Thursday, 21 February 2019

#मिशन_मोदी : उद्या शिवसेना पंतप्रधानपद सुद्धा मागेल

dewendra fadnvis, udhhaw thakre, bjp, shiwsena, narendra modi
( आणखी एक गोष्ट स्पष्ट करावीशी मी इथे जी व्यंगचित्रे पोस्ट करतो ती सर्व मी नेटवरून घेतलेली असतात. परंतु ती मी जशीच्या तशी शक्यतो पोस्ट करत नाही. त्यात माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. )

परवा भाजप - शिवसेना युती झाली. काल मी त्यावर पोस्ट लिहिली. तेव्हा
काही मित्रांनी कॉमेंट करून तर काहींनी फोन करून ' युती झाली आहे ' आता टिका नको असे सुचविले. खरेतर कोणावर टीका करणे हा माझ्या लेखनाचा हेतू कधीच नसतो. ज्या गोष्टी इतर पत्रकारांना दिसत नाही त्या वाचकांसमोर मांडणे. हा माझ्या लेखनाचा हेतू.

घोषणा झाली त्याच्या आदल्या एके ठिकाणी मी म्हणालो होतो कि , " ९० % युती होणार नाही. आणि झाली तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला तरच होईल. " युतीची घोषणा झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला यावर शिक्का मोर्तब झाले. पण दुसऱ्याच दिवशी रामदास कदमांनी जी विधाने केली तेव्हा शिवसेनेच्या मनातला अंत्यस्थ हेतू लक्षात आला.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप होईल असे सांगितले हे खरे. त्याचा अर्थ ४० मंत्रिपद असतील तर शिवसेनेला आणि भाजपला प्रत्येकी २० मंत्रिपदं मिळणार. परंतु आता जो व्हिडोडी समोर येतो आहे त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदाची अडीच अडीच वर्ष वाटणी करण्याची अपेक्षा केल्याचे दिसते. १९९५ साली जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने असा कोणताही हट्ट केला नव्हता. तेव्हा शिवसेनेने १६९ जागा लढवून ७३ म्हणजे अवघ्या ४३ % जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी भाजपने ११६ पैकी ६५ म्हणजे ५६ % जागा. पण तरीही केवळ ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या अटीवर मनोहर पंत आणि नारायण राणे या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उपभोग घेतला. 

या सगळ्यावरून उद्धव ठाकरे आणि चमूचा आत्मविश्वास किती ठिसूळ आहे हेच दिसून येते. हि मंडळी अवघ्या काही दिवसांपूर्वी स्वबळावर निवडणूक लढण्याची आणि स्वबळावर सत्तेत येण्याची भाषा करीत होती. पण काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असताना उद्धव ठाकरेंनी स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे. आणि जोरदार आपटी खाल्ली आहे. त्यामुळेच स्वबळावर सत्तेत येणे तर शक्य नाहीच पण भाजपपेक्षा शिवसेनेचे जास्त आमदार कधीच निवडून येऊ शकणार नाहीत. याची उद्धव ठाकरेंना खात्री पटली आहे. त्यामुळेच कसा का असेना शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून शिवसेनेची हि आदळआपट.

अर्थात काहीही झाले तरी भाजप नेतृत्वाने या अटीला खतपाणी घालू नये. कारण वाटून घ्यायला मुख्यमंत्रीपद हि काही खिरापत नाही. आज मुख्यमंत्रीपद मागत आहेत उद्या पंतप्रधानद सुद्धा मागतील. तेव्हा आत्ताच त्यांच्या मुसक्या आवळणे योग्य.

No comments:

Post a comment