Tuesday, 19 February 2019

हे कसलं शिवप्रेम ? Is it the respect about Chatrapti Shivaji Maharaj ?

shiwaji maharaj, chatrapti shiwaji, hindawi rajy, छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य
काल भगवे झेंडे लावून गाड्या फिरवणारे तरुण पाहिले आणि शिवजयंती आल्याची जाणीव झाली. आज फेसबुक चाळले तर शिवरायांवर पोस्ट नाही असा मावळा सापडेना. धन्य झाल्यासारखे वाटले.

सकाळी सकाळी चिरंजीव आले. म्हणाले, " ते शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवणं गरजेचं आहे का ? " आणि
आम्हाला मुन्नाभाई एमबीबीएस मधील संजयदत्त आठवला. त्या विष प्यालेल्या मुलाला त्याची आई घेऊन येते तेव्हा तो हि , " ओ फ़ॉर्म भरणा जरुरी आहे का ? " असं म्हणतो.

आज शिवरायांचे स्टेटस ठेवले जातील. डिपी ठेवले जातील , कव्हर फोटोवर शिवराय दिसतील. मिरवणूक निघतील. ढोल ताशे वाजतील. मिरवणुकीत मावळे बेभान होऊन नाचतील. हे सारं गरजेचं नाही असं नाही. परंतु यातले कितीजण शिवाख्यानाला हजेरी लावतील ? यातले किती जण शिवाजी महाराजांवर चर्चासत्रे आयोजित करतील ? यातले किती जण गडकिल्ल्यावर जाऊन स्वच्छता करतील ? यातले किती जण यापुढे मी गडावर कचरा करणार नाही अथवा अन्य कोणतंही व्यसन करणार नाही अशी शपथ घेतील ?

या असल्या गोष्टी आम्ही करणार नसू तर हे स्टेटस, डिपी, कव्हर फोटो, मिरवणुका, डोल ताशे म्हणजे देखावाच नाही का ? मी म्हणतो फार काही करायला नको पण प्रत्येक गडावर कचरा दिसणे बंद होईल, दारूच्या बाटल्या दिसणे बंद होईल, प्रेमी युगले गडाच्या पावित्र्याचं भान ठेवतील.त्यावेळी आपल्या शिवभक्तीला अर्थ प्राप्त झाला असे म्हणता येईल.

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य हितासाठी बारा बलुत्यांना एकत्र आणतात आणि त्याच छत्रपतींच नाव घेऊन राजकारण करणारे उद्धव ठाकरे रोज मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसतात. हि का शिवाजी महाराजांची शिकवण आहे ? नक्कीच नाही.

No comments:

Post a Comment