Thursday 16 October 2014

Marathi Movie : प्रकाश बाबा आमटे

काल मी सिनेमा पहिला.…………  अशी सुरवात केल्यानंतर कोण हि पोस्ट वाचणार ? कारण सिनेमा पाहिला यात विशेष काय? अनेकजण म्हणतील, " आम्हीही पाहिला आहे तो सिनेमा. काय असणार या पोस्ट मध्ये ? सिनेमा असा होता …… तसा होता इत्यादी इत्यादी." पण तरीही माझी माझ्या तमाम वाचकांना अशी नम्र विनंती आहे कि पोस्ट पुर्ण वाचावी. आपले जे काही मत असेल ते मांडावे.

मी सिनेमा पहिला यात विशेष काही नाही. पण जर मी वाचकांना हे सांगितलं कि , " मी चक्क १५ वर्षानंतर सिनेमा पाहिला. " तर त्यांना नक्कीच अचंबित व्हायला होईल. नाही म्हणजे दरम्यानच्या काळात मी सिनेमा पहिलाच नाही असे नाही पण चित्रपटगृहात जाऊन मात्र खरंच १५ वर्षानंतर सिनेमा पाहिला. पत्नीसह.

सिनेमाबद्दल काय लिहु ? कारण मी माझी जी प्रतिक्रिया असणार आहे तिच हा सिनेमा पहाणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया असणार आहे. नानाच काय पण सोनालीचाही अभिनयसुद्धा अप्रतिम. निर्मात्यांनी व्यावसायिक बाबींचा विचार न करता सिनेमासाठी या विषयाची निवड करावी याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. हा चित्रपट व्यावसायिक पातळीवरही यशस्वी होईलच. पण सर्वात महत्वाचं म्हणजे, आपण मराठीत डब केलेला एखादा हॉलिवूडपट पाहतो आहेत असं वाटत होतं. चित्रपटाच्या तांत्रिक बाबी एवढया प्रभावी होत्या. 

गाण्याशिवाय, नृत्याशिवाय चित्रपट इतका परिपुर्ण होऊ शकतो हे दाखवून देणारं मागच्या तीन दशकातलं हे पहिलं उदाहरण असावं. नाही ! आता मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे हे निश्चित. पण हा सिनेमा अवर्णनीय. 

खरंतर मला सिनेमाचं परीक्षण करायचंच नाही. पुर्ण भरलेलं थिएटर. मध्यंतरातही जागा न सोडणारा प्रेक्षक…………. उस्फुर्त प्रतिसाद.………… ह्स्याचे फवारे………… हुंदके………… अंधारातही डोळ्यांच्या कडांवरून ओघळणारे अश्रू पुसणारी बोटं. सगळंच मंत्रमुग्ध करून टाकणारं. ( कुणी म्हणेल हि अंधारात अश्रू पुसणारी बोटं तुम्हाला कशी दिसली. मला इतरांची बोटं नाही दिसली. मी स्वानुभवारून सांगतोय). 

मध्यंतरी ' मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ' , ' प्रेमाची गोष्ट ', ' बालक पालक ' असे काही सिनेमे घरी बसुन पहिले. पण प्रकाश बाबा आमटे हा सर्वोत्तम ! 

तुम्ही म्हणाल का ? संघर्ष. भले तो संघर्ष प्रकाश आमटे यांच्यासारख्या एका महामानवाचा होता. पण तुम्ही मी प्रत्येकजण संघर्ष करत असतो आयुष्याशी. संघर्ष माझ्या वडिलांनी केला, मी करतोय, तुम्ही करताय. म्हणुनच हा सिनेमा प्रत्येकाला आवडेल. पण आपण कितीही संघर्ष करत असलो तरीही आपल्या आयुष्याचा सिनेमा नाही होऊ शकत. कारण आपला संघर्ष आपल्यासाठी असतो.…………. वीतभर पोटासाठी असतो………… आपल्या दारिद्रयाशी किंवा मध्यमवर्गीय परिस्थितीशी असतो. आणि प्रकाश आमटेंचा संघर्ष मानवतेसाठी होता. पण तरीही चित्रपट पहाताना त्यांच्या आणि आपल्या संघर्षातली एखादी तार जुळते. मी तर त्या अंधारही माझ्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पहात होतो. कारण त्यांच्या संघर्षाची एखादी तार आमच्याशीही जुळत होती. 

भारावलेल्या मनाने सिनेमागृहातून बाहेर पडलो. गाडी काढली आणि पत्नीला म्हणालो, " मंदाताई बसा. "         

8 comments:

  1. खरच खूपच मस्त सिनेमा होता … खूप रडू आले सिनेमा पाहताना … तेथील परस्थिती पाहून वाईट वाटले खूपच … प्रकाश आमटे खरच खूपच जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत ।

    ReplyDelete
  2. सुजीत कधी पाहिलास सिनेमा ? मला वाटायचं सिनेमा पहाताना रडणारा जगात मी एकटाच पुरुष आहे. चला आता कळलं माझ्या सोबतीला तुही असतोस.

    आणखी एक सुजीत, शिवाजी महाराज घराघरात जन्मा यावेतच पण प्रकाश आमटे आणि नरेंद्र मोदीही घराघरात जन्माला यावेत.

    ReplyDelete
  3. आभार अजिंक्य. सिनेमा पाहिला नसेल तर जरूर पहा.

    ReplyDelete
  4. "आता मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे हे निश्चित" .. खर आहे.. मी गुजराती आहे पण मराठीत शिकलो; अस्खलितबोलतो एकही आवडीचा मराठी सिनिमा सोडत नाही ...

    ReplyDelete
  5. प्रशांतजी तुम्ही नियमित प्रतिक्रिया देताय त्याबद्द मनापासून आभार. पण आपल्या संपर्काचा एकही धागा माझ्याजवळ नाही. मी तुमच्या प्रतिक्रियेला दिलेलं उत्तर तुम्ही पुन्हा वाचता कि नाही माहित नाही. त्यामुळे शक्य सेल तर संपर्कासाठी एखादा दुवा द्यावा. असेच नियमित भेटत रहा. काही चुकत असल्यास सांगत जा.

    ReplyDelete
  6. सर पहिल्या दिवशीच पहिला आणि मी कायम मराठी सिनेमा पाहतो .. मराठी सिनेमा ला विषय असतो . बाकी नाना पाटेकर ने मस्त अभिनय केलाय . तुम्ही निखिल वागले ने IBN लोकमत ला ग्रेट भेट मध्ये प्रकाश आमटे ची मुलखात पहिली होती का … खूप च मस्त होती .. त्याची लिंक मी देतोय .. एकदा जरूर पहा
    1. https://www.youtube.com/watch?v=JKqwR374AXw
    2. https://www.youtube.com/watch?v=6TcZoN_m_bA
    2. https://www.youtube.com/watch?v=HdThaTaKeOw

    ReplyDelete
  7. मी हि मुलाखत पाहिली नव्हती. पण तू लिंक दिल्यांनतर पाहिली. ग्रेटच. भारावून गेल्यासारखं होतं. निखिल वागळेही ग्रेटच. पण सध्या कुठे आहेत कुणास ठाऊक.

    ReplyDelete