Monday, 25 February 2019

प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? why successions rate is less in love marriages ?

आमच्या दैनिक प्रभातमध्ये माझा ' प्रेमाचा शिडकावा ' हा लेख प्रकाशित झाला आहे. खरंतर ' प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? ' हे त्या लेखाचं मूळ शिर्षक. कदाचित नकारार्थी संदेश जाईल म्हणून संपादकांनी ते शीर्षक बदललं असावं. परंतु
लेखाचा आशय जसाच्या तसा आहे. त्यामुळे प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? यावर प्रकाश टाकण्याचा माझा यशस्वी झाला असेल असा विश्वास आहे. अर्थात लेखात पहिल्याच विधानात मी ८० % प्रेम विवाह अयशस्वी होतात तर २० % प्रेमविवाह अत्यंत आदर्शवत असतात. असे त्या अभ्यासगटाचे मत मी नोंदविले होते. पण ती आकडेवारी देखील संपादकांनी टाळली. बहुदा त्या अभ्यास गटाची विश्वासर्हता काय असा प्रश्न कोणी उपस्थित करू नये असे त्यांना वाटले असावे. असो परंतु एकूणच अयशस्वी प्रेम विवाहाचं प्रमाण अधिक हे आपल्या आजूबाजूला पाहिलं तर प्रत्येकाच्या सहज लक्षात येईल. अर्थात प्रेमविवाह मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हायचे असतील तर काय करायला हवं याच स्पष्टीकरण मी माझ्या लेखात दिलं आहे. पहा पटतात का विचार ........

love,love marriage, प्रेमविवाह

2 comments:

  1. फारच छान, आपला लेख वाचून विषयाच्या व्यतिरिक्त लिखाण कशे करावं हे सुद्धा समजले. मी सुद्धा आत्ताच लिहायला सुरवात केलेली आहे. https://lifecoachprafulla.blogspot.com/ कृपया अवलोकन करून आपला अभिप्राय कळवावा.

    ReplyDelete
    Replies
    1. आज आपला ब्लॉग पाहिला. दिरंगाईबद्दल क्षमस्व. परंतु आपण अभियंते. मग शरीरशास्त्र अथवा वैद्यकशास्त्र याविषयी कोणत्या आधारे लिहिता? असो. आपण संदर्भ घेऊन लिहित असाल अशी खात्री आहे. तरीही हा आटापिटा का?

      आपण आपल्या ब्लॉगची नोंद माझ्या ब्लॉगवर करावी. त्यासाठी माझ्या ब्लॉगवरील डाव्या बाजूचे 'खालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी' हे सादर पहावे.

      Delete