हि कविता आजच्या दैनिक लोकमतच्या 'सुटी रे सुटी' या सदरात प्रकाशित झाली आहे. कविता खुप साधी सोपी आहे कि हिच्या विषयी फारसं काही लिहित नाही. याचा अर्थ
इतर कविता क्लिष्ट किवा अवघड असतात आणि त्या रसिकांना कळणार नाही म्हणून त्या विषयी लिहितो असं नव्हे. मी माझ्या कवितांविषयी लिहितो किंवा यापुढेही लिहित रहाणार आहे, ते कविता लिहिताना माझ्या मनात नेमक्या काय भावना असतात, माझ्या मनात कुठली घालमेल चाललेली असते असते ते रसिकांपर्यंत पोहोचवावं या म्हणून. पण हि कविता लिहिताना मनात विशेष काही नव्हतं.
वांगं हि माझी आवडती फळभाजी. हो, हो ! अगदी कोंबडीच्या रश्श्यापेक्षाही! आणि लगेच मनात आलं आपल्या जिभेचे किती चोचले. कधी भरलेलं वांगं काय, कधी वांग्याच्या नुसत्याच तळलेल्या बारक्या फोडींवर टाकलेली मीठ मिरची काय तर कधी त्याचंवांग्याचं भरीत काय. कधी हे भरीत वांगं उकडून तर कधी नुसतं भाजून. चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत तर फारच चवदार लागतं म्हणे. मग असंही वाटू लागलं कि या वांग्यालाही जीव असेल. आईचं बोट सोडून चालायला शिकलेल्या बाळासारखं तेही तुरु तुरु चालत, ” चला बाजार पाहून येऊ.” या म्हणत बाजारात येत असेल.
भाजीवाल्यानं त्याला एखाद्या काकूंच्या पिशवीत टाकलं कि त्याला आणखीनच आनंद होत असेल. पुढच्या पाहुणचाराचे बेत त्याच्या मनात आकार घेत असतील. पण आपण समुद्रातले काही लक्ष टन मासे स्वाहा करतो. मग ज्याला तडफडही करता येत नाही त्या वांग्याचा थोडाच विचार करणार ? अशा कितीतरी विचारांच्या गर्दीतून छोट्यांसाठी लिहिलेली ही कविता.

No comments:
Post a Comment