Sunday, 15 June 2014

Marathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी

( जगभर जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. या वर्षी जून महिन्यातला तिसरा रविवार येतोय १५ जूनला. म्हणून आज बाबा दिन.
आता बाबाचा पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही. आता बाबा अधिक हळवा झालाय. आता बाबा ‘ बाप ‘ कमी आणि ‘ मित्र ‘ अधिक झालाय. त्यामुळेच लहानपणी बाबाच्या अंगाखांद्यावर खुशाल खेळणारी पिलं पंख फुटले कि बाबाला फारशी जमेत धरत नाहीत. म्हणूनच मित्रहो हे लेखन. पटलं तर बाबाचा प्रत्येक शब्द झेला. नाही तर पटलं तर सोडून द्या )


चार वर्षीपूर्वी माझे वडील गेले. अगदी ध्यानीमनी नसतानाही गेले. कुठलाच आजार नव्हता त्यांना. वयाच्या अडूसष्टाव्या वर्षीही गावी शेतावर जाताना दोनशे दोनशे किलोमीटरचा प्रवास बाईक वरून करणारे, सगळे दात शाबूत असणारे, चष्म्याशिवाय पेपर वाचणारे. आम्ही सगळेच खुशाल होतो. वडील असे अचानक जातील अशी कल्पनाही मनाला कधी शिवली नव्हती. पण वडील गेले. आणि मग लक्षात आलं खरंच आपण अजूनही आपल्या पायावर उभे नव्हतो. आपल्या वडिलांची गरज होती आपल्याला. आता कसं करायचं ?

कोणतीही गरज नसताना, वयाची पन्नासहून अधिक वर्ष शहरात काढलेल्या माझ्या वडिलांनी इथल्या तमाम सुखांकडे पाठ फिरवली आणि गावी गेले. नातवंडांकडे पहायला कुणीतरी हवं म्हणून आईला इथंच ठेवून. एकटेच रहायचे. अंघोळीच पाणी स्वतःच तापवून घ्याचे………स्वतःचा चहाही स्वतःच करून प्यायचे. गेली पंधरा वीस वर्ष पडीक असलेली जमीन त्यांनी सहा वर्ष कष्ट करून हिरवीगार केली. आणि म्हणूनच वडील गेल्यानंतर मी माझी नोकरी सोडून गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. मला शेतीची आवड आहेच पण त्याहीपेक्षा वडिलांनी ज्या कष्टानं गेली अनेक वर्ष पडीक पडलेली शेती वहीती केली. ती पुन्हा पडीक पडू द्यायची हीच भूमिका अधिक.

वडील गेले ऑगस्ट मध्ये. त्या आधी मी ‘ बाबा ‘ हि कविता लिहिली होती. मनाच्या खूप आतून आलेली हि कविता. वडिलांना ती वाचूनही दाखवायची होती. पण त्या कवितेतल्या आणि माझ्या मनातल्या भावना जाणून घेण्या आधीच वडील गेले.

आपली सखी ….प्रेयसी तर सगळ्यांच्याच स्वप्नात येते. पण माझा बाबा अधूनमधून माझ्या स्वप्नात येत असतो. माझ्या सोबत शेतात उभं राहून सगळं शेत पहात असतो.

एकदा असाच तो माझ्या स्वप्नात आला म्हणाला, " कांदा कशाला लावलास ? कांदा होत नाही आपल्याकडे नीट. ”
त्यावर मी म्हणालो,” तात्या चांगलं बी आणलंय. बघा ना ! कांदा किती मोठा आहे.”

स्वप्नात माझा बाबा खूप वेळ माझ्या सोबत शेतात रेंगाळतो. सगळं डोळे भरून पाहतो.
जाग येते तेव्हा कळतं हे स्वप्नं होतं. तेव्हा वाटतं आपल्या बाबाची आपल्यावर केवढी हि छाया. आणि आपल्याला त्याचाच विसर पडतो.

नाही मित्रांनो बाबा हा बाप नसतो कधीच तो असतो भर उन्हात आपल्या डोक्यावरची सावली. त्या बाबासाठी या ओळी -
No comments:

Post a comment