Showing posts with label rain. Show all posts
Showing posts with label rain. Show all posts

Monday, 10 October 2016

पाऊस गेला शाळेमध्ये ( Marathi poem : Rain has gone to school )

marathi poem , poem for kids,

परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला सांगितलीय.” मोठेपण नाही सांगत पण या एवढ्याश्या पोरटयांनाही माझ्या कविता आवडतात आणि कळतात ही.

Tuesday, 16 August 2016

बैल गोठ्यात कण्हतो ( ox in Cemetery )


Gramin Kawita, marathi kwita, ग्रामीण कविता

अलिकडे जो उठतो तो शहराकडे धाव घेतो. शिक्षण असो वा नसो पण शहरात जायचं. पडेल ते काम करायचं. मिळेल तेवढा पगार घ्यायचा. जमेल तसं जगायचं. पण शहरात जायचं. आठ तास काम........सोळा तास आराम. शिवाय छान - छोकी. मौज - मजा, हिंडण - फिरणं, झकपक रहाणं, नुसती एैष. ज्याची त्याची भुमिका

Saturday, 2 July 2016

Marathi Poem : तू तरी पावसा असा


Marathi Poem, Marathi Kawita

( मला खात्री आहे तुम्हाला कविता मनापासून आवडेल. वाचून तर पहा. आणि हो ! प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. )

मी दोन एक वर्षापासून ब्लॉग लिहितोय. त्यातून माझा असा एक वाचक आकाराला आलाय. ते नियमितपणे माझं लेखन वाचतात. प्रतिक्रिया देतात. काही चुकलं माकलं तर सांगतात. कधी एखादी प्रेम कविता लिहा असं हक्कानं सांगतात.  तर कधी एखाद्या राजकीय लेखावरून माझ्याशी दोन हात करतात.

परवा

Monday, 14 September 2015

या माऊली या

( तळाचा फोटो पहायलाच हवा ) जवळ जवळ दोन महिन्यापुर्वी हि कविता लिहिली होती. कोरडया खट्ट आभाळाकडे पहात " या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा " अशी आर्त साद विठू माऊलीला होती. कारण

Tuesday, 10 June 2014

Love Poem : “ तू प्रेमच होऊन ये…"

ती पावसात भिजत तिची वाट पाहत उभी. क्षणानं मागून क्षण गेले……………क्षणांचे तास झाले. ती त्याची वाट पाहून थकून गेलेली……………कासावीस झालेली ……… त्याच्या ओढीनं अवघी व्यापून गेलेली.

आकाशात गच्च काळे ढग भरून आलेले……….संधीप्रकाश लोप पावलेला. भिरभिरणारा वारा………….निवांत एकांत. पण ती....……तो मात्र अजूनही नजरेच्या पल्याड. आभाळ मात्र जड झालेलं………कुठल्याही क्षणी बरसेल असं. पण पाऊसही तसाच  त्याच्यासारखाच हव्या त्या क्षणाला न येणारा………….हूर हूर लावणारा. या क्षणापर्यंत यायलाच हवा होता तो. पण तो तर दूरवरही कुठे दिसेना.

Tuesday, 8 April 2014

Love Poem : आला आला सखा माझा

गेली सहा सात दिवस गावी गेलो होतो. शेतावर. कालच आलो. माझं गाव तसं छोटेखानी. काँग्रेसच्या जवळजवळ साठ वर्षाच्या राजवटीनं शेतकऱ्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसं पाणी पुरवलं नसलं………शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव दिला नसला………. शेतकऱ्याला आत्महत्येच्या खाईत लोटलं असलं तरी गावागावात कॉम्पुटर आणि घराघरात मोबाईल मात्र नक्की पोहचवलाय. गावतल्या सायबर कॅफेत मुलं   MSCIT शिकत असतात. या शासनमान्य कोर्सानं मुलांना काय दिलं ? माहित नाही पण गल्ली बोळात सुरु झालेल्या सायबरवाल्यांनी मात्रं धंदाच केला.
तर सांगायचा मुद्दा हा कि माझं गाव छोटेखानी असलं तरी तिथं सायबर कॅफे आहे आणि गावी गेल्यावर कधीकधी मी तिथल्या सायबर कॅफेतून पोस्ट करतो. पण यावेळी गावातल्या दोन्ही सायबर कॅफेतलं नेट बंद होतं आणि म्हणून मला नवं लिहायला वेळ झाला.   हे मात्रं ' नमनालाच तेल फार ' झालं. तेव्हा थांबतो -

तर ती दूर रानात ………. त्याची वाट पाहत. आज कधी नव्हे ते त्याला उशीर झालेला ………त्याची वाट पाहून तिच्या डोळ्यात पाऊस आलेला.

ती अगदीच कासावीस ………त्याची वाट पाहवून …….निशब्द झालेली.

त्याचं वाट पाहणं जसं नेहमीचंच ………….तसाच तिचा उशीरही.

Friday, 28 March 2014

Love Poem : ती सोबत नव्हती म्हणुनी

उन्हाळा सरतो. आभाळात काळे ढग जमू लागतात. उन्हाची झळ कमी होते. गार वाऱ्याची झुळूक मन उल्हासित करते. मग सहाजिकच तिला घेऊन डोंगर दऱ्यात............. गार वाऱ्यात.............पावसाच्या धारात  जावं असं त्याला वाटतं. त्याचं हे असं आभाळासारख भरून आलेलं मन तो तिच्या जवळ मोकळं करतो. तीही त्याच्या सुरात सूर मिसळते. आणि मग मित्र मैत्रिणीन सोबत डोंगर दऱ्यात जाऊन पाऊस होण्याचा बेत ठरतो.
ठरल्यावेळी.............ठरल्या ठिकाणी सारे जमतात. हा आला ............. तो आला ............. ती आली ............... तीही आली..........पण ती कुठाय ?

Friday, 28 February 2014

Love poem : Oh rain stop again

Those were the rainy days. They had decided to meet at a place where they use to meet regularly. He was on time but........... she was late ..........as usual. He was looking towards her way after each and every moment and finally he gets fed up.

Sunday, 2 February 2014

Paintings of Nature : चित्रकार श्री शिरीष घाटे आणि मी: एक ऋणानुबंध

माझी ' रे घना ' ही कविता दैनिक सकाळमध्ये प्रकाशित झाली होती. सकाळनं सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री शिरीष घाटे यांच्याकडून माझ्या कवितेसाठी चित्रं काढून घेतलं होतं. दैनिक सकाळमध्ये शिरीष घाटे यांच्या चित्रासह प्रकाशित झालेली माझी कविता पाहून माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. माझी कविता दैनिकात प्रकाशित होण्याची

Saturday, 1 February 2014

Marathi Blogs : रिमझिम पाऊस

maymrathi

आज नव्यानं हा ब्लॉग सुरु करतोय. ‘ रिमझिम पाऊस ‘ हे जरी या ब्लॉगच शिर्षक असलं तरी हा ब्लॉग निव्वळ ‘ पाऊस ‘ या एकाच विषयाला वाहिलेला नाही. प्रेम, प्रेमकविता, चारोळी, मी लिहिलेली गाणी, कथा, बोधकथा, राजकारण, sms, विनोद असं खुप काही असणार आहे या ब्लॉगमधे. पाऊस जसा टाळता येत नाही तशाच या साऱ्या गोष्टी. कधी आपलं आयुष्य खारट करणार ……… तर कधी आंबट……कधी तिखट ……… तर कधी गोड.

link for this blog -

http://maymrathi.blogspot.com/

pl bookmark this link.

कोणताही पदार्थ जीभेवर टेकला की