'मोदींनी सांगितल्यास मी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत करू शकतो.' असे शरद पवार म्हणाले. मुळात शरद पवार हि व्यक्ती कधीच काही करत नाही. ते फक्त वेगवेगळी विधानं करण्याचं काम करतात. शरद पवार हुशार नाहीत
असे माझे म्हणणे नाहीत, ते अत्यंत हुशार आहेत. परंतु त्यांची बुद्धिमत्ता त्यांनी विधायक कामासाठी कधीच वापरली नाही. आपले राजकारण साधण्यासाठी एखाद्याला अडचणीत कसे आणायचे आणि दुसऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर कसे चढवायचे या संदर्भातील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.
पण शरद पवारांची पाठराखण करणाऱ्या मंडळींना केंद्रात दहा वर्षे कृषी मंत्री असणाऱ्या पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न का नाही सोडवला याचे उत्तर देता येत नाही. सिंचनाचा प्रश्न का नाही निकालात काढता आला याचेही उत्तर कोणाला देता आले नाही. सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांची आडतीच्या जोखडातून मुक्तता केली. परंतु पन्नास वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांना तेवढेही करावेसे वाटले नाही.'मला जनतेने खूप काही दिले' असे पवार साहेब अभिमानाने सांगतात. परंतु त्यांनी जनतेला काय दिले हे मात्र ते कधीच सांगत नाहीत.
मरकज संबंधातील बातम्या वारंवार दाखवू नयेत असे विधान त्यांना करावेसे वाटते. परंतु हिंदू साधूंची हत्या होते यावर त्यांना भाष्य करावंसं वाटत नाही. अजित पवार केंद्राकडे ५० हजार कोटी मागतात. शरद पवार १ लाख कोटी मागतात. सोनिया गांधी इटलीच्या आहेत म्हणून त्यांना विरोध करत पवार साहेब बाहेर पडतात आणि आपले राजकारण निकालात निघते आहे हे लक्षात आल्यावर पुन्हा सोनियांच्या गळ्यात गळा घालतात.
आणि दोन दिवसापूर्वी मी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत करू शकतो असं म्हणतात. साहेब अर्थव्यवस्थेचं एवढं ज्ञान तुम्हाला असतं तर आज महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची जी दयनीय स्थिती झाली आहे तशी झाली नसतो. मागील पंधरा वर्ष तुम्हीच होतात हो सत्तेत. मग महाराष्ट्रात सोन्याचा धूर का नाही निघाला? आज काय अवस्था आहे महाराष्ट्राची. दोन महिने राज्याच्या तिजोरीत महसूल नाही जमा झाला तर शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची ऐपत नाही सरकारची. मग शेतकरी कर्जमाफी करा. अनुदान द्या. शेतकऱ्यांची वीजबिले माफ करा असले सल्ले कोणाच्या भरवश्यावर देता?
साहेब केंद्राची चिंता करू नका. काहीही केले तरी पुढील वीस पंचवीस वर्ष केंद्रातील भाजपला सत्तेतून खाली खेचणे तुम्हाला नव्हे कोणालाच शक्य नाही. तुम्ही फक्त महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजूबत करा. खूप होईल.

tumche vichar barobar ahet krupya tumcha phone number dyava
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. परंतु इथे फोन नंबर देता येणार नाही. कृपया मेल करावी. अथवा फेसबुकला असाल तर मेसेज करावा. तिकडे नंबर देता येईल.
Deleteअगदी बरोबर विचार मांडलात.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
Deleteमहाभारतातील शकुनी आहे तो माणूस
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
Deleteसत्तेसाठी काहीपण करणारा माणूस

Delete