Friday, 10 April 2020

टिक टॉक वापरणारे देशाला भिकेला लावतील.

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

पोस्ट आवडली असेल, योग्य वाटली असेल फेसबुक, व्हाट्सअप सह अन्य कोठेही शेअर करायला, कॉपीपेस्ट करायला, शेअर करायला काहीही हरकत नाही.
भारतात १२ कोटी जनसंख्या टिकटॉक वापरते.

टिक टॉक वरील व्हिडीओ डाउनलोड करण्यात जगात भारतीय ३ क्रमांकावर.
टिक टॉक वापरणारे रोज सरासरी ३८ मिनिट टिक टॉक वापरतात.

भारतीय माणसांचा टिक टॉक वर रोज वाया जाणारा वेळ मिनिटात =
१२ कोटी ( वापरकर्ते ) X ३८ मिनिटे ( प्रत्येक वापरकर्त्याचा सरासरी वेळ ) = ४५६ कोटी मिनिटे

भारतीय माणसांचा टिक टॉक वर रोज वाया जाणारा वेळ तासात :
४५६ ( कोटी मिनिटे ) भागिले ६० ( एका तासाचे मिनिट ) = ७.६ कोटी तास


एक माणूस रोज सरासरी ८ तास काम करतो असे गृहीत धरले तर


७.६ कोटी तास ( भारतीयांचा टिक टॉक वर रोज वाया जाणारा वेळ ) भागिले ८ ( एका माणसाचे कामाचे तास ) = ०.९५ कोटी माणसे केवळ टिक टॉक वर


म्हणजेच आमच्या देशातली ९५ लाख माणसे रोज कोणत्याही स्वरूपाचे काम न करता केवळ टिक टॉक वापरण्यासाठी घालवतात.


भारतीयांचे दर दिवशी सरासरी दरडोई उत्पन्न ३२० रुपये

९५ लाख ( माणसे ) X ३२० रुपये दरडोई उत्पन्न = ३०४ कोटी रुपये ( भारतीयांचे दरदिवशी होणारे नुकसान )


फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि इतर ज्या प्रकारचे सोशल मीडिया आम्ही वापरतो त्या सगळ्याचा विचार केला तर हि समाज माध्यमे योग्य प्रकारे वापर केला नाही तर एक ना एक दिवस आमच्या देशाला भिकेला लावतील.

टिक टॉक मात्र वर्षाला ११४००० कोटी रुपये कमावते आहे. त्यात भारतीयांचा वाटा अवघा १ % गृहीत धरला तरी ११४०० कोटी रुपये आम्ही भारतीय टिक टॉकच्या घशात घालतो आहोत. म्हणजेच चायनाच्या घशात घालतो आहोत. ज्यांनी आम्हाला कोरोना दिला.

- विजय शेंडगे, पुणे

No comments:

Post a Comment