Sunday 17 February 2019

#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं ?

narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike
पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेलनाला गेलो होतो. पुलवामा हल्ल्या संदर्भात अनेक कवींनी आपल्या भावना शब्दातून व्यक्त केल्या. आठ दहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.
आसिफा या दहा बारा वर्षाच्या मुस्लिम मुलीवर बलात्कार झाला. तो बलात्कार हिंदूंनी केला होता. हिंदू देवतेच्या मंदिरात केला होता. असं पटवून देण्यात आलं होतं. विरोधक आणि मिडिया दोन्ही हातांनी शिमगा करत होते. सोशल मिडियावर सुद्धा निषेधाचं पेव फुटलं होतं. कितीतरी शीघ्र कवींनी कवितांचं पिठं पाडलं. त्यासंदर्भात अनेक कविता फेसबुकवर पोस्ट झाल्या. झालं दुसऱ्या दिवशी सगळं शांत. सगळे आपापल्या कामाला लागले.

देशात इतकी भयंकर घटना घडलेली असताना. मोदींवर शिंतोडे उडवणारे आहेतच. काल कोणीतरी सर्वात आधी प्रियांका गांधी वाड्रा यांनी निषेध व्यक्त केल्याचे सांगितले तर त्याच वेळी मोदी, शहा, योगी आदित्यनाथ सभेत मश्गुल असल्याचे सांगितले. आणि काल इतकी दुर्दैवी घटना घडलेली असताना आज मोदी अमरावतीत सभेला उपस्थित होते म्हणून काहींनी गळा काढला. शरद पवार , संजय राऊतसह अनेकांनी मोदींच्या ५६ इंच छातीवर सवाल उपस्थित केले.

कारगिल युद्ध झालं तेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते. आणि उरीत १९ सैनिक मारले गेले म्हणून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदी होते. हे कोणी विसरू नये. आणि २६ / ११ च्या ताजवरील हल्ल्यात, मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोटात शेकड्याने नागरिक मृत्युमुखी पडलेले असताना काँग्रेसने इंचभरसुद्धा छाती फुगवली नाही. पाकिस्तान विरोधात कुठलीच ठोस कारवाई केली नाही. आशुतोष गुप्ता, विश्वंभर चौधरी, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, गांधी घराणं हि मंडळी इतकी सत्तापिसाट ( लिंगपिसाट याप्रमाणे ) आहेत कि काहीही झालं तरी मोदींना फासावर कसं देता येईल एवढाच यांचा प्रयत्न.

मोदी काय करतील हे मला काय कुणालाच ते सांगता येणार नाही. त्यांच्या उजव्या हाताने नोटबंदी कधी केली हे त्यांच्याच डाव्या हाताला कळले नाही. पण अवघ्या काही तासात त्यांनी पाकिस्तानचा फेव्हर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला आहे. आणि पाकिस्तानातून आयात होणाऱ्या कित्येक गोष्टींवर २०० % आयात शुल्क लागू केलं आहे. अशा प्रकारे पाकिस्तानची निव्वळ आर्थिक कोंडी करून मोदी थांबणार नाहीत. ते यापेक्षा अधिक कठोर कारवाई करतील. कदाचित आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होईल. पण ते जे काही करतील ते देशहिताचं असेल हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment