Wednesday, 20 February 2019

#मिशन_मोदी युतीची गरज कुणाला शिवसेनेला कि ..... ?

narendra modi, udhhaw thakre, bjp, shivsena, loksbha 2019
गेली वर्ष दोन वर्ष विरोधकांसह मिडिया, भाजपला युतीची गरज आहे आणि त्यामुळे भाजपचे सर्व नेते उद्धव ठाकरेंनी केलेला अपमान नाक दाबून गिळत आहेत असे सांगत सुटले होते. भाजप नेते शांत होते. वेळप्रसंगी आशिष शेलार, फडणवीस आणि अमित शहा यांनींही योग्य पलटवार केले आहेतच. पण त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याप्रमाणे पातळी सोडली नाही. भाजपने जो दाखवला तो सुसंस्कृतपणा होता, संयम होता. आणि त्याचंच फळ मतदार भाजपला नक्की देतील.

परंतु काँग्रेस - राष्ट्रवादी युती होणार हे स्वच्छ असतानाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर, फडणवीसांवर, मोदींवर आणि अमित शहांवर जी बेछूट टिका केली. ती टीका करताना त्यांच्यातला अविचारीपणा जनतेच्या लक्षात येत होता. गेल्यावेळी १५० जागांवर अडून बसत उद्धव ठाकरे यांनी युती तोडली. अर्थात ते योग्यच झालं. स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला २८८ जागा लढवून आपली झेप कोठपर्यंत जाऊ शकते हे तरी कळालं. त्यावेळी शिवसेनेने शंभरपेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या तर शिवसेनेचे नेते जमिनीवरून चालले नसते.

केवळ 'गांधी घराणं' हेच लेबल असल्यामुळे आज प्रत्येकाशी युती करणं हि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची गरज झाली आहे. परंतु भाजपचे २ चे २८२ खासदार झाले ते युतीच्या बळावर नव्हे. त्यामुळेच युती हि भाजपसारख्या विचारधारा असलेल्या पक्षाची गरज असूच शकत नाही. उलट २०१४ च्या लोकसभेला भाजपचे एकट्याचे २८२ खासदार आले. भाजप स्वबळावर बहुमत सिद्ध करू शकली. त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्षांना असं वाटलं कि आपण युतीत होतो म्हणून भाजपाला एवढ्या जागा मिळाल्या. काही अंशी त्यात तथ्यसुद्धा आहे. परंतु हे युतीतले पक्ष नसते तर काय झालं असतं भाजपच्या २८२ ऐवजी २४२ जागा आल्या असत्या. त्यामुळे भाजपला फारसा फरक पडला नसता. ३०/ ४० खासदार सहज भाजपला येऊन मिळाले असते. पण प्रादेशिक पक्ष मात्र भुईसपाट झाले असते.

२०१४ च्या विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असताना शिवसेनेने त्यांची स्वतःची झेप अजमावून पाहिली होती त्यामुळे ते युती तोडणे शक्यच नव्हते. पण होता होईल तेवढे पदरात पडून घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत होती. काल परवापर्यंत शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असं संजय राऊत छाती ठोकून सांगत होते. समसमान जागा लढवून ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हि मागणी रास्त ठरली असती. परंतु ते आव्हान पेलणं शक्य नाही म्हणून असं मुख्यमंत्रीपद पदरात पडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालविला होता. कोणी काहीही म्हणाल तरी हि शिवसेनेची माघार आहे. आणि ती भाजपपेक्षा शिवसेनेच्याच फायद्याची आहे. काहीही असो.' सुबह का भुला शाम को लौटा ' हे काय कमी झालं का ?

No comments:

Post a Comment