काय चाललंय हे आमच्या नेत्यांच ? अर्ज भरायला अवघे पाच दिवस राहिलेत आणि चारी प्रमुख पक्षांचा जागा वाटपाचा घोळ अजुन मिटत नाहीये. चुकतंय कुणाचं हे मतदारच ठरवतील आणि त्याप्रमाणे ज्याला त्याला धडा शिकवतील. परवा मी माझ्या
Indian Politics : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा
या लेखात स्थानिक पक्षांच्या स्वार्थी प्रवृत्तीबद्दल लिहिलं होतं. आणि आज शिवसेनेचं मिशन १५० प्लस असो अथवा राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी असो. काय दिसतंय यातनं ? शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा स्वार्थीपणाच ना !
उद्धव ठाकरेंच मिशन १५० प्लस आलं कुठून ?
तर मोदींच्या मिशन २७२ प्लस वरून. अरे पण मोदींच मिशन जागा जिंकण्याच्या संदर्भात होतं लढण्याच्या नव्हे. केवळ ७० ते ८० जागा निवडून येण्याची क्षमता असताना उद्धव ठाकरेंना एवढ्या जागा हव्यात कशासाठी ? धारातीर्थी पडायला ? बरं मोदींच मिशन २७२ प्लस आवाक्यात येतंय असं दिसताच मोदींनी ३०० प्लसची आरोळी ठोकली होती. आणि तिच्या आसपास पोहचले होते. उद्धव ठाकरे यानंतर कुठली आरोळी ठोकतील. छे छे ते कुठलीच आरोळी ठोकणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे आपण १५० जागा लढवल्या आणि भाजपाला १२० जागा दिल्या तर भाजपापेक्षा आपलेच जास्त आमदार निवडून येतील आणि मुख्यमंत्री आपलाच होईल. पण मुळात उद्धव ठाकरेंचं हे मिशन नसुन हात दाखवून अवलक्षण आहे.
मुळात उद्धव ठाकरे असो अथवा राज ठाकरे, महाराष्ट्र म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता समजतात का ? अमित शहांनी कुठलंही निमंत्रण नसताना मातोश्रीवर पायधूळ झाडावी अशी अपेक्षा ते करतात . नशीब कुर्निसात ठोकावा असं ते म्हणत नाहीत . का एवढा अट्टाहास ? आणि ते काय स्वतःला इथले सरंजाम समजतात का ? आणि मातोश्री हि त्यांची गढी आहे का ? त्याहीपेक्षा अमित शहांसारख्या दिग्गजाला उध्व ठाकरे अशी वागणूक देतात. मग तुमच्या आमच्या सामान्य माणसाची काय कथा ? परवा रात्री मुंबईतल्या महापौरांच्या बंगल्यावर पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकी नंतर आपल्या गाडीत बसून निघालेल्या उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तेव्हा उद्धव ठाकरे कशा रीतीने बोलत होते ? " बसून बसून कंटाळा आला होता म्हणून पाय मोकळे करायला आलो होतो." , " नाही नाही बाकी काही नाही. " , " बस बस. " हि वाक्य फार बोचणारी वाटत नाहीत . पण हे सांगताना त्यांची बोलण्याची जी मिजास होती. ती मात्र मनाला मुळीच पटत नव्हती . इतका उर्मट पणा राज आणि उद्धव नंतर केवळ नारायण राणेंन मधे पाहिला आहे . मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागली तर हि अवस्था मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काय करतील आणि कसे वागतील ? हा विचार ही मनाला नकोसा वाटतो .
शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला केवळ सत्ता हवी आहे . अजित पवार म्हणतात , " पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होणार असतील तर मी उपमुख्यमंत्री होणार नाही. " का हो ? हात बांधले जातत. फायलींवर हव्या तशा सह्या करता करता येत नाही म्हणूनच ना ! घोटाळे केले तर कुणीतरी जाब विचारणारं , गरज भासलीच तर चौकशी समिती नेमणार असतं म्हणूनच ना !
मित्रांनो मी शिवसेनेचा नाही…… भाजपचा नाही …… कॉंग्रेसचा नाहीच नाही…… राष्ट्रवादीचा तर मुळीच
नाही . मी आहे भारताचा . भारत आहे म्हणून महाराष्ट्र आहे ……… महाराष्ट्र आहे म्हणून मी आहे. स्थानिक पक्षांच्या या प्रांतवादामुळे ………. स्थानिक पक्षांच्या या भाषावादामुळे………स्थानिक पक्षांच्या या जाती वादामुळे तडा जातोय तो भारताच्या एकसंधतेला. या देशात जातीयवादाला खऱ्या अर्थानं पंबी घातलंय ते काँग्रेसन.
मित्रांनो मी शिवसेनेचा नाही…… भाजपचा नाही …… कॉंग्रेसचा नाहीच नाही…… राष्ट्रवादीचा तर मुळीच

तेव्हा मित्रहो जागे व्हा. आणि विचार करून मतदान करा.
अत्यंत वास्तववादी लेख
ReplyDeleteथॅंक्स तृप्ती.
ReplyDeleteअजित पवार आणि उद्धव ठाकरे दोघे सारखेच. दोघांची व्यंगचित्र एकाच पोस्ट मध्ये टाकून आपण अचूक बन मारलाय.
ReplyDeleteचिन्मयजी आज बऱ्याच दिवसांनी भेटताय. इतरांनाही बाण मारता येतो हे उद्धव ठाकरेंना कळायलाच हवं ना.
ReplyDeletejyala aaplya mitra pkshancha bhla krta yet nahi to mharashtracha kay bhla krnar.
ReplyDeleteकाही काळजी करू नकोस मित्रा. निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्र येतील.
ReplyDelete