मित्र हो,
२० फेब्रुवारी २०१९ ते २४ फेब्रुवारी २०१९ असे सलग पाच दिवस पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने ७ वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका
इथे जोडली आहे.
पाच दिवस अत्यंत श्रवणीय अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. यात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या कधी कधी भारत माझा देश आहे. या कार्यक्रमासह अनेक नाटके, एकाकिंका, कविसंमेलने आणि चर्चासत्रे यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे श्रीयुत परशुराम वाडेकर, दीपक म्हस्के, संजय सोनावणे, सोमनाथ धेंडे हे मुख्य संयोजक आहेत.
आपण सर्वांनी प्रचंड संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.
No comments:
Post a Comment