Showing posts with label बडबड गाणी. Show all posts
Showing posts with label बडबड गाणी. Show all posts

Monday, 10 October 2016

पाऊस गेला शाळेमध्ये ( Marathi poem : Rain has gone to school )

marathi poem , poem for kids,

परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला सांगितलीय.” मोठेपण नाही सांगत पण या एवढ्याश्या पोरटयांनाही माझ्या कविता आवडतात आणि कळतात ही.

Wednesday, 23 September 2015

गावाकडचं गाणं

माझं गाव ओढ्या वघळीतलं. पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणारं.............उन्हाळ्यात डोहाडोहातून साचणार. कधी कधी गलितगात्र होऊन ठणठणीत कोरडं पडणारं. आभाळाकड पहात धाय मोकलून रडणारं. 
वस्तीवरची शाळा चवथीपर्यंत. त्यापुढं शिकायचं असेल तर कमीत कमी तीन किलोमीटर चालत जायला हवं आणि शाळा सुटल्यानंतर

Saturday, 30 August 2014

Song for kids : पावसा रे पावसा

मला खात्री आहे आपल्या हि बालकविता आणि त्याचं झालेलं बालगीत निश्चित आवडेल. बऱ्याचदा संगीतकार संपूर्ण गाण्याचा गीतात समावेश करत नाहीत. इथंही तेच झालंय त्यामुळेच. मी इथं संपूर्ण मुळ कविताही दिली आहे. सर्वात शेवटी गाण्याचा व्हीडीओही आहे. गाणं डाऊन लोड करण्यास माझी मुळीच हरकत नाही. पण या गीताचा व्यावसायिक वापर करावयाचा असल्यास माझी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

Friday, 13 June 2014

Story for Kid's : राक्षसपूरचा राक्षस

माझी  ' राक्षसपूरचा राक्षस ' हि कविता परवाच्या दैनिक लोकमत च्या ' सुटी रे सुटी ' या सदरात प्रकाशित झाली आहे.

मधे कुणास ठाऊक कसं पण लहान मुलांसाठी माझ्याकडून बरंच लिखाण झालं. छोटया मुलांसाठी अनेक कविता मी त्या वेळी लिहिल्या.

आठएक दिवसापूर्वी दैनिक लोकमत मधूनच प्रकाशित झालेली -

Friday, 6 June 2014

Poem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते


वर्षभर अभ्यास केला. परिक्षा आली. परिक्षा दिली. पेपर खुप सोपे गेले. परिक्षा संपली. सुटी लागली. मामाच्या गावाला गेलो. सूर पारंब्या खेळलो. विटी दांडू खेळलो. आट्यापाट्या खेळलो. खूप मजा केली. पण आता सुटीचाही कंटाळा आलाय. पुन्हा शाळा हवीशी वाटू लागलीय.

हो खरंच असं होतं. मुलांना सुटीचाही कंटाळा येतो. त्यांना शाळा सुरु व्हावीशी वाटते. शाळेतल्या मित्रांना भेटावसं वाटतं. नवी पुस्तकं घ्यायची असतात..... नवं दप्तर घ्यायचं असतं...... नवे बुट.... नवे मोजे. सारं सारं……नवं कोरं.

Sunday, 1 June 2014

Poem for Kids:एक होतं वांगं

हि कविता आजच्या दैनिक लोकमतच्या 'सुटी  रे सुटी' या सदरात प्रकाशित झाली आहे.  कविता खुप साधी सोपी आहे कि हिच्या विषयी फारसं काही लिहित नाही. याचा अर्थ

Wednesday, 28 May 2014

Story For kid's : अक्कलपुरचे अक्कालराव

मित्रांनो,

अक्कलपूर हे गाव जगाच्या नकाशात कुठे आहे हे आम्हाला माहित नाही. सहाजिकच अक्कलराव नावाचे कुणी सद्गृहस्थ त्या गावात असण्याची सुतराम शक्यता नाही.
तरीही अक्कलराव आमच्या स्वप्नात आले. त्यांनी आम्हाला त्यांचं गाव सांगितलं. गाव सांगितलं.  आणखी खुप सांगितलं त्यांनी आम्हाला त्यांच्याविषयी. पण क्षणापूर्वी स्वतःच नाव गाव सांगणारे अक्कलराव काही क्षणात पुन्हा स्वतःच नाव विसरून जातात. 

अक्कालरावांच्या अशा खुप गंमती जंमती मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली हि एक त्यांच्या शाळेत जाण्याची आणि अभ्यासाची गंमत  -

Monday, 12 May 2014

Story For Kid's : राक्षस गेला शाळेमध्ये

मुलांनो,
तुम्हाला माहिती आहे का कि काल आमच्या राक्षसपुरचा राक्षससुद्धा शाळेत गेला होता. 

खोटं नाही सांगत आहे. खरंच, अगदी देवाशप्पत.

कशाला म्हणून काय विचारताय ?

तुम्ही कशाला जाता शाळेत ?

बरोबर ! शिकून मोठ्ठ व्हायला. हो कि नाही.

आमच्या राक्षसरावांना म्हणे बाराखडी आणि अंकलिपी शिकायची होती.

Sunday, 2 February 2014

Marathi Kawita, Poem for Kids : पावसा रे पावसा


शाळा सुरु होते ना होते तोच मुलांना शाळा नकोशी वाटू लागते. मग ती शाळेला बुट्टी मारण्यासाठी एक ना अनेक हजार बहाणे शोधू लागतात. " सांग , सांग भोलानाथ, ......" हे मंगेश पाडगावकरांच अशाच एका मुलाचा खट्याळपणा व्यक्त करत. हा विषय माझ्या मनात घोळू लागला. मंगेश पाडगावकरांची कविता ध्यानीमनी सुध्दा नव्हती. पण