्यांनी शिक्षणाचे केलेले खाजगीकरण आणि त्यातून डिग्र्यांचे भेंडोळे घेऊन बाहेर पडलेले तरुण हे बेरोजगारीचे खरे कारण आहे. आज बंद पडू लागलेली अनेक इंजिनिअरिंग, डीएड कॉलेज हे काँग्रेस  आणि राष्ट्रवादी यांच्या राजवटीने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उतमातीचा परिणाम आहे. आई वडिलांनी मुलांना जन्माला घालून त्यांना रस्त्यावर सोडून द्यावे तसे या दोन्ही राजवटीतल्या अनेक नेत्यांनी गांधी परिवारांची नावे देऊन शाळा कॉलेज सुरु केले. भरमसाठ माया गोळा केली. आणि तरुणांना बेकार म्हणून रस्त्यावर सोडून दिले. खरेतर ती कॉलेजेस सुरु करताना त्या कॉलेजेस्नी कंपन्या सुरु करून बाहेर पडणाऱ्या तरुणांना सामावून घेईल अशी व्यवस्था निर्माण करायला हवी होती. पण  नाही. यांनी फक्त शाळा कॉलेज सुरु केली. स्वतःच्या मागे शिक्षणसम्राट हि बिरुदं लावून घेतली. आणि  सुशिक्षित बेरोजगार म्हणून वाऱ्यावर सोडून दिलं. आणि आज मीडियापासून विरोधकांपर्यंत सगळेच मोदींवर खापर फोडत आहेत. 

आज मोदीच कशाला राजीव गांधी सत्तेवर आले तरी बेकारीचा प्रश्न सुटणार नाही. बेकारी कमी होणार नाही. यावर उपाय नाही का ? नक्की आहे. पण तसे निर्णय घेण्याचे धाडस करणार कोण आणि मोदींनी ते धाडस केले तरी मोर्चे काढायला, पायबेड्या घालायला, धिक्कार करायला माध्यमे आहेतच. कारण एकच इथे प्रत्येकाला सत्ता हवी आहे. देश, जनकल्याण याविषयी कोणालाही काहीही देणे - घेणे नाही. जर मोदी या देशाचे, देशातील जनतेचे भले करू शकणार नसतील तर अन्य कोणीही ते करेल हे कदापि शक्य नाही. आणखी खूप लिहिता येईल. पण थांबतो. 

No comments:

Post a Comment